बांधकाम कामगारांनी खोट्या अमिषाला बळी पडू नये

बुलडाणा, दि.01 (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा कार्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने केले जाते. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येत असून, त्यांची रितसर पावतीही देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडुन कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या अमिषाला बळी न पडता नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे. याबाबबीत आपली फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी