Wednesday, 7 June 2023

DIO BULDANA NEWS 07.06.2023

राज्यपाल रमेश बैस यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, दि. 7 : राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 10 जून 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल श्री. बैस शनिवार, दि. 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अकोला येथून निघून सायंकाळी 6 वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर विसावा गेस्ट हाऊस येथे राखीव. विसावा गेस्ट हाऊस येथून रात्री 8.45 वाजता शेगाव रेल्वेस्थानकाकडे निघून रात्री 9.03 वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000


लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 7 : लसीकरणामुळे अनेक आजारांचा प्रतिबंध करणे शक्य आहे. लसीकरण कार्यामध्ये सुधारणा करून वयानुसार करण्यात येणारे लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण सक्षमीकरण जिल्हा कार्य बल समितीची बैठक बुधवार, दि. ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रविण घोंगटे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सैय्यद, डॉ. रवींद्र गोफने, मो. मुदस्सीर, सपना म्हस्के, दिपक महाले, गिरीश जोशी उपस्थित होते.

बैठकीत नियमित लसीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. मुजीब सैय्यद यांनी गोवर रुबेला दुरीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

00000

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परिक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. 6 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहे. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधीबाबाची अधिसूचना mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश यांनी कळविले आहे.

00000

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, दि. 7 : केंद्रीय श्रम, रोजगार, वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव शुक्रवार, दि. 9 जून आणि शनिवार, दि. 10 जून 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

श्री. यादव यांच्या दौऱ्यानुसार, ते शुक्रवारी, दि. 9 जून रोजी हिंगाली येथून निघून सकाळी 8.30 बुलडाणा येथे पोहोचतील. सकाळी 8.30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यानंतर शेगावकडे प्रयाण करून मुक्काम करतील. शनिवार, दि. 10 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यानंतर ते सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment