पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये...
बुलढाणा, दि.21 :- जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय सोयाबीन,तुर,मुंग,उडीद,कपाशी बियाण्याची पेरणी करू नये.असे आवाहन जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी खरीप हंगाम सन २०२३-२४ निमित्त शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची शेतातील जमिनीची ओल ४ ते ६ इंच किंवा १०० मी.मी.पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाण्याची पेरणी करू नये, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नंसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेले बियांण्याचे अंकुरण होणार नाही किंवा अंकुरण होऊन जळण्याची भीती आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकऱ्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता कृषी विभागाच्या संदेशानुसार १०० मी.मी.पाऊस पडल्यानंतरच किंवा जमिनीची ओल ४ ते ६इंच किंवा जमिनीमधील उष्णता जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.काही शेतकरी धूळ पेरणी करीत असल्यामुळे शेतकरी बांधवाना विनंती करण्यात येते की,आपण कोणत्याही पिकाची पेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल म्हणजेच जमीन ४ ते ६ इंच ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
खरीप हंगाम सन २०२३ मध्ये मुबलक प्रमाणात बियाणे व रासायनिक खताची उपलब्धता झालेली आहे. जिल्ह्यात एकूण बियाणे १,१९,०३३ क्विटल बियाण्याची मागणी केली असून सद्या १,०१,१९० क्विटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे. त्यापैकी २७,४१८ क्विटल बियाण्याची जिल्ह्यात विक्री झालेली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२३ मध्ये ४,०१,४४३ हे. सोयाबीन पेरा क्षेत्र असून शेतकरी बंधूनी घरचे जतन करून ठेवण्यात आलेले सोयाबीन बियाणे ४,४०,१८५ क्विटल राखून ठेवलेले असून घरगुती बियाण्याची बीज उगवण क्षमता चाचणी करून बीज प्रक्रिया करून मगच पेरणी करण्यात यावी. कापूस बियाणे १०,४४,८५५ पाकिटे बाजारात उपलब्ध असून त्यापैकी ६,७९,१५५ कापूस बियाणे पाकिटे विक्री झालेले आहे. शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते कि, कापूस बियाणे मध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे असून भरपूर प्रमाणात उत्पन्न देणारे आहे. सोशल मिडिया तसेच अफवांवर शेतकरी बंधू यांनी विश्वास ठेवू नये व विशिष्ट वाणांचा आग्रह न धरता जादा दराने कापूस बियाणे खरेदी करू नये. जर जिल्ह्यात कृषि केंद्र परवानाधारकाकडून बियाणे व रासायनिक खताची खरेदी करतांना कमाल विक्री किंमत (M.R.P.) पेक्षा जादा दराने विक्री करीत असल्याचे निदर्शनासआल्यास जिल्हा मध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असुनसदर तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक ०७२६२-२९९०३४, ९५२७५४६९८३तसेच टोल फ्री क्रमांक१८००२३३४०००या क्रमांकावर सुध्दा संपर्क करता येईल. सोबतच अडचणी किंवा तक्रारवर सुध्दा dsaobuldana.qc@gmail.comमेल द्वारे पाठवता /नोदवता येईल. बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची रचना खालील प्रमाणे राहील. तसेच तक्रार जिल्हा व तालुकास्तरावर सुध्दा नोंदविता येईल.
शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येते की, खरीप हंगाम सन २०२३ मध्ये मुबलक प्रमाणात सर्व प्रकारचे रासायनिक खते उपलब्ध आहे. तरीही काही कृषि सेवा केंद्रावर परवानाधारक हे शेतकऱ्यास मागणी केलेल्या खतासोबत इतर खते खरेदी करण्याचा आग्रह कृषि सेवा केंद्र धारक शेतकऱ्यांना करीत आहे असे निदर्शनास आले आहे. तरी शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते कि, जादा दराने खत विक्री व रासायनिक खतांसोबत इतर खते कृषि सेवा केंद्र धारक देत असल्यास जिल्हा मध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असुनसदर तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक ०७६२-२९९०३४, ९४०४१९३१४० तसेच टोल फ्री क्रमांक१८००२३३४०००या क्रमांकावर सुध्दा संपर्क करता येईल. सोबतच अडचणी किंवा तक्रारअसल्यास dsaobuldana.qc@gmail.comमेल द्वारे पाठवता /नोंदवता येईल. बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची रचना खालील प्रमाणे राहील. तसेच तक्रार जिल्हा व तालुकास्तरावर सुध्दा नोंदविता येईल.
जिल्हास्तरावर (कृषिविभाग, जि.प. कार्यालय)
अ.क्र. | नांव | पदनाम | भ्रमणध्वनीक्र. | कार्या. फोननं. |
1 | श्री. व्ही.एल. खोंदील | मोहिम अधिकारी | 7588041008 | 07262-242343 |
2 | श्री.जे.एस. वायाळ | ग्राम विकास अधिकारी | 9404439004 |
तालुकास्तरावर(कृषिविभाग, प.सं. कार्यालय)
अ.क्र. | तालुका | नांव | पदनाम | भ्रमणध्वनी क्र. |
1 | बुलडाणा | श्री.राहाणे, | कृषि अधिकारी बुलडाणा | 9423961006 |
श्रीमती प्रीती पाटील | कृ.अ.पं.स. बुलडाणा | 8378874711 | ||
2 | चिखली | श्री.आर आर येवले, | कृषि अधिकारी चिखली | 7038206077 |
श्री.एस.आर.सोनुने | कृ.अ.पं.स. चिखली | 9404034477 | ||
3 | मलकापुर | श्री. गजानन पखाले, | कृषि अधिकारी मलकापुर | 9049066291 |
श्री एस जे तिजारे | कृ.अ.पं.स. मलकापुर | 7588502599 | ||
4 | मोताळा | श्री. वाय.बी .महाजन , | कृषि अधिकारी मोताळा | 8788399130 |
श्री.एस.ए.गवई | कृ.अ.पं.स. मोताळा | 7588689686 | ||
5 | खामगाव | श्री. गजानन इंगळे, | कृषि अधिकारी खामगाव | 9527765549 |
श्री. संजय राऊत | कृ.अ.पं.स. खामगाव | 8275329543 | ||
6 | शेगांव | श्री.यु.के.जायभाये, | कृषि अधिकारी शेगाव | 9313846621 |
श्री.यु.के.फुटाणे | कृ.अ.पं.स. शेगाव | 9420963268 | ||
7 | नांदुरा | श्री.शरद पाटील , | कृषि अधिकारी नांदुरा | 9405660033 |
श्री.ए.बी.चव्हाण | कृ.अ.पं.स. नांदुरा | 9423146207 | ||
8 | ज.जामोद | श्री. सावंत , | कृषि अधिकारी .जामोद | 9423001446 |
श्री. आर.एस. नावकार | कृ.अ.पं.स. ज.जामोद | 9423721795 | ||
9 | संग्रामपुर | श्री.एस.एन.पाटोळे, | कृषि अधिकारी संग्रामपुर | 9421890778 |
श्री. आर.एस. नावकार ( | कृ.अ.पं.स. संग्रामपुर | 9423721795 | ||
10 | मेहकर | श्री.उद्धव एस काळे , | कृषि अधिकारी मेहकर | 7020278840 |
श्री. एस.आर. परिहार | कृ.अ.पं.स. मेहकर | 9511786145 | ||
11 | लोणार | श्री.एस.एन.कावरखे , | कृषि अधिकारी लोणार | 9921800999 |
श्री. एस.बी.गायकवाड | कृ.अ.पं.स. लोणार | 9423417044 | ||
12 | सि. राजा | श्री. गणेश सावंत , | कृषि अधिकारी सि.राजा | 9420082942 |
श्री. अंकुश म्हस्के | कृ.अ.पं.स. सि.राजा | 9130407647 | ||
13 | दे. राजा | श्री. नामदेव जिंदे, | कृषि अधिकारी दे.राजा | 9834040619 |
श्री. कुणाल चिंचोले | कृ.अ.पं.स. दे.राजा | 8275231914 |
निरोगी, सुदृढ व दीर्घ आयुष्यासाठी दररोज योगा करणे आवश्यक --
डॉ.ह.पि.तुम्मोड जिल्हाधिकारी, बुलढाणा
बुलढाणा, दि.21 :- क्रीडा व युवक सेवा संचालनलय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा, जिल्हा प्रशासन, बुलढाणा, शिक्षण विभाग (माध्यमिक, प्राथमिक), नेहरु युवा केंद्र, आयुष मंत्रालय, बुलढाणा जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, स्काऊट-गाईड, ए.एस.पी.एम.आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, बुलढाणा जिल्हा एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योगांजली योग वर्ग, आरोग्य विभाग, ब्रम्हाकुमारीज व बुलढाणा जिल्ह्यातील योगक्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2023 रोजी सकाळी 7.00 ते 7.45 वाजेपर्यंत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या योगदिन कार्यक्रमाकरीता शहरातुन जवळपास 3000 योगप्रेमी नागरीक यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी मा.डॉ.ह.पि.तुम्मोड जिल्हाधिकारी बुलढाणा, मा.श्रीमती भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, मा.श्री.गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा, मा.श्री.प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलढाणा, मा.डॉ.राजेश्वर उबरहंडे, श्री.अजयसिंग राजपुत नेहरु युवा केंद्र यांनी दिप प्रज्वलन करुन, 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मा.श्री.धनंजय गोगटे अपर जिल्हाधिकारी बुलढाणा, मा.श्री.सदाशीव शेलार निवासी उपजिल्हाधिकारी, मा.श्री.रुपेश खंडारे तहसिलदार, मा.श्री.गणेश पांडे मुख्याधिकारी नगर परिषद, सौ.साधना रविंद्र देशमुख आयुष मंत्रालय, श्री.पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, डॉ.भागवत भुसारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, श्री.खरात शिक्षणाधिकारी (प्राथमिक), श्री.चित्तरंजन राठी विभाग संघचालक, इंडीयन मेडीकल असोसिशनचे अध्यक्ष मा.डॉ.अजित शिरसाट, इंडीयम डेंटल असासिएशनचे अध्यक्ष डॉ.शरद जुमडे, होमीओपॅथीचे अध्यक्ष डॉ.दुर्गासिंग जाधव, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले, बुलढाणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे श्री.राजु पाटील व विविध पदाधिकारी, पर्यावरण मित्र मंडळ, सुर्योदय योगा ग्रुप, निमा, क्रीडा भारतीचे श्रीकृष्ण शेटे, रविंद्र गणेशे, नेहरु युवा केंद्राचे श्री.अजयसिंग राजपूत, स्काऊट-गाईडचे श्री.सुभाष आठवले, श्री.सय्यद दाऊद, शकील सर, मंजेश मुंढे, प्रा.नंदु गायकवाड, प्रा.डॉ.कैलास पवार, प्रदीप देशमुख, दिनेश गर्गे, सुनिल देवरे, संदीप पाटील, गजेंद्रसिंह राजपुत, मंजितसिंग राजपूत, विजय वानखेडे, अखिल भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, राजेश डिडोळकर, विविध पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, इत्यादी मान्यवर योगप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मा.डॉ.ह.पि.तुम्मोड जिल्हाधिकारी यांनी आपले मार्गदर्शनात सांगीतले की, देशभरात प्रत्येक ठिकाणी हजारो नागरीक योग दिनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतात व निरामय आयुष्य जगण्याची जिवनशैली अंगीकारत आहेत. दररोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते. तर दुर्धर आजारांवर सुध्दा मात केल्या जाऊ शकते. योगामुळे मन व शरीर शुध्द करुन सुदृढ आयुष्य जगता येते. तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक जगता येते असे सांगीतले व उपस्थितांना 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तर मा.श्रीमती भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांनी दररोज योगा करण्याचे आवाहन केले आणि शुभेच्छा प्रदान केल्या.
सदर 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाचे निर्देशीत मानकानुसार, प्रात्यक्षीक सौ.अंजली परांजपे, श्री.प्रशांत लहासे, श्री.भुषण मोरे व श्री.सचिन खाकरे, श्रीमती निर्मला दिदी, सौ.अनिता सावळे, श्री.अच्युतराव उबरहंडे, बालयोगी क्षितीज निकम, साई वानखेडे यांनी सादर केले. या कार्यक्रमात उपस्थितांना योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह तसेच प्राणायम, कपालभाती, अनुलोम विलोम, हे प्रकार करुन घेतले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. शेवटी श्री.सचिन खाकरे, श्रीमती निर्मला दिदी यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जागतिक योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदीर, शारदा ज्ञानपीठ, पोदार इंटरनॅशनल स्कुल, सेंट जोसेफ इंग्लीश स्कुल, भारत विद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग महाविद्यालय, ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालय, ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालय, इत्यादी शाळांमधील मुले व मुलींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे शेवटी डॉ.लता भोसले (बाहेकर) यांनी व्यसनमुक्तीची सर्वांना शपथ दिली. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार श्री.अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. या कार्यक्रमाकरीता श्री.संजय मनवर वरिष्ठ लिपीक, श्री.सुरेशचंद्र मोरे, श्रीमती वैशाली उबरहंडे मॅडम विस्तार अधिकारी, श्री.मनोज श्रीवास, श्री.विनोद गायकवाड, श्री.भिमराव पवार, श्री.कृष्णा नरोटे, श्री.गणेश डोंगरदिवे, श्री.सुहास राऊत, श्री.हर्षल काळवाघे, श्री.दिपक जाधव, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-24
बुलडाणा, दि.21 :- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे विभागाकडून शासन निर्णय क्रमांक अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-
योजनेच्या अटी व शर्ती- मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना सदर योजनांचा लाभ दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for providing education in madrasa या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मतदशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णयात नमुद पायाभूत सुविधांसाठी रु 2 लाख अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्य प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जास्तीत जास्तम 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल शिक्षणसाठी हिंदी/इंग्रजी/मराठी/उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक राहील. सदर अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयानुसार अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी mdd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्हयातील इच्छुक मदरसांनी अल्पसख्यांक विकास विभाग, शासन निर्णयानुसार नमुद किलेला विहीत नमुन्यातील पिरपूर्ण अर्ज आवश्यक कागपदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दिनांक 30 जून 2023 पर्यंत सादर करावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
. अल्पसंख्याक शाळा,महाविद्यालय पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरण
बुलढाणा, दि.21 :- अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 7.10.2015 अन्वये अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानती /विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळांमध्ये पायाभुत सोयी- सुविधा अनुदान योजनेतंर्गत वार्षिक कमाल 2 लाख अनुदान उपलब्ध होणार आहे. योजनेच्या अटी व शर्ती- शासनमान्य खाजगी अनुदानातील/विना अनुदानित/ कायम विना अदुनदानित शाळा, कनिष्ठ माहविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था व न.प. शाळांमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मन्यता प्राप्त अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
सदर योजनेतंर्गत पायाभुत सुविधांसाठी अनुदान देय राहील- शाळेच्या इमारतचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे . ग्रंथालय अद्यावत करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, संगणक कक्ष उभरण व अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/ डागडुजी करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, वर्ग खोल्यामध्ये आवश्कतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे. इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्यापनाची साधने एल.सी.डी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इत्यादीइंग्रजी लॅग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर/ सॉफटवेअर. इत्यादी सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प. शाळ यांनी शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभाग. क्रामंक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 07.10.2015 नमुद कागपदत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण अर्ज /प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे 30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपांची यांदी MDD.MAHARASHTRA.GOV.IN
No comments:
Post a Comment