कोरोना
अलर्ट : जिल्ह्यात 09 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 21
व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 09 सक्रीय
रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा
सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब
करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड
अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 56 अहवाल प्राप्त झाले
आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 56 अहवाल कोरोना
निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपिड
टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 56 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 731771 रिपोर्ट
निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86932 कोरोनाबाधीत रुग्ण
कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात
आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86932 आहे. आज
रोजी 19 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल
731771 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87615 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86932
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 09 सक्रीय रूग्ण
उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे
· महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना
· सहायक निबंधक, मलकापूर यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 3 (जिमाका) :
महाराष्ट्र शासनाने “महात्मा
ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019” ही महत्वाकांक्षी योजना घोषित केलेली असून सदर योजनेअंतर्गत पात्र
लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहे. योजनेच्या
निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र/ग्राहक सेवा
केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.
आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण
झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते.
ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार
प्रमाणिकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र / ग्राहक सेवा
केंद्रावर जाऊन कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंन्सिग चे पालन
करून तात्काळ आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण करावी. आधार प्रमाणीकरणासाठी 15
नोव्हेंबर 2021 ही अंतिम मुदत असून यापूर्वी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे
आवाहन महेश कृपलानी, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मलकापूर यांनी केले आहे.
************
सेवानिवृत्तांनी जिवन प्रमाण प्रमाणपत्र काढावे
·
डाक विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 3 (जिमाका) :
सेवानिवृत्त नागरिकांनी जिवन प्रमाण प्रमाणपत्र भारतीय डाक विभागाच्या इंडिया
पोस्ट पेमेंट बँकेद्वारे काढावे. या बँकेच्या माध्यमातून जवळच्या डाक कार्यालयात
जावून जिवन प्रमाण प्रमाणपत्र काढणे सहज शक्य आहे. तरी सेवानिवृत्त नागरिकांनी
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेवून आपले जिवन
प्रमाणप प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर ए. के इंगळे यांनी केले आहे.
***********
मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्यांचे मुग,
उडीद, सोयाबीनची खरेदी सुरु
· 25 जानेवारी 2022 पर्यंत चालणार खरेदी
. शेतकऱ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी सुरूच राहणार
बुलडाणा,(जिमाका) दि. 3: केंद्रशासनाच्या
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2021-22 करीता मुग 7275 रुपये, उडीद 6300
हजार रुपये व सोयाबीन 3950 रूपये प्रति क्विंटल हमीदराने नाफेडच्यामार्फत
शेतकऱ्यांचा मुग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. या खेरदीची अंतिम
मुदत 25 जानेवारी 2022 असणार आहे. तसेच शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन
नोंदणी सुरूच राहणार आहे. या खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्ह्यात 10 केंद्रांना
मान्यता देण्यात आली आहे.
त्यामध्ये तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती
मर्या देऊळगांव राजा, लोणार, मेहकर, शेगांव, संग्रामपुर, बुलडाणा तसेच मोताळा येथे
संत गजानन कृषी उत्पादक कंपनी व साखरखेर्डा ता.सिं.राजा येथे सोनपाऊल ॲग्रो
प्रोडयुसर कंपनी, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली केंद्र उंद्री ता.
चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा यांचा समावेश
आहे. या केंद्रामध्ये मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले
आहे.
ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्यांनी
या संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी.
एस. शिंगणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा
दौरा
बुलडाणा,(जिमाका) दि. 3: राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री रविवार 7 नोव्हेंबर
रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 7
नोव्हेंबर रोजी दु 12.43 वा मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
बुलडाणाकडे प्रयाण, दु 1.40 वा शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव, दु 4
वा तालुका क्रीडा संकुल, बुलडाणाच्या भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती, दु 4.30 वा सहकार
विद्या मंदीर येथे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व बुलडाणा जिल्हा धनुर्विद्या
संघटनाद्वारा आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा 2021 चे उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थिती, कार्यक्रम संपल्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, बुलडाणा
येथे आगमन व राखीव, सायं 7.30 वा बुलडाणा येथून मलकापूर रेल्वे स्थानकाकडे
प्रयाण्, रात्री 8.30 वा मलकापूर रेल्वे स्थानक येथे आमन व राखीव, रात्री 9 वा मलकापूर
येथून हावडा – पुणे आझादहिंद एक्सप्रेसने कोपरगांव जि. अहमदनगरकडे प्रयाण करतील.
***********
No comments:
Post a Comment