* भिंगारा गावात मतदान जनजागृती
बुलडाणा, दि. 11 : सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत भिंगारा येथे आदिवासी बांधवांमध्येमतदान जनजागृती करण्यात आली. या गावातही 'गो व्होट' चा आवाज निनादला. आदिवासी बहुल व दुर्गम असलेल्या भिंगारा गावात पंचायत समिती प्रशासन, जळगांव जामोद गटविकास अधिकारी श्री. भारसाकळे व त्यांच्या चमुने मतदान जनजागृती केली.
मतदान जनजागृती मोहीम संपूर्ण जळगांव जामोद मतदारसंघात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत रॅली द्वारे व घरोघरी जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रॅली व घरोघरी मतदारांना संपर्क करण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, विद्यार्थी , अंगणवाडी सेविका यांचा मोलाचा सहभाग होता. आदिवासी भगिनी व बांधवांमध्ये यावेळी मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमार्फत ग्राम भिंगारा या गावातील मुख्य चौकात पथनाट्य सादरीकरण करून मतदारांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. विशेष म्हणजे ग्राम भिंगारा येथील बोलीभाषेत विद्यार्थ्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
*****
चुनाव पाठशाळांमधून मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा
बुलडाणा, दि. 11 : जिल्हाभर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या चुनाव पाठशाळा घेण्यात येत आहे. या पाठशाळांमधून मतदान जनजागृती करणाऱ्या विषयांच्या निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सु. ब मोहता विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 21 विद्यार्थी सहभागी झाले.
त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात मतदान जनजागृती निमित्त 'मतदान— लोकशाहीचा आधार' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. निबंध लेखनातून मतदारांचे लोकशाहीतील महत्व निश्चितच विद्यार्थ्यांना समजून येणार आहे.
निवडणूक निरीक्षक भंवरलाल मेहरा करणार मतदान केंद्रांची पाहणी
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल असलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) भंवरलाल मेहरा दि. 12 व 13 ऑक्टोंबर रोजी मेहकर व खामगांव तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी करणार आहे. या पाहणीवेळी दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधा, रॅम्प, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदींचा आढावाही घेण्यात आला.
निरीक्षक भंवरलाल मेहरा दि. 12 ऑक्टोंब रोजी सकाळी मेहकर येथे राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचे निवडणूकसंदर्भात असलेल्या प्रशिक्षणाला भेट, दुपारी मेहकर तालुक्यतील मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच दि. 13 सप्टेंबर रोजी खामगांव येथे इव्हिएम व व्हिव्हिपॅट तयारीचा आढावा व दुपारी तालुक्यतील मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. त्याचप्रमाणे सायं 4 ते 6 वाजेदरम्यन खामगांव येथील विश्राम गृहावर भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत.
बुलडाणा शहरातून पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार राजाने भरघोस मतदान करण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभर मतदार जनजागृती मोहिम प्रभावीपण राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा शहरातही विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. बुलडाणा शहरात आज 11 ऑक्टोंबर रोजी पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.
पथनाट्य जनजागृती महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनीसुद्धा सहभाग घेतला. तसेच शाहीर कदम यांनीसुद्धा वासुदेव वेशभूषा करीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त् श्रीमती राठोड, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पथनाट्य जनता चौक, कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
निवडणूक निरीक्षक भंवरलाल मेहरा यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
* खामगांव व जळगांव जामोद मतदार संघातील मतदान केंद्र
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक (सामान्य) भंवरलाल मेहरा दाखल आहेत. त्यांच्याकडे खामगांव, जळगांव जामोद व मेहकर विधानसभा मतदासंघाची जबाबदारी आहे. त्यांनी 11 ऑक्टोंबर 2019 रोजी खामगांव व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये जळगांव जामोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा मतदान केंद्र, पिंपळगांव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्र, जिल्हा केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगांव, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा खेर्डा, बुरूंगले विद्यालय शेगांव, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर परिषद प्राथमिक शाळा शेगांव यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे 10 ऑक्टोंब रोजी मेहकर, जळगांव जामोद व खामगांव विधानसभा मतदारसंघातील इव्हिएम व व्हिव्हिपॅट यांच्या रँण्डम पद्धतीच्या जोडणीवेळी संबंधित ठिकाणी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधींसुद्धा उपस्थित होते.
No comments:
Post a Comment