Thursday, 16 September 2021

DIO BULDANA NEWS 16.9.2021

 

आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष निमित्ताने

 केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे ऑनलाईन मार्गदर्शन

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023 चे अनुषंगाने पोषण वाटिका आणि वृक्षारोपण महाअभियान कार्यक्रमाचे आयोजन 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वा कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. या पोषक धान्य वर्ष निमित्ताने पोषक धान्य हितधारकांचे संमेलन, वृक्षारोपण आणि पोषण वाटीकेच्यादृष्टीने वाटचाल या विषयावर केंद्रीय कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. सदर कार्यक्रमात शेतकरी बांधव ऑनलाईन पद्धतीने  17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता झूम ॲपवर https://us02web.zoom.us/i/86105563485?pwd=NnZMNWZvZU95S2tvNnRWe TFVU2htdz09 या लिंकचा वापर करून उपस्थित राहू शकता. या कार्यक्रमानंतर कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पोषक धान्य, पोषण आहार व आरोग्य तसेच विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे, असे कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा यांनी कळविले आहे.  

*******

बिटी कापूस पिकावरील रस शोषक किडींचे व्यवस्थापन करावे

कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.16: कापूस पिकावर सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  

  या असतात रस शोषक किडी : तुडतुडे : फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात व ते नेहमी लांबीला तिरके असतात. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजुला राहून त्यातील रस शोषन करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकिरी रंगाचे होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्णपणे लाल तांबडी होवून त्यांच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांना पात्या, फुले व बोंडे कमी प्रमाणात लागतात.

फुलकिडे : फुलकिडे आकाराने लहान लांबोळी असून त्यांची लांबी 1 मि.मी किंवा त्यापेक्षा कमी असते. रंग फिक्कट पिवळा किंवा तपकिरी असतो. फुलकिडे आणि त्यांची पिले कपाशीच्या पानावरील आणि बोंडावरील हिरवा भाग खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रथम तो भाग पांढुरका व नंतर तपकिरी होतो. झाडाची वाढ खुंटते व बोंडे चांगली उमलत नाही. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात. पांढरी माशी : पांढरी माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके किंवा करड्या रंगाचे असतात. शरीरावर पिवळसर छटा असून डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पांढऱ्या माशीचे पिल्ले पानांच्या मागच्या बाजुने एका ठिकाणी स्थिर राहून त्यातील रसशोषण करतात. अशी माने कोमेजतातन तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव असल्याने पाने लालसर ठिसुळ होवून वाळतात. याशिवाय पांढऱ्या माशीचे पिल्ले शरीरातून चिकट दउ्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढते. असे प्रादुर्भावग्रस्त झाड चिकट व काळसर होते. झाडांची वाढ खुंटते आणि त्याचा उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होतो.

   रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात जास्त ते मध्यम स्वरूपाचा असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जागरूक राहून यया किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. किडींच्या प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करावे. सरासरी 10 फुलकिडे / पान किंवा 2 ते 3 तुडतुडे / पान किंवा 8 ते 10 प्रौढ व पिल्ले फुलकिड / पान किंवा एकत्रित पणे सर्व रसशोषक किडी 10 / पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळुन आल्यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.   

    असे करा व्यवस्थापन : वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा.  वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे अंबाडी, रानभेंडी आदी नष्ट करावी. मृद परीक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील दोन झाडातील अंतर योग्यतेचे ठेवावे. जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील. रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीर फीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा, ॲनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक आदी संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझाडीरेक्टीन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारीत डब्ल्यु एस.पी 30.00 मिली किंवा ॲझाडीरेक्टीन 5.00 टक्के 20 मिली फवारणी करावी. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात चिकट सापळे 15 x 30 आकाराचे हेक्टरी 16 पिकांच्या उंचीचे एक फूट उंचीवर लावावे. पांढऱ्या माशी व तुडतुड्यांकरीता पिवळ्या रंगाचे तर फुलकिड्यांसाठी निळ्या रंगाच्या चिकट सापळ्याचे वापर करावा.  पांढऱ्या माशीच्या जैविक नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीएम लेकॅनी 1.15 टक्के डब्ल्यु पी 50 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी मिसळून फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना सिंथेटीक प्रायरोथ्राईड गटातील जसे सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन व फेनव्हेलरेट आदींचा वापर टाळावा. त्यामुळे रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

      या सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडींना आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास खालील कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयफेथ्युरॉन 50 टक्के पाणी मिसळून भुकटी 12 ग्रॅम किंवा फ्लोनिकामाईड 50 टक्के डब्ल्यु जी 3 ग्रॅम किंवा डिनोटेफ्युरॉन 20 एस.जी 3 ग्रॅम फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.

******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1435 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

  • 09 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1438 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1435 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 347 तर रॅपिड टेस्टमधील 1088 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1435 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली तालुका : खोर 1, साकी रावजी 1, मोताळा तालुका : वाघजळ 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 09 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                             

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 707327 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86837 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86837 आहे.  आज रोजी 897 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 707327 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87537 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86837 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment