हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाला 23 जून पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि. 13 : ओडिशा राज्यातील बरगढ येथील भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमाकरिता राज्यातून १३ आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी १ जागा, तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पसकरिता २ जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता दि. २३ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेश अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना आणि माहितीसाठी प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, बी विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांच्याकडून प्राप्त करावा. तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 यावर संपर्क साधून माहिती घेता येईल. अर्जाचा नमुना आणि विहित पात्रता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे.
00000
खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिक, बियाण्याचे वितरण
बुलडाणा, दि. 13 : यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, अन्नधान्य पिके, खाद्य तेल अभियान गळीत धान्य आणि तेलताड, तसेच राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता आणि मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिक आणि बियाणे वितरणात तूर, मुंग, उडीद आणि सोयाबीन पिकांचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरण सुरु करण्यात आले आहे. हे बियाणे महाबीज, एनएससी आणि कृभको यांच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सोयाबीन पीक प्रात्यक्षिकासाठी १० वर्षाआतील वाणास ४५ रूपये प्रती किलो अनुदान आहे. अनुदानित दर ५५ रुपये प्रती किलो आहे. तसेच सोयाबीन बियाणे वितरणामध्ये १० ते १५ वर्षामधील अधिसूचित वाणास अनुदान ४० रूपये प्रती किलो आहे. अनुदानित दर ६० रूपये प्रती किलो आहे. तूर, मुंग, उडीद पिकाच्या १० वर्षांच्या आतील वाणास ५० रूपये प्रती किलो अनुदान आहे. तूर, मुंग, उडीद पिकाच्या १० वर्षांवरील वाणास २५ रूपये प्रती किलो अनुदान आहे. उर्वरीत रक्कम ही शेतकऱ्यांनी स्वतः भरावयाची आहे.
योजनेचा लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधून अनुदानित दरावर मिळणाऱ्या बियाण्याचे परमिट प्राप्त करून घ्यावे. महाबीज, एनएससी आणि कृभको यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
शास्त्रीय पध्दतीने करा बीजप्रक्रिया व तपासा बियाण्याची उगवणक्षमता
बुलडाणा,
दि.13 :- बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी
जमिनीतून किंवा बयिाण्यातून पसरणारे विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
तसेच वियाण्याची उगवणक्षमता वाढवण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी
बियाण्यांवर वेगवेगळया जैविक व रसायनिक औषधाची प्रक्रिया केली जाते त्याला
बीजप्रक्रिया असे म्हणतात. जमिनीतून किंवा बियाण्याव्दारे पसरणाऱ्या रागाचा
प्रादुर्भाव टाळता येतो. बिजप्रक्रिया कमी खर्च येतो, त्यामुळे कीड व रोगाचे
नियंत्रण किफायतशीर पध्दतीने करता येते. बीज संस्काराच्या पारंपारिक पध्दती- बी
गरम पाण्यात भिजत ठेवणे, बी थंड पाण्यात भिजत ठेवणे, कोरड्या बियांना औषध चोळणे,
रोपांची मुळे द्रावणात बुडून ठेवणे.
सोयाबीन- थायोमिथेक्झाम 30 टक्के
एफ.एस. 10 मिली प्रति 1 किलो बियाणे (कार्बोक्झीम 37.5 टक्के+थायरम 37.5 टक्के
मिश्र घटक)-3 ग्रॅम प्रती किलो बियाणे.तूर- ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलसे
बियाणे, कापूस- कार्बोक्झीम 1 ग्रॅम प्रती किलो बियाणे, मका व ज्वारी
-ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रती किलो .
0000000
आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत आभा ॲपवरुन
होणार रुग्णांचे केसपेपरची नोंद
बुलडाणा,
दि.13 :- बुलडाणा जिल्हा शासकीय
रुग्णालयातील पोर्चमध्ये नेहमीच केस पेपर काढण्यासाठी रुग्णाच्या लागलेल्या रांगा
आता कमी होणार आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात
मोबाईल ॲपव्दारे रुग्णांना केस पेपर देण्याची सुविधा सुरु करण्यात आली असून,
दिवसभरात रुग्णालयातील आभा या विशेष कक्षातून रुग्णांना डिजीटल केस पेपर देण्यात
येत आहेत.
जिल्हयातील शासकीय रुग्णालयात शहरी
तसेच ग्रामीण भागतून मोठया संख्येने दररोज रुग्ण वैद्यकीय तपासणीकरिता व
उपचारासाठी येतात. जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर या रुग्णांना केस पेपर काढण्यसाठी रांगेत उभे राहावे लागते. मोठी रांग
असल्यामुळे अनेकदा वेळ संपून गेल्यानंतरही
केस पेपर मिळत नाही. केसपेपरसाठी लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी आता डिजिटल
ॲपव्दारे केस पेपर सुविधा ॲपवर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
भागवत भुसारी, यांचा पहिला डिजिटल केय वेवा काढून या सुविधेला प्रारंभ करण्यात
आला. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, अति. जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ खर्चे, नि.वै.अधिकारी डॉ. यास्मिन चौधरी, फॅसिलीटी मॅनेजर अमोल गिरी,
केसपेपर विभागतील शेख कदीर, गणेश गायकवाड, सागर सातपुते, सावन राजपूत, शाम उबरहंडे,
यश अंभोर , हर्शल चिंचोले, निलेश
जुमडे,अमोल सावळे आदी उपस्थित होते.
000000
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-24
बुलडाणा,
दि.13 :- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक
विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे विभागाकडून शासन निर्णय क्रमांक
अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दिनांक 11
ऑक्टोंबर 2013 च्या तरतुदीनुसार डॉ. झाकीर हुसेन
मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत जिल्हयातील जे मदरसा धर्मदाय आयुक्त अथवा
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रथालयासाठी
व शिक्षकांच्या मानधनसाठी शसान स्तरवरुन अनुदान उपलब्ध होणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती- मदरसा
चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत.
अशा मदरसांना सदर योजनांचा लाभ दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for providing education in madrasa या
केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मतदशांना ही योजना अनुज्ञेय
राहणार नाही. शासन निर्णयात नमुद पायाभूत सुविधांसाठी रु 2 लाख अनुदान देय आहे.
यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्य प्रयोजनासाठी पुन्हा
अनुदान अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जास्तीत जास्तम 3
डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल शिक्षणसाठी हिंदी/इंग्रजी/मराठी/उर्दु
यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक राहील. सदर
अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय
असणार नाही. शासन निर्णयानुसार अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी
mdd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्हयातील इच्छुक
मदरसांनी अल्पसख्यांक विकास विभाग, शासन निर्णयानुसार नमुद किलेला विहीत
नमुन्यातील पिरपूर्ण अर्ज आवश्यक कागपदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी
कार्यालय, बुलडाणा येथे दिनांक 30 जून 2023 पर्यंत सादर करावे व सदर योजनेचा लाभ
घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद
घ्यावी.
0000000
सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीचे अष्ठसूत्री
बुलडाणा, दि.13 :- सुधारित वानाकरीता 67% बियाणे घरगुती पद्धतीने
शेतातील जतन केलेले बियाणे पेरणीसाठी
वापरले जाते,म्हणून बियाण्याची प्रतवारी स्पायरल सेपरेटरवर करावी.
बियाणे उगवणशक्ती तपासणीच्या घरगुती पद्धती – सोयाबीनचे
बियाणे नाजूक असल्यामुळे पेरणीपूर्वी
बियाणे उगवणशक्तीची
खात्री करणे आवश्यक आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता 70% असेल तर
प्रति हेक्टर 65 किलो बियाणे वापरावे. उगवण
क्षमता त्यापेक्षा कमी
असल्यास त्याच प्रमाणात बियाण्याचे प्रमाण
वाढवावे.
सोयाबीनच्या 100 बिया घ्या(जे
वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण बियाणाचे
प्रतिनिधित्व करतील) खालील पैकी कोणत्याही पद्धतीने 10X10 बियाणे ओळीत ठेवा, ते गुंडाळा आणि4 ते 5 दिवस
सावलीत ठेवावे.पाच दिवसांनतर अंकुरित बियाणे मोजा आणि अंकुरित बियांची टक्केवारी काढावी. 60
% पेक्षा कमी उगवण असल्यास ते बियाणे म्हणून वापरले जाऊ नये.
बीज
प्रक्रिया – बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
रासायनिक बीजप्रक्रिया – पेरणीपूर्वी दोन महिण्या अगोदर किंवा एक दिवस पेरणी पूर्वी कार्बोक्झीन37.5 टक्के3 ग्रॅम + थायरम3
ग्रॅम/प्रति किलो बियाण्यास लावावे. खोडमाशीकरीता थायोमेथोक्झाम 30
टक्के एफ.एस.6 मी.ली./किलो.रस शोषणाऱ्या
किडीसाठी
इमीडाक्लोप्रीड
1.5 मी.ली./किलोबियाणे लावावे.
जैविक बीजप्रक्रिया –(रायझोबियम+पी.एस.बी+के.एम.बी)
25 ग्रॅम किंवा6 मी.ली./किलो व ट्रायकोडर्मा5
ग्रॅम किंवा 6 मी.ली./
किलो
पेरणी पूर्वी दोन तास अगोदर करून बियाणेसावलीत
पेरणी करावी.
सुधारित वाण – दहा वर्षाच्या आतील प्रसारित
झालेल्या वाणाचाच वापर करावा.
§ MACS-1188(2013), NRC-86
(2015) ,KDS-753 (PhuleKimaya)(2017), AMS-1001
Yellow gold (2019)
§
MAUS
162(2014),KDS -344(PhuleAgrani)(2015),JS-20-98(2017),AMS-MB-5-18 Suvarn soya (2019)
§
JS-20-29(2014), JS -20-69(2016), MAUS612 (2018), KDS -992(2021) , JS-20-34 (2014) ,MACS-1460 (2016) ,KDS-726 (PhuleSangam)(2019) ,MACS-1407
(2021).
पेरणी व पेरणीची खोली
सतत दोन ते तीन दिवसात 75 ते 100 मिमीपाऊसअथवा
6 इंच जमीन ओली झाल्यांनतर, वापसा
आल्यानंतर पेरणी करावी. ट्रँक्टरव्दारे
पेरणी करतांना रासायनिक खताची नळी फणाच्या
खालच्या छिद्रात लावण्यात आल्याची खात्री करावी. पेरणी करीत असतांना बियाणे 3 ते 5 से.मी. खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. बियाण्याच्या 5 से.मी. खाली खताची
पेरणी होत असल्याची खात्री करावी.
ट्रँक्टरव्दारे पेरणीकरतांनाट्रँक्टर
सेंकड लो गेअर मध्ये1.96 RPM ठेवून प्रतितास5 की. मी.या वेगाने चालविण्यास साधारण 45 ते 52 मिनिटात एक एकर
पेरणी होते.ज्या भागात 750 मी.मी. पेक्षा जास्तपाऊस पडतोअशा ठिकाणी बहुपीक पेरणी यंत्राने पेरणी करतांना प्रत्येकसातओळीनंतर
60 से. मी. रुंदीच्या खोल मृत सरी पाडावी.
पेरणीची पद्धत व बियाणे मात्रा / एकर
§
वहूपिक
पेरणी यंत्राचा वापरकेल्यास26 किलो/ एकर,
§
बीबीएफ
व्दारे पेरणी केल्यास 22 किलो/एकर,
§
सरी
वरंब्याटोकण पद्धतीने14 ते 16 किलो/ एकर,
§
आंतरपिक
सोयाबीन+ तूर(4:1) 20.80 किलो सोयाबीन +(1.60 किलो तूर + फिलर दाणेदार खत 3.40 किलो),
§
आंतरपीक
सोयाबीन + तूर(4:2) 17.32 किलो सोयबीन +(2.65 किलोतूर+ फिलर दाणेदार खत 1.35 किलो),
§
आंतरपीक
सोयाबीन + तूर(6:1)22.27 किलो सोयबीन + (1.15 किलो तूर + फिलर दाणेदार खत 2.85
किलो),
टीप – आंतरपिक पद्धतीमध्ये तूर बियाणे वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड केल्यास तूर
उधळण्याचे प्रमाण कमी होऊन मर्यादित
रोपसंख्या राखल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होण्यास मदत होते .
रासायनिक खत मात्रा / एकर(12:30:12)
सोयाबीन पिकाकरीता प्रति एकर खालीलप्रमाणे डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला यांच्या शिफारशीनुसार खते द्यावी.
§
युरिया
26 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 187.5 किलो+म्युरेट ऑफ पोटश 20 किलो हि सरळ खते उपलब्ध नसल्यास
खालील प्रमाणे संयुक्त खत/ मिश्र खतामधून मात्रा द्यावी.
§
20:20:0:13
-60 किलो+ एस.एस.पी. 112 किलो+19 किलो एम. ओ. पी. (20:20:0:13 या खतामध्ये गंधकउपलब्ध असल्याने अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही. हे खत गळीतधान्य पिकासाठी उपयुक्त आहे)
§
10:26:26
– 46 किलो+युरिया4 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 112 किलो.
§
12:32:16–
93 किलो+ युरिया 1 किलो+ गंधक 8 किलो.
§
डी.
ए. पी- 65 किलो+म्युरेट ऑफ पोटँश19 किलो+ गंधक 8 किलो.
§
15:15:15
– 79 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 112 किलो.
§
18:18:10
– 66.40 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 112 किलो+म्युरेट ऑफ पोटँश 9 किलो.
§ 24:24:00- 50 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट112 किलो+
म्युरेट ऑफ पोटँश 20 किलो.
§
16:16:16 – 75 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट112
किलो.
तणनाशकाचा वापर
जमिनीची संद्रीय कर्ब व प्रति ग्रँम जीवाणूची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक तसेच मशागतीय पद्धतीनेतण नियंत्रण करावे. अपवादात्मक
परिस्थितीतच तणनाशकाचा वापर खालीलप्रमाणे
करावा.
पेरणी नंतर लगेचचा फ्लूमीऑक्झीन 50% एस.सी. 5 मी.ली./10
लिटर पाणी याप्रमाणेघेऊन फवारणी करावी
किंवापेरणी नंतर 15 ते 20 दिवसाच्या तण दोन ते तीन पानावर असतांना इमँझीथायपर 20 मिली/ 10 लिटर पाणी, किंवा क्विझँलोपॉप
पी. इथाईल5 टक्के इ.सी 20 मी.ली./10 लिटरपाणी. यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नँपसँक पंपाव्दारेच करावी. तणनाशाकाच्या
फवारणी करीता गढूळ पाण्याचा वापरू नये, तणनाशकाची फवारणी करतांना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी
असावे त्याकरिता लिटमस पेपरव्दारे तपासणी करावी.
पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रिक अँसिडमिसळूनपाणी आम्लधर्मी करून वापरल्यास
तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणी करीत
असतांना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
00000
No comments:
Post a Comment