कोरोना अलर्ट : प्राप्त 194 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
- 2 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 195 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 194 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 89 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 194 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : अंजनी बु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून 2 रूग्णांना सुट्टी मिळाली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 736099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86955 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86955 आहे. आज रोजी 42 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736099 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86955 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे
* 73 आरोपींना केली अटक
बुलडाणा,(जिमाका) दि. 24: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 1 ते 23 नोव्हेंबर दरम्यान धडक मोहिमेत 82 गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच 73 वारस गुन्हे, 9 बेवारस गुन्हे नोंदवून 73 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे 680 लीटर हातभट्टी, 10771 लिटर सडवा, 251 लीटर देशी दारू, 54 लिटर विदेशी दारू व 5 वाहनासह एकूण 17 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धडक मोहिमेदरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रांजणी शिवार ता. लोणार येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीच्या इंडिका कार क्रमांक एमएच 28 सी 4789 वर कारवाई करण्यात आली. यावेळी कारमध्ये 86 लिटर देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. ही कारवाई चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने केली. सदर कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही पहाडे, जवान एस डी जाधव सहभागी होते. तसेच भरारी पथक बुलडाणाचे निरीक्षक आर. आर उरकुडे यांचे पथकाने एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल हातभट्टी वाहतूक करताना जप्त करण्यात आली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, जवान पी.ई चव्हाण, एन ए देशमुख, आर एस कुसळकर, अमोल तिवाने सहभागी होते.
आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.
*****
दिव्यांग व्यक्तींनी कृत्रिम अवयवासाठी नाव नोंदणी करावी
बुलडाणा,(जिमाका) दि. 24: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व आवश्यक सहाय्यक उपकरणे मोफत पुरविणेसाठी शिबिराचे आयोजन करावयाचे आहे. त्यानुसार आवश्यक त्या माहितीसह इच्छूकांनी alimco. csc-services.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. या नोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक , नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. तरी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
मोटार वाहन कायद्यातंर्गत राबविलेल्या विशेष मोहिमेत 5.55 लक्ष दंड वसूल
बुलडाणा,(जिमाका) दि. 24: जिल्ह्यात पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या सुचनेनुसार सर्व पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने मोटार वाहन कायद्यातंर्गत 3 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविली. यामध्ये वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाजाचे सायलेन्सर चालविणारे वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिटवर कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव श्रावण दत्त व बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट जागीच उतरून बदलविण्यात आल्या. विना नंबरचे वाहने पोलीस स्टेशनला आणून जप्त करण्यात आली. मोहिमेत एकूण 10 हजार 84 केसेस करण्यात आल्या तर 15 लक्ष 79 हजार रूपये दंड लावण्यात आला. यापैकी 5 लक्ष 55 हजार 800 रूपये दंडाची वसूली करण्यात अली. वाहनांवर करण्यात आलेल्या केसेस संदर्भात त्यांना प्राप्त एसएमएसनुसार तात्काळ सदरचा दंड जवळच्या वाहतूक अंमलदार यांचेकडे जावून भरणा करण्यात यावा. अथवा पाठविण्यात आलेल्या एसएमएसमध्ये ऑनलाईन पैसे भरण्या संदर्भात जी लिंक पुरविण्यात आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून ऑनलाईन पैसे वाहन धारक भरू शकतो. तरी सर्व वाहन धारकांनी नियमांचे पालन करून पोलीसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.
करण्यात आलेल्या केसेस व लावलेला दंड
फॅन्सी नंबर प्लेटसाठी 108 केसस व लावलेला दंड 1,08,000 रूपये, कर्कश हॉर्न व सायलेन्सर 10 केसेस व दंड 10 हजार, अवैध प्रवासी वाहतूकसाठी 54 केसेस, ट्रिपल सिटकरीता 735 केसेस व दंड 1,47,000 रूपये, विना लायसन्स वाहन चालविणे केसेस 3455 व दंड 6,91,000 रूपये, नो पार्किंग क्षेत्रात वाहन पार्क करणे केसेस 1519 व दंड 3,03,800 रूपये, विना सिटबेल्ट वाहन चालविणे केसेस 728 व दंड 1,45,600 रूपये, वाहनांचे कागदपत्रे जवळ न बाळगणे केसेस 233 व दंड 46600 रूपये, मोवाका अंतर्गत इतर केसेस 3242 व दंड 1,27,000 रूपये. अशाप्रकारे एकूण केसेस 10084 व लावलेला दंड 15,79,000 रूपये आहे.
No comments:
Post a Comment