Thursday, 9 September 2021

DIO BULDANA NEWS 9.9.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1407 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 12 पॉझिटिव्ह

  • 10 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1419अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1407 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 139 तर रॅपिड टेस्टमधील 1268 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1407 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 2, दे. राजा शहर : 2, मलकापूर तालुका : देवधाबा 1, मेहकर शहर : 1, चिखली तालुका : खंडाळा 1, चिखली शहर : 2, लोणार शहर : 1, नांदुरा तालुका : वडोदा 1, खामगांव शहर : 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 12 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 10 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                              

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 701420 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86774 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86774 आहे.  आज रोजी 1265 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 701420 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87511 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86774 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 64 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**********

 

पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पुर्वसूचना द्यावी

  • प्रधानमंत्री पीक विमा योजना
  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

    जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे.  पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक नुकसानीची पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

   या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्यापासून 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे (Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका/जिल्हा कार्यालयात किंवा कृषि/महसूल विभागास, किंवा विमा ज्या बँक शाखेत भरला असेल त्या बँक शाखेला देणे आवश्यक आहे. याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

**********

                  शासकीय भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी

  • जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या भरडधान्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मार्केटींग फेडरेशनचे सब एजंट  संस्थामार्फत ऑनलाईन शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे.

   जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, जळगांव जामोद, खामगांव, लोणार, मलकापूर, मेहकर, संग्रामपूर व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, चालु असलेला सात बारा, पिकपेरासह संपूर्ण कागदपत्रे संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

                                                            **

No comments:

Post a Comment