कोरोना
अलर्ट : जिल्ह्यात 13 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
बुलडाणा,
(जिमाका) दि. 25 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा
वासियांना आज 28 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार
घेत असलेले 13 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात
वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे
या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून
घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड
अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 188 अहवाल प्राप्त झाले
आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 188 अहवाल कोरोना
निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड
टेस्टमधील 167 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 188 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 736287 रिपोर्ट
निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86956 कोरोनाबाधीत रुग्ण
कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात
आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86956 आहे. आज
रोजी 95 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल
736287 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86956
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण
उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
राष्ट्रीय बीज निमगच्या
दहा वर्षाआतील हरभरा बियाण्यांचे सुधारीत दर जाहीर
बुलडाणा,
(जिमाका) दि. 25 : राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत
प्रमाणित बियाणे वितरण हरभरा 10 वर्षाआतील वाणासाठी राष्ट्रीय बिज निगम,पुणे यांनी
शेतकऱ्यांना 600 रूपये प्रति क्विंटल अतिरिक्त सूट दिली असून सदरहू वाणाचे
वितरणासाठी अनुदानित दर रक्कम 5500 रूपये प्रति क्विंटल असल्याचे कळविले आहे.
यापूर्वी सदरहू वाणाची रक्कम 8600 रु प्रति क्विंटल होती. त्यावर अनुदान 2500 रु
प्रती क्विंटल होते व शेतकऱ्याला 6100 रु प्रती क्विंटल दराने बियाणे मिळत होते.
परंतू आता राष्ट्रीय बिज निगम, पुणे यांनी प्रती क्विंटल 600 रु अतिरिक्त सूट दिली
आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 5500 रू. प्रती क्विंटल प्रमाणे हरभरा बियाणे मिळणार असून
प्रति किलो 55 रु दराने 30 किलो ची बॅग
1650 रुपयामध्ये मिळणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात पाऊसमान चांगले झाले
असल्याने हरभरा पिका खालील क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. सर्व प्रमाणित
बियाणे
वितरणासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले
झाले आहे. शेतकऱ्यांच्या 7/12 व नमुना 8 अ वरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते
जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणा अंतर्गत
अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा राष्ट्रीय
बिज निगम (एन.एस.सी) वितरक यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले
आहे.
*********
शेतकरी
लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर
* 30
नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत
शेतकरी लाभार्थ्यांकरिता माहे डिसेंबर 2021 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची
शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल
भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर
2021 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू 4 किलो
प्रती लाभार्थी, तांदुळ 1 किलो प्रति लाभार्थी असून वाटपाचा दर हा गहू 2 रूपये
प्रतिकिलो व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा : गहू 950 क्विंटल व तांदूळ 236, चिखली
गहू 1283 व तांदुळ 321, अमडापूर गहू 464 व तांदूळ 116, दे.राजा गहू 907 व तांदूळ
227, मेहकर गहू 1170 व तांदूळ 293, डोणगांव गहू 481 व तांदूळ 120, लोणार गहू 1183
व तांदूळ 295, सिं.राजा गहू 1079 व तांदूळ 270, साखरखेर्डा गहू 480 व तांदूळ 120,
मलकापूर गहू 911 व तांदूळ 228, मोताळा गहू 756 व तांदूळ 189, नांदुरा गहू 1223 व
तांदूळ 306, खामगांव गहू 1147 व तांदूळ 287, शेगांव गहू 1059 व तांदूळ 265, जळगांव
जामोद गहू 1023 व तांदूळ 256, संग्रामपूर गहू 764 व तांदूळ 191 क्विंटल आहे.
अशाप्रकारे गहू 14 हजार 880 व तांदूळ 3 हजार 720 क्विंटल पूरवठा करण्यात येणार
आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी
30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे
बुलडाणा,
(जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 2 मोठे, 7 मध्यम
व 46 ल.पा प्रकल्पांमध्ये 364.90 म्हणजे 95.06 टक्के उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झालेला
आहे. बिगर सिंचन आरक्षण बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी साठ्यावर रब्बी
हंगाम 2021-22 चे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची थकबाकी
भरून पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाखा कार्यालयात सादर
करावयाचे आहे.
अर्जाचे कोरे
नमुने शाखाधिकाारी कार्यालयात विना:शुल्क उपलब्ध आहे. मागणी अर्ज करणारे हे स्वत:
शेतीचे मालक असले पाहिजे व अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे. मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा
निरीक्षक अथवा बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे. पाणी अर्जावर ओलीत कराची थकबाकी आहे अथवा नाही,
याबाबत नोंद करणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा रब्बी हंगाम 31 मार्च 2022 पर्यंत
राहील. प्रकल्पावरील पाणीसाठा व पिकनियोजनानुसार 3 किंवा 4 पाणी पाळ्या देण्यात
येतील. 1 एप्रिल 2022 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होईल. पिकांचे क्षेत्र व विहीरीवरील
ओलीताचे क्षेत्र सुरू ठेवावे. नियमानुसार मोटेचा दांड व पाटचारी यामध्ये कमीत कमी
8 फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. अनधिकृत पाणी वापराकरीता दंडनिहाय आकारणी होईल. पाणी
बंद केल्यास नुकसानी करीता कास्तकार स्वत: जबाबदार राहतील, असे कार्यकारी अभियंता,
बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****
प्राधान्य
कुटूंबातील लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर
* 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी
लागणार धान्याची उचल
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांकरिता माहे सप्टेंबर 2017 चे नियतनातील गहू व
तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या
धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि,
टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत धान्याची उचल
करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू प्रती लाभार्थी 3 किलो व तांदूळ प्रति
लाभार्थी 2 किलो आहे, तर गहूचा दर 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळाचा दर 3 रूपये
प्रतिकिलो आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू 5060 क्विंटल
व तांदूळ 3372, चिखली गहू 4297 व तांदुळ 2865, अमडापूर गहू 1397 व तांदूळ 931,
दे.राजा गहू 2101 व तांदूळ 1401, मेहकर गहू 3746 व तांदूळ 2497, डोणगांव गहू 1326
व तांदूळ 884, लोणार गहू 2488 व तांदूळ 1659, सिं.राजा गहू 1679 व तांदूळ 1119,
साखरखेर्डा गहू 1274 व तांदूळ 849, मलकापूर गहू 3037 व तांदूळ 2024, मोताळा गहू
2979 व तांदूळ 1986, नांदूरा गहू 3017 व तांदूळ 2012, खामगांव गहू 5501 व तांदूळ
3666, शेगांव गहू 2649 व तांदूळ 1766, जळगांव जामोद गहू 2766 व तांदूळ 1844,
संग्रामपूर गहू 2573 व तांदूळ 1715 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 45 हजार 890 व तांदूळ
30 हजार 590 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी
कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment