Tuesday, 16 November 2021

DIO BULDANA NEWS 16.11.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 174 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 174 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 24 तर रॅपिड टेस्टमधील 150  अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 174 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : सागवन 1, शेगांव शहर : रेणुका नगर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 734351 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86943 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86943 आहे.  आज रोजी 104 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734351 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87629 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86943 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 12 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    *****

 

सैनिक मुलाचे वसतिगृह येथे पदभरती, 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.16: सैनिक मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर एक वर्षासाठी रिक्त पदांवर पदभरती करावयाची आहे. रिक्त पदांमध्ये सहाय्यक वसतीगृह अधिक्षकाचे एक पद असून या पदाकरीता केवळ माजी सैनिकांसाठी, हवालदार व त्यावरील तसेच एमएससीआयटी, संगणकाचा अनुभव असावा. स्वयंपाकीनची तीन पदे रिक्त आहेत. यासाठी माजी सैनिकांच्या पत्नींना प्राधान्य असणार आहे. सफाईवालाचे एक पद असून त्याकरीता माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन पाहिजे. तरी इच्छूक माजी सैनिकांनी व विधवा यांनी 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                                        ********

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

  • पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.16: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी शासनाने आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बुलडाणा, नांदुरा, जळगांव जामोद, शेगांव,  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मोताळा, मलकापूर, मेहकर व चिखली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

   तरी सर्व शाळा, महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र सन 2021-22 करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी शासकीय वसतिगृह बुलडाणा, लोणार, दे. राजा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा, दे. राजा व लोणार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    ******

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे

  • पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
  • जळगांव जामोद, नांदुरा व शेगांव येथे वसतिगृह

बुलडाणा,(जिमाका) दि.16: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी शासनाने आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा, जळगांव जामोद व शेगांव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

   प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता सुरू करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षीत टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जाती व जमाती, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय, महाविद्यालयीन, जळगांव जामोद, नांदुरा व शेगांव येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, महाविद्यालय, विद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहणार आहेत. वसतिगृहांमध्ये  प्रवेश अर्ज वाटप सुरू झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारिख 26 नोव्हेंबर आहे. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी नांदुरा वसतिगृहाकरीता 8983282269, 8975778949,जळगांव जामोद वसतीगृहाकरीता 8605313286, शेगांव येथील वसतिगृहाकरीता 7350809515, 8208661488 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जळगांव जामोद येथील गृहपाल ए.एस इंगळे,नांदुरा येथील गृहपाल एस. व्ही सोनटक्के,  शेगांव येथील गृहपाल व्ही. एल बघे   यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

*****

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे

  • पात्र विद्यार्थीनींनी अर्ज करण्याचे आवाहन
  • शेगांव, मोताळा, मेहकर, मलकापूर व चिखली येथील वसतिगृह

बुलडाणा,(जिमाका) दि.16: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी शासनाने आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शेगांव, मोताळा, मलकापूर, चिखली व मेहकर येथील वसतिगृहांमध्ये पात्र विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक सत्र 2021-22 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय ठरवून दिलेल्या आरक्षीत टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जाती व जमाती, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय, महाविद्यालयीन, तसेच शेगांव, मोताळा, मेहकर, मलकापूर व चिखली येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, महाविद्यालय, विद्यालय इयत्ता 8 वी ते 10 शालेय, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयीन सर्व शाखा, व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रवेश अर्ज करण्यास पात्र राहतील. प्रवेशीतांना भोजन, नाष्टा, गणवेश, स्टेशनरी, निर्वाह भत्ता, राहण्याची सोय अशा आवश्यक सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात.

   वसतिगृहांमध्ये  प्रवेश अर्ज वाटप सुरू झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारिख कार्यालयीन वेळेत 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. प्रवेशास पात्र विद्यार्थीनींची गुणांच्या टक्केवारीनुसार प्रथम यादी  29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्याथीनींनी प्रवेश अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी शेगांव वसतिगृहाकरीता 9420433974, 9284041108, 8329831585 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती आर. जे लेंडे, गृहपाल नांदुरा, मेहकर, मलकापूर व चिखली यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. मोताळा येथील वसतिगृह नांदुरा रोड, स्टेट बँकेजवळ आहे. तर मलकापूर येथील बोदवड रोड येथे, मेहकर येथील संताजी नगर, म्हाडा कॉलनी येथे व चिखली येथील वसतिगृह पुंडलीक नगर येथे आहे.  

                                                                                                *******

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  • पात्र विद्यार्थीनींनी अर्ज करण्याचे आवाहन
  • http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.16: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बुलडाणा येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2021-22 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थीनींकरीता इयत्ता 11 वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे वसतिगृह कार्यालयात सादर करावे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना तेआधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर खाते कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, मेडीकल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड छायांकित प्रत, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न बँक खाते पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आदी अचूकपणे अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            ******

जिल्ह्यात क्षयरूग्ण शोध मोहिमेला सुरूवात

  • 25 नोव्हेंबर पर्यंत चालणार मोहिम

बुलडाणा,(जिमाका) दि.16: क्षयरूग्ण शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला 15 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदानव क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. यासाठी संशयीत क्षयरूग्णाचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात येते. केंद्र शासनातर्फे या क्षयरूग्णाचे नोटीफीकेशन शासनाकडे करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्र शासनाच्यावतीने अद्यापही क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरूग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी सन 2021 मध्ये क्षयरूग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आहे. क्षयरूग्ण शोध मोहिमेत अपेक्षीत पाच टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षीत आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 27.25 लक्ष पैकी 408000 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये याकरीता 204 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 41 सुपरवायझर, आशा वर्कर 408 एकूण टिम सदस्य असे एकूण 539 कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. झोपटपट्टी, पोहचण्यासाठी अवघड गावे, कारागृहातील कैदी, ज्या गावात जास्त रूग्ण असू शकतात असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटीत कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृद्धाश्रम अशा निवडलेलया भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व इतर स्वयंसेवक हे गृहभेटीद्वारे संशयीत क्षयरूग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा थुंकी नमुना गोळा करून तपासणी करीता जवळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. क्षयरूग्णांचा शोध घेवून त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहे. याकरीता सर्वांनी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. डि व्ही खेरोडकर यांनी केले आहे.  

                                          क्षयरोगाची अशी असतात लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा ताप असणे, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले रूग्ण.

                                                                        ******

         जिल्ह्यात 13 लक्ष 10 हजार 819 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 15 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 13,10,819 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 62.27 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 13 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 36 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 3 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पं. जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.16:  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू  यांना 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्ताने  अभिवादन करण्यात आले.  यावेळी नायब तहसिलदार संजय बनगाळे यांनी त्यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                    *************

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.16:  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींनी त्यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.

*********

 

 

 खेलो इंडीया युथ गेम्ससाठी कबड्डीखो-खोबास्केटबॉल खेळांच्या निवड चाचणीचे आयोजन

           बुलडाणा,(जिमाका) दि.16:  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने 18 वर्षाखालील कबड्डी मुले व मुली यांच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन मुले दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी व मुली दि.20 नोव्हेंबर 2021, खो-खो मुले दि.21 नोव्हेंबर 2021 आणि खो-खो मुली दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.  तसेच बास्केटबॉल जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन फक्त 18 वर्षाखालील मुली दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता सहकार विद्या मंदीर, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. 

               कबड्डी व खो-खो स्पर्धेतील विजेता संघ अमरावती विभागीय खेलो इंडीया स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल.  तसेच जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत निवडलेले 5 खेळाडू निवड चाचणीतुन विभागाला पात्र ठरतील.  सदर स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.  या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय अथवा क्रीडा संस्थांचे संघ सहभागी होऊ शकतात.  शाळा अथवा क्रीडा संस्थांनी आपले प्रवेश अर्ज खेळाडूचे नाव व जन्म तारीखेसह खाडाखोड न करता दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.महेश खर्डेकर मो.नं.9423393619 या क्रमांकावर व्हॉट्सअप करावयाचे आहे.  स्पर्धेच्या दिवशी त्यांना मुळ प्रवेश अर्ज संयोजन समितीकडे जमा करावे लागतील.

                जर एखाद्या संस्थेचा पुर्ण संघ होऊ शकत नसला तरी एखादा चांगला खेळाडू अथवा त्या संस्थेचे खेळाडू निवड चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात.  काही कारणास्तव एखादा खेळाडू जरी शाळा बाह्य विद्यार्थी असला तरी तो खेळाडू सहभागी होऊ शकतो.  खेळाडूचा जन्म दि.01 जानेवारी 2003 नंतर झालेला असावा.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मुळ जन्म तारखेचा दाखला हा कमीत कमी पाच वर्ष जुना असला पाहिजे, आधारकार्ड, 10 वी पास बोर्डाचे सर्टीफिकेट, यापैकी किमान 2 गोष्टी आवश्यक आहेत.  तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये संघाचे कमीत कमी 10 खेळाडू वजनात, वयात, कागदपत्रात बसणे आवश्यक आहे.  तर वजनगट मुले 70 कि.ग्रॅम आतील व मुली 65 कि.ग्रॅम आतील असणे आवश्यक आहे.  या स्पर्धेला सकाळी 9.00 वाजता उपरोक्त स्थळी प्रारंभ होणार आहे.  तरी खेलो इंडीया कबड्डी, खो-खो व बास्केटबॉल स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, शाळाबाह्य विद्यार्थी व खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                                                                *****

--

No comments:

Post a Comment