मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन घ्याव्यात
- तहसिदार मोताळा डॉ.सारिका भगत यांचे आवाहन
बुलढाणा, दि.20 :- भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तिवात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यकमांतर्गत दिनांक 20 जुलै 2023 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे ऑनलाईन मतदार नोंदणीबाबत नविन सॉफटवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना दयावायाचे आहे. केद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी जावून मतदारांची मतदार यादीतील आपले नाव व छायाचित्र व्यवस्थीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदाराचे अस्पष्ट/निकृष्ट दर्जाची छायाचित्र बदलने चांगल्या प्रतीचे छायाचित्रे सुनिश्चित करुन प्रतिमांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करणे ही कार्यवाही 22 ऑगस्ट 2023 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.
1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे पुनरिक्षण कायर्क्रमांतर्गत नाव समाविष्ट/वगळणी करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज निकाली काढण्यात येवून 30 सप्टेंबर 2023 ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत मतदारांची पुर्ण यादी तयार करण्यात येणार आहे. पुर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी 17 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येणार असून योबाबत आक्षेप/हरकती दाखल करण्यासाठी 17 ऑक्टोंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 हा कालावधी निश्चीत करण्यात आला आहे. प्राप्त दावे/ हरकती 26 डिसेंबर 2023 रोजी संबंधीत मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे.
1 जानेवारी 2024 रोजी जे मतदार वयाचे 18 वर्षे पुर्ण करणार असतील त्यांनी मतदार यादीमध्ये नावनोंदणी करीता आवश्यक पुराव्यासह नमुना 6 भरुन आपल्या संबंधित बी.एल.ओ. कडे द्यावे किंवा ऑनलाईन पध्दतीने www.nvsp.in या वेबसाईटवर किंवा ओटर हेल्पलाईन वर ॲपच्या माध्यमातुन आपले नावाची मतदान नोंदणी करण्यात यावे असे आवाहन तहसिलदार मोताळा डॉ. सारिका भगत तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी 022-बुलडाणा मतदान संघ यांनी केला आहे.
डासांमार्फत होणारे आजार दूर करण्याकरीता आरोग्य विभाग सज्ज
डेंग्यू, मलेरीया विषयी कंटेनर सर्वेक्षण सुरू
हिवताप प्रतिरोध महिन्यातंर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
बुलढाणा, दि.20 :- आरोग्य विभागामार्फत जून महिला हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्यातंर्गत विविध हिवताप नियंत्रण व जनजागृतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घरोघरी डेंगू, मलेरीया विषयी कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून माहिती पत्रकांच्या माध्यमातून डास अळी सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे आदींविषयी जनजागृती करीत आहे. पावसाळा सुरू झाला असून डासांची पैदास होवून आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांमार्फत होणारे आजार दूर करण्याकरीता आरोग्य विभाग सज्ज आहे.
विशेष डासामार्फत प्रसारीत होणारे हत्तीरोग, डेंगू, चिकनगुणीया, मलेरीया या रोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग कार्य करीत आहे. डेंगू आजारावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे व हा रोग जिवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधत्मक उपाययोजना राबविणे हा एकच योग्य मार्ग आहे. त्यामुळे या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. या उपक्रमातंर्गत आशांना रक्त नमुना घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, डास उत्पत्ती स्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या गॅस पाईपला जाळ्या बसविणे या विषयी प्रशिक्षीत करण्यात येत आहे.
तसेच त्यांच्यामार्फत हस्त पत्रिकांचे वाटपही करण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार , उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
नागरीकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावे, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, डास चावणार नाही अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती साधने नष्ट करावीत, एक दिवस कोरडा पाळावा व ताप असल्यास रूग्णालयाशी संपर्क करावा, भंगार साहित्य, कुलर्स, टायर्स, नारळाच्या कवट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके सर्व नष्ट करावे.
वीजा चमकत असताना सावधगिरी बाळगा
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 : - मान्सून कालावधीत सोसाट्याचा वाऱ्यासह तसेच विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्यस्थिती पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरु असून शेतकरी/शेतमजूरांनी तसेच नागरीकांनी याबाबत विशेष सतर्क रहावे. या कालावधीत विजा पडण्याचे शक्यता जास्त दिसुन येत आहे.त्या करीता जिल्हयातील सर्व नागरीकांना जिवीतहानी/प्राणहानी व वित्तहाणी टाळण्याच्या दृष्टीने नागरीकांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा सतर्कते राहण्याबाबत इशारा देण्यात येत असून उपाययोजना सुचविण्यात येत आहे.
वज्राघात – काय करावे, व काय काय करू नये? सतर्कतेची चिन्हे / चेतावणी चिन्हे : अति वेगाने वारे,अति पर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ,जवळचे झंझावत, जास्त कींवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.
वस्तुस्थिती : वीज हि सामान्यपणे उंच वस्तूवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही.परतुं काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे छोट्या किवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो.(16कि.मी., वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातमुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत/जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो त्या व्यक्तीस तात्काळ /त्वरित मदत करावी.
काय करावे
पूर्वतयारी :- आपल्या भागातील स्थानिक हवामानविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करावे. स्वतःसाठी व कुंटूबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वेद्यकिय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणाशी संपर्कात रहावे. वेंद्यकिय व स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे संपर्क क्रमांक ठेवावे जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेर /घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवण्यात यावे. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किवा फांद्या काढून टाकणे
तुमच्या परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे) / विजा चमकत असल्यास घरात राहावे.
घरात असल्यास :- घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराभोवतालच्या उंच झाडे,कुंपण यापासून दूर रहा, मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे.
घराबाहेर असल्यास :- त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, शेतीची अवजारे,मोटारसायकल,व इतर वाहने यांच्यापासून दूर रहा, गाडी चालवत असल्यास,सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयन्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडापासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात, उघड्यावर असल्यास,शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटकत्या विदयुत तारांपासून दूर रहा, जंगलामध्ये – दाट,लहान झाडांखाली,उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.
इतर खुल्या जागेवर :- दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयन्न करा(परंतु अचानक येणाऱ्या पुरापासून सावध रहा.)
वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास त्वरीत रुग्णवाहिका व वेद्यकीय मदत बोलवा, वज्राघात बाधीत व्यक्तीस त्वरीत वेद्यकीय मदत मिळवून द्या.त्याला हात लावण्यास धोका नाही, ओल्या व थड परिस्थितीतीत बाधीत व्यक्तीव जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा.जेणेकरून हायपोथरमियाचा (शरीराचे अति कमी तापमान)धोका कमी होईल.
अशा इजा झालेल्या इसमास हाताळा :- श्वसन बंद असल्यास:- तोडांवाटे पुनरुत्थान Mouth - to-Mouth प्रकिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास :- कुठलीही वेद्यकीय मदत मिळेपर्यंत रूग्णाची हृद्य गती CPR चा वापर करून सुरु ठेवा.
काय करू नये ?
गडगडाटीचे वादळ आल्यास,उंच जागांवर,टेकडीवर,मोकळ्या जागांवर समुद्र किनारी,स्वतंत्र झाडे,रेल्वे/बस सहलीची आश्रय स्थाने,दळणवळणाची टावर्स ध्वजाचे खांब,विद्युत दिव्याचे खांब, धातूचे कुंपण,उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.
घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रिक /इलेक्ट्रिकल उपकरणे विद्युत जोडणीस लाऊ नये.(अशा आपत्कालीनवेळी कॉरडलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे., गडगडीच्या वादळदरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्यत उपकरणांचा वापर करू नका, या दरम्यान आंघोळ करणे,हात धुणे,भांडी धुणे,कपडे धुणे,हि कार्ये करू नये, प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा.(धातूची तारे,खिडक्यांचीतावदाने,वायरीं
घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी,विजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका, वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा, अधांतरी लटकणाऱ्या/लोंबणाऱ्या (Cabeles)पासून लांब रहा, विजा चमकत असतांना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपरणे बंद ठेवावी. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे. घराबाहेर असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाजवळ उभे राहु नये. सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
0000000000
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ योजना 2023-24
बुलडाणा, दि. 20 : - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज किंवा अनुदान योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान व बिजभांडवल योजनेअंतर्गत एकूण 180 कर्ज प्रकरणांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट तसेच प्रशिक्षण योजनेअंतर्गत 360 प्रशिक्षणाचे उद्दिष्ट प्राप्त असून अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील पात्र अर्जदारांनी कर्ज व अनुदानाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो,आधार कार्ड रेशन कार्ड, दरपत्रक ई तसेच प्रशक्षिण घेऊ इच्छीनाऱ्या पात्र व्यक्तींनी शैक्षणिक खंड प्रमाणपत्रासह प्रस्ताव 31 ऑगस्ट 2023 पूर्वी महामंडळाने जिल्हा कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड बुलडाणा येथे सादर करावे असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एस.धांडे यांनी केले आहे.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-24
बुलडाणा, दि.13 :- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे विभागाकडून शासन निर्णय क्रमांक अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-
योजनेच्या अटी व शर्ती- मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना सदर योजनांचा लाभ दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for providing education in madrasa या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मतदशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णयात नमुद पायाभूत सुविधांसाठी रु 2 लाख अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्य प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जास्तीत जास्तम 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल शिक्षणसाठी हिंदी/इंग्रजी/मराठी/उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक राहील. सदर अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयानुसार अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी mdd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्हयातील इच्छुक मदरसांनी अल्पसख्यांक विकास विभाग, शासन निर्णयानुसार नमुद किलेला विहीत नमुन्यातील पिरपूर्ण अर्ज आवश्यक कागपदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दिनांक 30 जून 2023 पर्यंत सादर करावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
. अल्पसंख्याक शाळा,महाविद्यालय पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरण
बुलढाणा, दि.14 :- अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 7.10.2015 अन्वये अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानती /विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळांमध्ये पायाभुत सोयी- सुविधा अनुदान योजनेतंर्गत वार्षिक कमाल 2 लाख अनुदान उपलब्ध होणार आहे. योजनेच्या अटी व शर्ती- शासनमान्य खाजगी अनुदानातील/विना अनुदानित/ कायम विना अदुनदानित शाळा, कनिष्ठ माहविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था व न.प. शाळांमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मन्यता प्राप्त अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
सदर योजनेतंर्गत पायाभुत सुविधांसाठी अनुदान देय राहील- शाळेच्या इमारतचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे . ग्रंथालय अद्यावत करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, संगणक कक्ष उभरण व अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/ डागडुजी करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, वर्ग खोल्यामध्ये आवश्कतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे. इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्यापनाची साधने एल.सी.डी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इत्यादीइंग्रजी लॅग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर/ सॉफटवेअर. इत्यादी सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प. शाळ यांनी शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभाग. क्रामंक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 07.10.2015 नमुद कागपदत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण अर्ज /प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे 30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपांची यांदी MDD.MAHARASHTRA.GOV.IN या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
--
No comments:
Post a Comment