Tuesday, 23 November 2021

DIO BULDANA NEWS 23.11.2021

 कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 27 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 276 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 276 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 60 व रॅपिड टेस्टमधील 216 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 276 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 735903 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86953 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86953 आहे. आज रोजी 45 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 735903 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87643 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86953 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        **********


राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका…

* 9 गुन्हे नोंदवून 7 आरोपींना अटक

* पहुरजिरा येथे ट्रकसह मुद्देमाल जप्त

बुलडाणा,(जिमाका) दि. 23:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्र, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पुन्हा 22 नोव्हेंबर रोजी धडक मोहिम राबविण्यात आली.  उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. 

    धडक मोहिमेदरम्यान सिं. लपाली, बोराखेडी, सारोळा ता. मोताळा, पहुरजिरा ता. शेगांव, शेलगांव आटोळ ता. चिखली, या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली.  यामध्ये  एकुण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, तर 7 वारसा नोंदवून गुन्हे 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.   सदर कारवाईमध्ये 71 लि. हातभट्टी दारु, 1550 लि. रसायन, 5.4 लि. देशी दारु, 7.5 लि. विदेशी दारु व एक वाहन जप्त करुन 11 .44 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. मोहिमेत शेगांवचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी खामगांव ते जलंब रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पहुरजिरा ता. शेगाव येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक एमएच 11 सीएच 4882 जप्त करण्यात आला आहे. तसेच अशोक भिकाजी कोंडे रा. पहुरजिरा याकडून महाराष्ट्र राज्यातून प्रतिबंधीत असलेल्या गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेश मद्य साठ्याचा गोल्डन ॲस ब्ल्यु व्हिस्की या ब्रॅण्डच्या 750 मि.ली क्षमतेच्या एकूण 10 विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. बॉटल व एक चार चाकी वाहन जप्त करून आरोपीत इसमाविरूद्ध  महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत खामगांवचे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, जवान अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, संजीव जाधव व सौ. शारदा घोगरे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे करीत आहे.    

आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास  विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.

                                                            *****

जिल्ह्यात 14 लक्ष 38 हजार 76 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 22 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 14,38,76 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 68.32 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 5 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 43 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 4 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी  असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ******

 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  • पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
  • http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.23: आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बुलडाणा व खामगांव येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2021-22 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यायातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे वसतिगृह कार्यालयात 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे.    

    विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे जुळणारे असावे. अर्ज भरताना आधारकार्ड अपडेट करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक बंद असल्यास अर्ज भरण्यापूर्वी सुरू करून घ्यावे. बँक खात्याची नोंद करताना स्वत:चेच बँक खातयाची नोंद करावी किंवा पालकाचे संयुक्तीक खाते असावे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी कागदपत्राची स्वच्छ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी. तसेच प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड प्रत, गुणपत्रिका, पासपोर्ट दोन फोटो आदी अर्जासोबत अपलोड करावे.  तरी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह, बुलडाणा व खामगांव यांनी केले आहे.

                                                                                                                ******

 

No comments:

Post a Comment