नोकरीवर परतण्याचे वाहनचालकांना आवाहन

बुलडाणा,दि.04(जिमाका): भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) अन्वये 10 वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या तरतुदीबाबत ट्रकचालकांच्या चिंतेची भारत सरकारने दखल घेतली आणि आज ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. हे नवे कायदे आणि तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत हे निदर्शनास आणून द्यायचे आहे. भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) लागू करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल, हे देखील सूचित करू इच्छितो. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि सर्व ड्रायव्हर्सना आपापल्या नोकरीवर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या