Monday, 26 June 2023

DIO BULDANA NEWS 15.06.2023

 

सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

 

बुलढाणा, दि‍.14 :- जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार बुलढाणा जिल्हयातील 13 तालुक्यामधील 47 ग्रामपंचयातीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. आरक्षाणाची सोडत  विशेष ग्रामसभेची सूचना देणे दिनांक 16 जून 2023.

विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढणे (अनु. जाती महिला , अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) कार्यवाही पुर्ण करण्याचा अंतिम दिनांक 21 जून 2023.

प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब) मा. जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे दिनांक 23 जून 2023, प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे दिनांक 26 जून 2023, प्रभागनिहाय अरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 27 जून ते 3 जुलै 2023 राहील. उपविभागयीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्याची अंतिम दिनांक 7 जुलै 2023.

 

उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस नमुना अ मा. जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे अंतिम दिनांक 12 जुलै 2023, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला नमुना अ व्यापक प्रसिध्दी दिनांक 14 जुलै 2023. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी व आरक्षण सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा.

                                                            0000000

 

 

 

 

 

 

अल्पसंख्याक शाळा,महाविद्यालय पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरण

बुलढाणा, दि‍.14 :- अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 7.10.2015 अन्वये अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानती /विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळांमध्ये पायाभुत सोयी- सुविधा अनुदान योजनेतंर्गत वार्षिक कमाल 2 लाख अनुदान उपलब्ध होणार आहे.  योजनेच्या अटी व शर्ती- शासनमान्य खाजगी अनुदानातील/विना अनुदानित/ कायम विना अदुनदानित शाळा, कनिष्ठ माहविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था व न.प. शाळांमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मन्यता प्राप्त अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

सदर योजनेतंर्गत पायाभुत सुविधांसाठी अनुदान देय राहील- शाळेच्या इमारतचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे .  ग्रंथालय अद्यावत करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, संगणक कक्ष उभरण व अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/ डागडुजी करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, वर्ग खोल्यामध्ये आवश्कतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे. इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्यापनाची साधने एल.सी.डी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इत्यादी. इंग्रजी लॅग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर/ सॉफटवेअर. इत्यादी सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प. शाळ यांनी शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभाग. क्रामंक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 07.10.2015 नमुद कागपदत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण अर्ज /प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे 30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपांची यांदी  MDD.MAHARASHTRA.GOV.IN या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

                                                00000000

                  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज करण्याकरिता मुदत वाढ

         बुलढाणा, दि‍.14 :-  बुलडाणा जिल्हयातील  दिव्यांग विदयार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती अंतर्गत सन 2022-23 मध्ये  ज्या दिव्यांग विदयार्थ्यांनी दिव्यांग शिष्यवृत्ती करीता अर्ज सादर केलेले नाही अशा विदयार्थ्यांनी नविन अर्ज DBT या पोर्टलवर सादर करावे तसेच सन 2021-22 साठी  (Reapply) करण्याची  अंतिम तारीख 30.6.2023 पर्यंत देण्यात आलेली आहे.तरी सदर योजनेचा दिव्यांग  विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

                                                               0000000

पुरेशा पाऊसाशिवाय पेरणीची घाई नको

बुलढाणा, दि‍.14 :-  भारतीय हवामान खात्याने काल रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे असे जाहिर केले आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा  प्रवास कोंकण विभागातून विदर्भापर्यंत चालू होतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्हयात आगमन व्हायला 8 ते 12 दिवसांचा अवधी लागतो. या अनुसार जिल्हयात मान्सूनच्या पावसाचे आगमन 15 जून नंतर होईल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेसा पाऊस 75-100 मिमी पाऊस सलग दोन तीन दिवसात पडल्यानंतर व जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा व परेणी वाफसा परिस्थितीत करावी. पेरणीकरताना वापरण्यात येणारे बियांण्याचे वाण या बाबी अवार्जुन लक्षात घ्याव्यात. पावसाबाबत अद्यावत अंदाज प्राप्त होण्यासाठी व खरीप पिकांसाठी शेतीतील दैनंदिन कामांचे सुयोग्य व सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्याव्दारे आठवड्यातून दोनदा मंगळवार व शुक्रवार या प्रसारित व विस्तारित होणाऱ्या हवामान अधारीत कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा, खराब हवामान परिस्थितीत विजांपासून संरक्षण, सुरक्षा तथा जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करवा. असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, तं अधिकारी अनंता झाडे यांनी केले आहे.

                                                            0000000

खरीप हंगाम पिक प्रत्याक्षिके व बियाणे वितरण अंतर्गत प्रामणित बियाणे वाटप

            बुलढाणा, दि‍.14 :-  सन 2023-24 खरीप हंगामा मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा  आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके, खाद्य तेल अभियान गळीतधान्य व तेलताड तसेच राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता व मूल्यसाखळी विकास योजना अंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिके व बियाणे वितरण मध्ये तूर, मुंग, उडीद व सोयाबीन पिकाचे प्रामाणित बियाणे अनुदानावर वितरण सुरु आहे. सदर बियाणे हे महाबीज, एन.एस.सी व कृभको यांच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सोयाबीन पिक प्रात्यक्षिकासाठी 10 वर्ष आतील वाणास अनुदान रु 45 प्रती किलो आहे व अनुदानित दर रु 55 प्रती किलो आहे. सोयाबीन बियाणे वितरण मण्ध्ये 10 ते 15 वर्षामधील अधिसूचित वाणास अनुदान रु 40 प्रती किलो आहे व अनुदानित दर रु 60 प्रती किलो आहे.

            तूर, मुंग, उडीद पिकाच्या 10 वर्षाच्या आतील वाणास अनुदान रु 50 प्रति किलो आहे. तूर, मुंग उडीद पिकाच्या 10 वर्षाच्या वरील वाणास अनुदान रु 25 प्रती किलो आहे उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांनी स्वत: भरावयाची आहे. सदर योजनेचा लाभ मिळणेसाठी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्य तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षेक व कृषी सहाय्यक यांना संपर्क साधवा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तंत्र अधकारी अनंता झोडे यांनी केले आहे.

                                                                        000000000

No comments:

Post a Comment