कोरोना
अलर्ट : प्राप्त 336 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 04 पॉझिटिव्ह
- 2
रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,
(जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे
तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 340 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 336 अहवाल
कोरोना निगेटिव्ह असून 04 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह
अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 110 तर रॅपिड टेस्टमधील 226 अहवालांचा समावेश आहे.
अशाप्रकारे 336 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा
शहर : रामनगर 1, इतापे ले आऊट 1, डॉ. संचेती हॉस्पीटल जवळ 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे
जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचाराअंती 02 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी
देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 734687 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86945 आहे. आज रोजी 75 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले
आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734687 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87633
कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674
कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली
आहे.
*****
गुरूनानक जयंतीदिनी
दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द
बुलडाणा,
(जिमाका) दि. 17 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असून येणाऱ्या
शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी गुरूनानक जयंती आहे. जयंती निमित्ताने शासकीय
सुट्टी असल्यामुळे 19.11.2021 रोजी तिसऱ्या शुक्रवारी जिल्हा रूग्णालयातील मनोरूग्ण
/ मतिमंद व कान, नाक, घसा संबधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी
नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर दिव्यांग तपासणीस येवू नये, आल्यास
झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी
कळविले आहे.
*******
जिल्ह्यात 13 लक्ष 35 हजार 250
लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण
बुलडाणा,
(जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात
30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के
लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 16 नोव्हेंबर पर्यंत
जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण
उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 13,35,250 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस
पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 63.44 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य
केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 11
केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र
38 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 3 आहे. जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता
सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment