Monday, 26 June 2023

DIO BULDANA NEWS 19.06.2023

 शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना घ्यावयाची काळजी

 

बुलढाणा, दि‍.19 :- खरीप हंगाम 2023-24 सुरु झाला असून, खरीप हंगामासाठी लागणारी बी बियाणे, रा. खते खरेदी सुरु झाली असुन अशातच बियाणे व खते खरेदी करतांना शेतकऱ्यांची होणारी फसवणुक टाळण्याकरिता आवश्यक ती काळजी  खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी.

शासन नोंदणीकृत विक्री केंद्रातून बियाणे, किटकनाशके, रासायनीक खते खरेदी करावी. बियाणे व खते खरेदी करतांना विक्री केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. बियाणे बॅग चे लेबल व बॅग जपून ठेवावी. बियाण्याची बॅग फोडतांना खालील बाजूने फाडावी व ती जपून ठेवावी. बियाणे व किटकनाशके खरेदी करतांना बियाणेचे बॅग वरील अंतीम तारीख पाहूनच खरेदी करावे. कापूस व सोयाबीन बियाणे खरेदी करतांना विशिष्ट एकाच वाणाचा खरेदी करतांना आग्रह करुन नये. बियाणे खरेदी करतांना बॅग वरील छापील किंमतीनुसारच खरेदी करावी. बियाणे व खते खरेदी करतांना छापील किंमतीपेक्षा विक्री केंद्रधारकाने जादा दराने मागणी केल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. बियाणेची पेरणी 100 मिमि पाऊस किंवा पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                        000000

 

21 जून, 2023 रोजी नवव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. - डॉ.ह.पि.तुम्मोड जिल्हाधिकारी, बुलढाणा

 

बुलढाणा, दि‍.19 :- प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या देशात व जगभरात योग साधनेचे अनन्य साधारण महत्व अधोरेखीत झालेले आहे.  गेल्या कित्येक दशकांपासुन भारतीयांची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झालेला आहे.  संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषीत केलेला आहे.  5000 वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यिभूत आहे. योगाभ्यासाच्या माध्यमातुन शिक्षीत, सुसंस्कृत व स्वस्थ नागरीक, युवक घडविण्यास तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे.  योग दिनाच्या आधारे जनतेमध्ये कायमस्वरुपी / चिरस्थायी जनहीत निर्माण करणे हे उद्दीष्ट आहे.  यावर्षी दि.21 जून, 2023 रोजी 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन आयुष मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिध्द स्थळांवर साजरा करण्याचे योजले असुन हा कार्यक्रम मा.पंतप्रधान व अनेक मान्यवर व्यक्तींचा सहभाग असणार आहे.  जिल्हा प्रशासन बुलढाणा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, शालेय शिक्षण विभाग (माध्यमिक/ प्राथमिक), आयुष मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, बुलढाणा जिल्हा योग संघटना, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम बुलढाणा, भारत स्काऊट-गाईड, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, आरोग्य विभाग, प्रजापिता ब्रम्हकुमारीज, एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, ए.एस.पी.एम.महाविद्यालय आयुर्वेद / नर्सिंग महाविद्यालये व आयुष मंत्रालय यांचे निर्देशीत मानकानुसार जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे सकाळी 6.30 ते 7.30 पर्यंत Common Yoga Protocal (CYP) नुसार योग प्रात्यक्षीक सादर करण्यात येणार आहे.  यासाठी बुलढाणा येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, योगप्रेमी नागरीक यांनी मोठ्या संख्येने दि.21 जुन 2023 रोजी, सकाळी 6.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे उपस्थित रहावे असे आवाहन मा.डॉ.ह.पि.तुम्मोड, जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

 

            त्याअनुषंगाने बुलडाणा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था व इतर सर्व आस्थापनांचे अधिकारी / कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नागरीक, युवक-युवती यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षीक साजरे करण्याकरीता दि.21 जून, 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे सहभागी व्हावे असे मा.डॉ.ह.पि.तुम्मोड, जिल्हाधिकारी, बुलढाणा, मा.श्री.प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, बुलढाणा व श्री.गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांनी आवाहन केले आहे.

                                                0000000000

 

 

नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा 

जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन

          बुलढाणा, दि‍.19  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा  जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावनां वृंध्दीगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मध्ये  चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धातील विजेत्यांना प्रथम रु. 1000/-, व्दितीय रु.750/- तृतीय रु.500/- असे  बक्षीस आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता आहे) यामध्ये प्रथम रु. 5000/-, व्दितीय रु.2500/- तृतीय रु.1250/- अशा प्रकारे बक्षीस देण्यात येणार आहेत.  या स्पर्धेकरीता पात्रता:- स्पर्धक हा बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असावा. वयोगट : दिनांक 01/04/203 रोजी वय 15 ते 29 वर्ष असावे.  तसेच मागील वर्षामध्ये झालेल्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना या मध्ये सहभागी होता येणार नाही. एका स्पर्धकाला फक्त एकाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
               या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असलेल्या पात्र युवक-युवतींनी  https://forms.gle/Eyw9ffrPTssFQeNa8 या लिंक वर आपल्या नावाची नोंदणी दिनांक 26/06/2023 पर्यंत करावी असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र बुलडाणा श्री नरेंद्, यांनी केले आहे.  
                                                                            00000000

No comments:

Post a Comment