Monday, 29 November 2021
DIO BULDANA NEWS 29.11.2021
कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 10 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 31 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 10 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 40 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 40 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपिड टेस्टमधील 27 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 40 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 736977 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86960 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86960 आहे. आज रोजी 35 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736977 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87645 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86960 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 10 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
थकबाकीदार शेतकऱ्यांनी पाणीपट्टी रकमेचा भरणा करावा
पाटबंधारे विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : पेनटाकळी ता. मेहकर या मोठ्या प्रकल्पातून दुधा, नांद्रा, कंबरखेड, सारंगपूर, अंत्री देशमुख व सोनाटी कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2021-22 करीता सिंचनासाठी पाणीपुरवठा केल्या जाणार आहे. तरी या बंधाऱ्यावरील सर्व सिंचन पाणीपट्टी थकबाकीदारांनी महासंघ किंवा शासकीय कार्यालयाकडे पाणीपट्टीची थकबाकी भरल्याशिवाय कुणीही मोटारपंप ठेवून पाण्याचा सिंचनाकरीता उपसा करू नये. अन्यथा मोटारपंप संस्था व पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग मेहकर यांचेमार्फत जप्तीची कार्यवही करण्यात येईल. तरी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी महासंघाकडे पाणीपट्टी रकमेचा भरणा करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.
*******
मतदारांनी मतदार यादीतील नमूद पत्त्याचा पुरावा सादर करावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : बुलडाणा विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 200, 201, 202 मधील मतदार संबंधीत यादी भागामध्ये राहत नसल्याबाबतच्या तक्रारी तहसिल कार्यालय, बुलडाणाकडे प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात येवून सदर वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, बुलडाणा यांचे www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सागर घट्टे, योगेश परसे, मंगेश बिडवे, कुणाल गवई, तेजस सुर्यवंशी, रमेश धोंडीराम परसे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करून असे नमूद केले आहे, की सदर मतदर हे मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याने त्यांची मतदार म्हणून नोंदणी रद्द करण्यात यावी. सदर तक्रार अर्जानुसार उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी सदर प्रकरणात चौकशी करण्याचे सूचीत केले आहे. त्यानुसार अनुषंगिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
या यादीतील सर्व मतदारांना निवडणूक शाखेमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मतदार यादीतील नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा निवडणूक शाखा, तहसील कार्यालय, बुलडाणाकडे 6 डिसेंबर पर्यंत सादर करावा. सदर मतदार हे मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी यापूर्वीच कळविले आहे. असे असतांनाही संबंधित मतदार यांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. मात्र जे मतदार 6 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा रहीवासाचा पुरावा सादर करणार नाहीत त्यांची नावे वगळण्याचा प्रस्ताव मतदार नोंदणी अधिकारी, बुलडाणा यांचेकडे सादर करण्यात येईल, असे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****
जिल्ह्यात 15 लक्ष 17 हजार 562 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 15,17,562 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 72.10 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 1 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 43 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 8 आहे. जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment