कोरोना अलर्ट : प्राप्त 358
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 04 पॉझिटिव्ह
- 02 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 20
: प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी
एकूण 362 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 358 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 04
अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4
अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 211 तर रॅपिड
टेस्टमधील 147 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 358 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
दे.राजा शहर : सिव्हील कॉलनी 1, दे. राजा तालुका : गव्हाण 1, जवळखेड 1, परजिल्हा
सगड ता. बाळापूर 1 संशयीत व्यक्ती
पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे. तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 02
रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 710864 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86847 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86847 आहे. आज रोजी 691 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात
आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 710864 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87548
कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86847 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 28 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673
कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली
आहे.
*****
मोटार वाहन कायद्यातंर्गत दंड झाला असल्यास दंडाची रक्कम भरावी
- दंड भरण्यासाठी 21,
22 व 23 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यातील वाहतुक शाखा व विविध पोलीस ठाण्यामार्फत नियमभंग करणाऱ्या
जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंड
आकारण्यात आला आहे. यापैकी काही
वाहनधारकांनी दंडीत रकमेचा भरणा केला असून काही वाहनधारकांकडून अद्यापही दंडाची
रक्कम भरलेली नाही. तरी जिल्ह्यात 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये केंद्र
शासनाच्या लोक अदालत मोहिमेतंर्गत मोटार वाहन कायद्यान्वये वाहन चालकांवर केलेल्या
केसेसमधील थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात
येत आहे.
तरी वाहनधारकांनी त्यांचे नजीकचे पोलीस स्टेशन,
वाहतूक शाखा किंवा कोणताही वाहतूक अंमलदार यांच्याकडे अथवा ऑनलाईन पद्धतीने त्यांचे
वाहनावरील थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करावा. दंडाची थकबाकी असणा4या वाहनधारकांना
त्यांचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येत आहे. सदर
मेसेजवर क्लिक केल्यावर थकीत दंड भरणेबाबत समन्स आणि वाहनावरील थकीत चलानची
सविस्तर माहिती असलेली पीडीएफ मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल. सदर पीडीएफमध्ये दिलेल्या
लिंकवर क्लिक करून वाहनधारक ऑनलाईन पद्धतीने दंडाच्या रकमेचा भरणा करू शकतील. ही
मोहिम 21, 22 व 23 सप्टेंबर 2021 रोजी राबविण्यात येत असून त्याचा लाभ घेण्यात
यावा. या दिवशी थकीत दंड न भरल्यास 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका
न्यायालयात थकीत दंडाच्या रकमेचा भरणा
करून घेणेकरीता लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी न्यायालयात जावून
अपला दंड भरून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक, पोलीस अधिक्षक
कार्यालय, बुलडाणा यांनी केले आहे.
***
बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी
सोसायट्यांसाठी सफाईगार पदांची कामे प्राप्त
· 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर येथे कंत्राटी पद्धतीचे 1
सफाईगार पद असून ते रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा
सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता काम प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन
घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन
घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या
कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था वरील काम
करण्यास इच्छूक असल्यास 30 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर,
बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.
सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा
1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र
असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी
बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत
काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने
कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी
संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल,
नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत
सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी
करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुलडाणा
व आयटीआय मलकापूर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
राष्ट्रीय लोक अदालतीचे 25 सप्टेंबर रोजी आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : राष्ट्रीय
विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्ह्यात 25 सप्टेंबर 2021 रोजी बुलडाणा व
तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकांवर विजय
मिळविल्याचा आनंद फक्त एक दिवस टिकतो पण तडजोड करून तसे प्रकरण एकमेकांना
विश्वासात घेवून मिटविल्यास आपल्या जिवनातील विरोधक कमी होतात व त्याने आपण जास्त
प्रगती करतो. त्यामुळे एकमेकांवर विजय मिळविण्याचा विचार करण्यापेक्षा तडजोड करून
खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी
होवून एकमेकांबद्दल प्रेमाने सद्भावना निर्माण होते.
या बाबींचा विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा
प्राधिकरण यांच्या आदेशान्वये 25 सप्टेंबर रोजी जिल्हयात सुध्दा लोक अदालतीचे
आयोजन करण्यात आलेले आहे. या संधीचा लाभ पक्षकारांनी भेटून दाखलपूर्व प्रकरणे
आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
अध्यक्ष तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, प्राधिकरणाचे सचिव
साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार सावळे यांनी केले आहे.
सदर लोकअदालतीत मोटार व्हेईकल अक्ट चे
प्रकरणेसुद्धा तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले असून त्यात तडलोड शुल्क
न्यायालयीन दैनंदिन प्रक्रियेपेक्षा कमी आकारण्यात येणार आहे. पक्षकारांनी या
संधीचा फायदा जरूर घ्यावा. लोकअदालतीत कोविड -१९ बाबत असलेल्या सूचनांचे तंतोतंत
पालन करुन घेण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व
दोन गज सामाजिक दुरी ठेवणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या
माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या
तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे संपर्क
साधावा. जेणेकरुन सदर प्रकरण सामजस्याने निकाली निघेल व आपला वेळ व खर्च वाचेल,
असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment