पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची
पुर्वसूचना द्यावी
• प्रधानमंत्री पीक विमा योजना
• कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : खरीप
हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. योजनेत सहभागी
झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या
जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,
ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे
नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जिल्ह्यात 25 ते 29 सप्टेंबर 2021 या
कालावधीत गुलाब चक्रीवादळामुळे पूर आल्याने क्षेत्र जलमय होवून शेतामध्ये पाणी
घुसले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व मका या पिकांचे क्षेत्र बाधीत झाले
आहे. त्याअनुषंगाने पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत
तात्काळा विमा कंपनीला तक्रार दाखल करावी.
शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा
कंपनीस सर्वप्रथम 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसानीबाबत
ऑनलाईन तक्रार दाखल करावी. टोल फ्री क्रमांकावर संपर्क न झाल्यास क्रॉप इन्शुरन्स ॲप
डाऊनलोड करून त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करावी. क्रॉप इन्शुरन्स ॲप वर
तक्रार दाखल न झाल्यास तालुका स्तरावर विमा कंपनीच्या प्रतीनिधीकडून पुर्व
सुचना फॉर्म घेऊन त्यामध्ये नुकसानीबाबत अचूक माहिती भरावी व त्यासोबत पिक विमा भरल्याची
पावती, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत जोडून ऑफलाईन सूचना फॉर्म
द्यावे. नुकसानीबाबत ऑनलाईन सूचना फॉर्म देणे शक्य न झाल्यास पुर्वसुचनेचा फॉर्म नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहायकांकडे सुचना फॉर्म भरून देऊन पोच घ्यावी.
कृषि सहायक यांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले पूर्व सुचना फॉर्म एकत्रित करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी
11 वाजेपर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देऊन
पोच घ्यावी.
सुचना फॉर्म भरताना नोंदणी अर्ज क्रमांक, नाव, वडीलांचे नाव, मोबाईल क्रमांक,
कर्जदार / बिगर कर्जदार, गाव, पिकांचे नाव, विमा संरक्षीत क्षेत्र, सर्वे क्रमांक,
पिक विमा भरलेल्या पावतीनुसार व्यवस्थित भरल्याची खात्री करावी. नुकसानीचा प्रकार
हा क्षेत्र जलमय झाल्यामुळे टाकावा. तसेच नुकसानीचा तारिख, नुकसानीची टक्केवारी
अचूक भरल्याची खात्री करावी. एकापेक्षा जास्त गट क्रमांक किंवा एकापेक्षा जास्त
पिकाचे पिक विमा भरले असल्यास स्वतंत्र पूर्वसुचना फॉर्म भरून द्यावे. बाधित
झालेल्या क्षेत्राचा सुस्पष्ट जिओ टॅग फोटो काढुन आपल्याकडे जतन करून ठेवावे. तरी पिक
विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये पिक विमका योजनेत सहभाग नोंदविलेल्या
नुकसानग्रस्त 100 टक्के शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत पूर्व सुचना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
*****
जिल्हाधिकारी
कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका)
दि.30 : शासन निर्णय अन्वये 28 सप्टेंबर हा दिवस प्रतिवर्षी
"माहिती अधिकार दिन" म्हणुन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात दिनांक 28 सप्टेंबर
रोजी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश
गिते यांचे प्रमुख उपस्थितीत कोविड बाबत
निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला. त्यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी श्री गीते यांनी माहितीचा
अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास
तहसीलदार श्रीमती प्रिया सुळे यांनी
सुध्दा मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास नायब तहसीलदार संजय बनगाळे, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार व हेड कॉस्टेबल आपत्ती व्यवस्थापन पथक
तारासिंग पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***
कोरोना अलर्ट :
प्राप्त 452 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
• 03 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका)
दि. 30 :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या
अहवालांपैकी एकूण 453 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 452 अहवाल कोरोना निगेटिव्ह
असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये
प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 67 तर
रॅपिड टेस्टमधील 385 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 482 अहवाल निगेटीव्ह
आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
खामगाव तालुका : काळेगाव 1, संशयीत
व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 03
रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 718216 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86879 आहे. आज रोजी 615 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात
आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 718216 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण
87565 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673
कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली
आहे.
*****
शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर शेती उपयोगी
साहित्याचे वितरण
• जि.प सेसफंडातून योजना, 11 ऑक्टोंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्हा
परिषदेचा कृषि विभागामार्फत सन 2021-22 वर्षाकरीता जिल्हा परिषद सेसफंड योजनेमधून शेतकऱ्यांना
75 टक्के अनुदानावर ताडपत्री, पॉवर स्प्रेअर, 5 एचपी
विद्युत पंप, पीव्हीसी पाईप व ट्रॅक्टरचलीत औजारे पुरवितण्या येणार आहे. सदर
योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कृषि कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज विहीत नमुन्यात परिपूर्ण असावा. अर्जासोबत 7/12,
नमुना 8 –अ, बँकेचे पासबुकची प्रत, आधार कार्ड आदी सर्व कागदपत्रे असावीत. सदर
अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात 11 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह
सादर करावे. तरी योजनेत लाभासाठी शेतकरी
लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर करावे. या योजनेचा शेतकरी बांधवांनपी
मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा घ्यावा, असे आवाहन कृषि विषय समिती सभापती राजेंद्र सदाशिव पळसकर यांनी केले आहे.
****
ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई
लोकशाही दिन
- मोबाईल क्रमांक 9922899855
वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
- व्हिडीओ
कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.30:
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय
अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास
पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना
संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही
दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी या लोकशाही
दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन
पद्धतीने 9922899855 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून द्याव्यात. त्यामुळे
तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.
तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात
येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू
असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1
महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच
तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर
करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल,
सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या
कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील,
लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार
नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात
येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले
आहे.
******
No comments:
Post a Comment