राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले बुलडाणेकर..!





• एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
* जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी
बुलडाणा, दि.31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज 31 ऑक्टोंबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये बुलडाणेकर राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले. या दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  दौडचा शुभारंभ जिजामाता प्रेक्षागार येथून जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील - भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
   यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री. धरपकवार यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर दौड संगम चौक, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक मार्गे पुन्हा जिजामाता प्रेक्षागार येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या