कोरोना अलर्ट :
प्राप्त 504 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,
(जिमाका) दि. 11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे
तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 504 अहवाल
कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये
प्रयोगशाळेतील 127 तर रॅपिड टेस्टमधील 377 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 504
अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह
आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे
जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 733273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86941 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86941 आहे. आज रोजी 126 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात
आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 733273 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण
87622 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86941 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 07 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674
कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली
आहे.
**********
जिल्हा उद्योग
केंद्रामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन योजनांची अंमलबजावणी
·
अनुसूचित
जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 11 :उद्योग संचालनालयाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा वार्षिक
अनुसूचित जाती घटक योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत तीन योजना राबविण्यात
येतात. यामध्ये सुधारीत बीज भांडवल योजना, कर्ज योजना व उद्योजकता प्रशिक्षण
योजनेचा समावेश आहे. सुधारीत बिज भांडवल योजनेत शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार
युवकांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलाच्या रूपाने अर्थसहाय्य करण्यात येते. यासाठी
प्रकल्पाची मर्यादा 25 लक्ष रूपयापर्यंत आहे. बीज भांडवल कर्जाचे प्रमाण बँकेने
मंजूर केलेल्या प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के असते. कर्जाची मर्यादा 3.75 लक्ष आहे. तसेच
बँकेचे कर्ज 75 टक्के असते. प्रकल्प खर्च 10 लक्षापेक्षा कमी असलेल्या प्रकल्पांमध्ये
बीज भांडवल कर्जाचे प्रमाण अनु. जाती, जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती, जमाती
आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 20 टक्के आहे. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज
सॉफ्टलोन म्हणून दरसाल 6 टक्के व्याजाने देण्यात येते. कर्जाच्या रकमेची विहीत
कालावधीत परतफेड करण्यात आली नाही, तर थकीत रकमेवर दरसाल दरशेकडा 1 टक्के दंडनीय
व्याज आकारण्यात येते. नियमित विहीत कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 3
टक्के रिबेट देण्यात येतो. म्हणजेच नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा दर 3 टक्के
प्रमाणे लागू राहतो.
कर्ज योजनेत निम्न शहरी व ग्रामीण भागात अतिलहान उद्योगांना
आर्थिक सहाय उपलब्ध करून त्यांचा विकास साधणे व याद्वारे अधिक रोजगार संधी व
स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू करण्यात आली
आहे. ही योजना जिल्हास्तरीय असून उद्योग संचालनालय तसेच त्यांच्या अधिपत्याखाली
येणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येते. यामध्ये 65 ते 75 टक्के
बँक कर्ज, अनुजाती, जमातीच्या लाभार्थ्यास 30 टक्के कमाल 60 हजार रूपये, स्वत:चे 5
टक्के भांडवल, बीज भांडवल परतफेड 4 वर्ष, व्याजदर 4 टक्के आहे.
तसेच
उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम योजना ही सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त
करण्याच्या दृष्टीने राबविली जाते. या कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण
शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा याकरीता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी
आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्च्या पद्धती
विक्रीकरीता आवश्यक बाबींची उपयुक्त माहिती दिली जाते. या योजनेत महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन व उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या अशासकीय
कुशल प्रशिक्षक संस्थामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये एक दिवसाचे अनिवासी
उद्योजकता परीचय कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमात व्यवसायाची निवड,
उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन शासनाच्या विविध संस्था व
अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था व त्यांचे मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती
दिली जाते. प्रति प्रशिक्षण कार्यक्रम 600 रूपये खर्च आहे. उद्योजकता विकास
प्रशिक्षण कार्यक्रम हा 12 दिवस निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय
कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगांशी संबंधित कलागुणांच्या विकास
व माहिती मिळण्याच्या प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे. प्रति प्रशिक्षणार्थी
4000 रूपये संस्थेस देण्यात येतात. तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम 15 दिवस ते 2
महिने अनिवासी आहे. या कार्यक्रमात उत्पादन, सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक
प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस 15 दिवसाकरीता
500 रूपये व दरमहा 1000 रूपये तसेच 2 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 2000
रूपये विद्या वेतन देण्यात येते. तसेच प्रति प्रशिक्षणार्थीस 3000 रूपये संस्थेस
देण्यात येतात. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे
आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
*********
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये
माजी सैनिकांसाठी पदभरती
·
12 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 335 सुरक्षा
रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील
सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी
लवकरात लवकर 12 नोव्हेंबर पर्यंत आपल्या डिस्जार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदवावे, असे आवाहन
सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.
या पदाकरीता माजी सैनिक 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा जन्म झालेला नसावा.
शिक्षण कमीत कमी 8 वा वर्ग पास किंवा 12 वी उत्तीर्ण असावा, सैन्य दलातील सेवा
कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्यदलातील हुद्दा जास्तीत जास्त हवालदार किंवा
त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड असावे, तसेच सैन्य
दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार, अपंगत्व नसावे. तो शारिरीकदृष्ट्या
सक्षम असावा, तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
******
शासकीय अध्यापक
महाविद्यालयात तासिका तत्वावरील पदांसाठी मुलाखतीचे आयोजन
· परफॉर्मींग आर्ट्स शिक्षक,
फाईन आर्ट्स शिक्षक, ग्रंथपाल व शारिरीक शिक्षण निर्देशक पद
· 17, 18 व 22नोव्हेंबर रोजी
मुलाखती
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 :येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात अत्यंत
तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर पदे नियुक्त करावयाची आहेत. त्यामध्ये सहायक
प्राध्यापक अध्यापन 2 पदे, परीपेक्ष 2 पदे, परफॉर्मींग आर्ट्स शिक्षक 1 पद, फाईन
आर्ट्स शिक्षक 1 पद, ग्रंथपाल 1 पद, आरोग्य आणि शारिरीक शिक्षण निर्देशक 1 पदाचा
समावेश आहे. या पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन 17, 18 व 22नोव्हेंबर 2021 रोजी
करण्यात आले आहे. सहायक प्राध्यापक अध्यापन शास्त्र पदासाठी 17 नोव्हेंबर रोजी
सकाळी 11 ते 2,परीपेक्ष पदांसाठी 17 नोव्हेंबर रोजी दु. 2 ते 5, परफॉर्मींग आर्ट्स
शिक्षक पदासाठी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5, फाईन आर्ट्स शिक्षक पदासाठी 22नोव्हेंबर
रोजी सकाळी 11 ते 2, तर ग्रंथपालसाठी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2, आरोग्य व शारिरीक शिक्षण निर्देशक पदासाठी
18नोव्हेंबर रोजी दु 2 ते सायं 5 वाजे दरम्यान मुलाखती होणार आहे.
परफॉर्मिंग आर्ट्स शिक्षक पदाकरीता संगीत, नृत्य अथवा थिएटर विषय आहे. या
पदाकरीता एम.ए (संगीत/नृत्य/थिएटर) 55 टक्के उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.
तसेच फाईन आर्ट्स शिक्षकाकरीता चित्रकला, हस्तकला अथवा छायाचित्रण विषय आहेत. सदर
पदाची शैक्षणिक अर्हता एम.एफ.ए (हस्तकला/ चित्रकला/ छायाचित्रण) पदवी 55 टक्के
उतीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रंथपाल पदाकरीता बी.लिब 55 टक्के एम.लीब 55 टक्के असल्यास प्राधान्य
देण्यात येणार आहे. या पदाचा विषय ग्रंथालयशास्त्र आहे. आरोग्य व शारिरीक शिक्षण
निर्देशक पदाचा विषय आरोग्य व शारिरीक शिक्षण आहे. यासाठी एम.पी.एड (योग विषयासह)
55 टक्के गुण व योग शिक्षण पदविका असल्यास प्राधान्य राहणार आहे.तसेच सहायक
प्राध्यापक अध्यापनशास्त्र पदासाठी गणित व विज्ञान विषय आहे. यासाठी एमएससी 55
टक्के व एमएड 55 टक्के गुणंसह उत्तीर्ण असावे. परीपेक्ष पदासाठी इंग्रजी परीपेक्ष
शिक्षण विषय आहे. यासाठी एमए 55 टक्के, एम एड 55 टक्के गुण असावे.
या विषयांकरीता घड्याळी तासिकेवर नियुक्ती करण्याकरीता इच्छूक पात्र
उमेदवारांनी संपूर्ण माहितीसह अर्ज व कागदपत्रांच्या मुळ आणि छायाप्रतींसह
स्वखर्चाने शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथे उपस्थित रहावे. घड्याळी
तासिकेचे मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहणार आहे. ही नियुक्ती शैक्षणिक
वर्ष 2021-22 सत्रासाठी मर्यादीत असेल. अर्जाचा नमुना www.gcebedbuldan.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एस.एस. लिंगायत यांनी प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
*******
बाल न्याय
मंडळाच्या बैठकीचे लोणार व जळगांव जामोद येथे आयोजन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 11 :बाल न्याय (मुलांची
काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती
बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती
सभागृह, जळगांव जामोद व 13 नोव्हेंबर 2021
रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त
बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी
उपस्थित रहावे, असे आवाहन अमोलकुमार देशपांडे, प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ,
बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
***********
अस्थिव्यंग व
नेत्रव्यंग तपासणी दर बुधवारी तर नाक,कान व घसा दिव्यांग तपासणी दर शुक्रवारी
बुलडाणा,
(जिमाका) दि. 11 :जिल्हा रूग्णालय,
बुलडाणा येथे नियमितपणे अस्थिव्यंग, नेत्र, कान, नाक व घसा, मतिमंद / मनोरूग्ण
संबंधित दिव्यांग बोर्ड महिन्यातील प्रत्येक बुधवारी सुरू आहे. या बोर्डामध्ये
बरेच प्रमाणात दिव्यांग व्यक्तींची एकाचवेळी गर्दी होत असल्यामुळे दिव्यांग
व्यक्तींची गैरसोय होत आहे. तरी दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होवू नये म्हणून यापुढे
अस्थिव्यंग व नेत्र प्रवर्गातील दिव्यांग तपासणी शिबिर नियमितपणे महिन्यातील दर
बुधवारी व मतिमंद / मनोरूग्ण व कान नाक घसा संबंधित दिव्यांग तपासणी महिन्यातील दर
बुधवार ऐवजी दर शुक्रवारी करण्यात येत आहे. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी,
असे आवाहन जिल्हा शल्य चिकिस्तक यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment