कृषि विज्ञान केंद्र येथे पोषण महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
बुलडाणा, (जिमाका) दि. 17
: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोषण वाटिका
महाअभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम आज 17 सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र येथे
उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन जि.प
उपाध्यक्षा सौ. कमलताई बुधवत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदी
होते.
या
प्रसंगी आहारात विविध पौष्टिक धान्याचा वापर करण्याबाबत उपाध्यक्ष सौ. कमलताई बुधवत
यांनी उपस्थितांना आवाहन केले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. नाईक यांनी
कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी जैव समृद्ध धान्य व इतर पिकाबाबत
उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीमती स्नेहलता भागवत यांनी समतोल आहार व त्यांचे
आरोग्य बाबत तर सहा. प्राध्यापक डॉ.दिनेश कानवडे यांनी भरड धान्याची पौष्टिकता
याबाबत मार्गदर्शन केले. फळ पिकांचे
आहारातील महत्व डॉ अनिल तारू यांनी आपल्या
मार्गदर्शनात समजावून सांगितले.
या प्रसंगी किशोरवयीन मुलीत पोषण जागरूकता या
विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलींनी सक्रीय सहभाग
नोंदविला. सदर कार्यक्रमांमध्ये डॉ.चंद्रकांत जायभाये यांनी आपल्या सादिक
सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी
उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पोषण युक्त
तृणधान्याचा समावेश असलेल्या भोजनाने करण्यात आली. संचलन मनेश यदुलवार यांनी, तर
डॉ. नरेंद्र देशमुख यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व शास्त्रज्ञ,
अधिकारी, शेतकरी बंधू भगिनी, विदयार्थी / विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषय विषयतज्ञ राहुल चव्हाण, पी.पी. देशपांडे , नितीन
काटे, कु. कोकिळा भोपळे, कु.सुनिता थोटे, अनिल जाधव, नंदकिशोर ढोरे, संदीप तायडे, दिनेश
च-हाटे, कु.अनुराधा जाधव व कर्मचा-यांनी प्रयत्न केले.
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 17
: केशव
सिताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना त्यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
*****
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
करावे
- कृषि
विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : गलाबी
बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा
आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान
आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी अंडी पात्या,
फुलावर, नविन बोंडावर, देठावर आणि कोवळया पानांच्या खालच्या बाजुस घालते. अंडीचा
आकार 0.5 मि मि लांब व 0.25 मिमि रुंद असतो. अंडी लांबट व चपटी असुन रंगाने
मोत्यासारखी चक चकीत असतात. पंधरा दिवसाचे बोंड अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण
असते. अंडी उबवण्याचा काळ हा 3 ते 6 दिवसाचा असतो. पहिल्या दोन अंतरीक अळी अवस्था
पांढूरक्या असतात आणि तिसऱ्या आंतरीक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.
उष्ण
भागात अळी अवस्था ही 9 ते 14 दिवसांची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 10 ते 13
मिमि असून डोके गडद रंगाचे असते. कोष साधारण 10 मिमि लांब बदामी रंगाचा असून
अवस्था 8 ते 13 दिवसात पुर्ण केल्या जाते. जिवनक्रम 3 ते 6 आठवडयात पुर्ण होतो.
पतंग 8 ते 10 मिमि तपकिरी करडया रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग
कोषातून सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर निशाचर असतात आणि दिवसाला मातीत किंवा
जमिनीच्या भेगात लपून बसतात. खाध्य वनस्पती अभावी गुलाबी बोंडअळी 6 ते 8
महिनेपर्यत निद्रावस्थेत राहते.
उघडलेल्या बोंडावरती डाग हे गुलांबी बोंडअळीचे
प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणाऱ्या फुलोऱ्यावस्थेत आणि पिकांच्या
वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळयामध्ये नर
पतंग अडकल्यास कामगंध सापळयाद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग
आकर्षित होतात. डोम कळी फुले पुर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर
दिसणारे डाग हिरव्या बोंडावर दिसणारे. डाग हे गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव लक्षण
आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाची लहान
छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.
गुलाबी
बोंडअळी येण्याचे कारणे
जास्त
कालावधीच्या संकरीत वानाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीला यजमान वनस्पतीचा
अखंडीत खाद्य पुरवठा. असंख्य संकरीत वाण ज्यांचा फुलोरा आणि फळधारणेचा कालावधी
वेगवेगळा असतो. जो गुलाबी बोंडअळीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या पिढीला अखंडीत पुरवठा
करतो. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्चा कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक
केल्यामुळे येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंडअळीचे स्त्रोतस्थान म्हणून
काम करते. पुर्वहंगामी (एप्रिल-मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जुन- जुलै मध्ये
येणाऱ्या कमी तिव्रतेच्या गुलाबीबोंड अळीसाठी लाभदायक ठरतो. गुलाबी बोंडअळीचे
क्राय 1 एसी 2 एबी या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे त्या
बोलगार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात. संकरीत वानाची बोंडातील बियामध्ये वेगवेगळे
असलेल्या विषाच्या प्रमाणामुळे लवकर प्रतिकार निर्माण होतो. ही परिस्थिती निवडक प्रतिकार
शक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श ठरते. सुरुवातीला पेरलेले पिक आणि अगोदरचे
पीक यांच्या सलग उपलब्धतेमुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होतो.
त्यामुळे त्यांच्या अनेक पिढया एक वर्षात तयार होतो. ज्यामुळे गहन निवडक दबाव तयार
होऊन प्रतीकार तयार होण्यास मदत होते. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पिक म्हणून
वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव.
अशा करा उपायोजना : कापुस पिकाचा हंगाम
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान संपुष्टात आणणे. अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त
बोंडे व पिकांच अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त
कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन
महिन्यात पेणी करावी. बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची
आश्रय पीक म्हणून लागवड करावी. पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या
45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी
बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत
वेळोवळी निरीक्षण करावी. ज्या ठीकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया
अंडयावर उपजिविका करणारा परोपजीवी मित्र किटक 60000 एकर या प्रमाण एका आठवडयाच्या
अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केलयास चांगले नियंत्रण मिळते.
लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5 टक्के निम तेल 5 मिली प्रती लिटरची एक
फवारणी करावी. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम)
प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी. किटनाशकाचा
मिश्राणचा कोटेकोरपणे वापर टाळावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
नोव्हेंबरपुर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायरेथ्रोईड, असिफेट, फिप्रोनील
इत्यादी चा वापर करु नये. बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळया
झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावी. खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त
पात्या, फुले व बोंडे गोळा करुन त्वरीत नष्ट करावीत. आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग,
कामगंध सापळा, दिन किंवा एक अळी,10 फुले किंवा एक अळी 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास
तक्त्यात दिलेल्या रासायनिक किटनाशकांचा गरजेनुसार वापर करावा. स्वच्छ व निरोगी
कापसाची स्वतंत्र वेचनी करुन विक्री अथवा योग्य साठवणूक करावी. तसेच किडग्रस्त
कापुस त्वरीत नष्ट करावे. सुतगिरणी, जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या किडग्रस्त कापसात
सुप्तावस्थेत असलेल्या अळयांपासून निघनाऱ्या पंतगांना पकडण्यासाठी त्या परिसरात
कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावे. फेरोमन सापळ्याचा
वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा पाच फेरोमन सापळे लावावे. सतत तीन दिवस या
सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय
योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकांमध्ये मजुरांच्या साहाय्याने डोमकळ्या शोधुन
नष्ट कराव्या.
गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली किटनाशके
सप्टेंबर
महिन्यात किटकनाशक थायोडीकार्ब 15.8 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25
टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा
प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडाक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा
डेल्टामेंथीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझॉडीरेक्टीन 0.03 (300 पिपिएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पिपिएम) 25
मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्यावर
आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव वाढू नये म्हणून क्लोरेंट्रानिलीप्रोल
9.3 टक्के अधीक लँब्डासायहॅलोथीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक
सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक ॲसीटामोप्रिड 7.7
टक्के 10 मिली या प्रमाणे फवारणी करून कापूस पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे
यांनी केले आहे.
*****
कोरोना अलर्ट : प्राप्त 1071
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह
- 02 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 17
: प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी
एकूण 1073 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1071 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02
अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2
अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 254 तर रॅपिड
टेस्टमधील 817 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1071 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
दे.राजा तालुका : जवळखेड 1, परजिल्हा सगड ता. बाळापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे
जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे. तसेच
वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 02 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात
आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 708398 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86839 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86839
आहे. आज रोजी 845 नमुने कोविड निदानासाठी
घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 708398 आहेत. जिल्ह्यात आज अखेर
एकूण 87539 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86839 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर
मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच
आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी दिली आहे.
*****
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन
समिती सभेचे 23 सप्टेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 17
: जिल्हास्तरीय
भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभेचे 23 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबतच्या
तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट
शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन तहसिलदार प्रिया सुळे
यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment