कोरोना अलर्ट : प्राप्त 959
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 12 पॉझिटिव्ह
- 22 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व
रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त
झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त
झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 12 अहवालांचा समावेश आहे.
निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 155 तर रॅपिड टेस्टमधील 804 अहवालांचा
समावेश आहे. अशाप्रकारे 959 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
चिखली तालुका : तेल्हारा 1, बुलडाणा शहर : 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा
तालुका : सिनगांव जहागीर 5, नांदुरा तालुका : वडोदा 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे
जिल्ह्यात 12 रूग्ण आढळले आहे. तसेच
वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 22 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात
आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 700013 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86764 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या
86764 आहे. आज रोजी 1159 नमुने
कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 700013 आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 87499 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86764 कोरोनाबाधीत
रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 62 सक्रीय रूग्ण उपचार
घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**********
शिकाऊ अनुज्ञप्ती आधार क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन मिळणार
- अर्हता प्राप्त
डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार
- युजर आयडी मिळविण्यास
इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : परिवहन विभागाचे नागरिाकंच्या सोयी सुविधांसाठी पेपरलेस कामावर लक्ष केंद्रीत
केले आहे. त्यानुसार विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता
यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्नींग लायसन्स) सुविधेची भर पडली आहे. आधार
क्रमांकाचा वापर करून शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.
या
प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेस मधून
स्वयंचलीतरित्या घेण्यात येतो. मात्र नमुना 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र नागरिकांना
कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे. नागरिकांचे कार्य पेपरलेस होणेकरीता एनआयसीद्वारे
नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र अर्हता प्राप्त डॉक्टरांकडे ऑनलाईन
पद्धतीने करून अपलोड करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम 8
अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमीत करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम 5
मध्ये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे.
शासनाने 13 सप्टेंबर 2013 च्या आदेशान्वये नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय
प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स देवू शकतील असे निर्देशित
केले आहे. ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रक्रिया पेपरलेस होण्याकरीता नमुना क्रमांक
1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड होणे अनिवार्य आहे. कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स
यांची एमबीबीएस पदवी मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र, क्लिनीकचे किमान चार
छायाचित्र, कुठलेही एक ओळखपत्र आदी कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील
कागदपत्रे आपलोड केलेल्या प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरला स्वतंत्र युजर आयडी देण्यात
येणार आहे. त्यानंतर संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉग ईन करून अर्जदारांची
नियमाप्रमाणे आवश्यक शारिरीक तपासणी करून नमुना क्रमांक 1 (अ) त्यांच्या स्तरावरून
प्रमाणित करून तो अपलोड करणे आवश्यक आहे. तरी युजर आयडी प्राप्त करण्यासाठी इच्छूक
एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मूळ कागदपत्रे तपासणीकरीता कार्यालयात सादर करावीत, असे
आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.
******
बियाण्यासाठी सोयाबीनची मळणी 500 आरपीएमच्या आत असलेल्या मळणी यंत्रणा करावी
-
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
- राष्ट्रीय तेलताड व
तेलबिया अभियानातंर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : खरीप हंगाम सन 2022-23 करीता सोयाबीनचे
उत्कृष्ट बियाणे लागणार आहे. बियाण्यासाठी सोयाबीन घेताना वाणा व्यतिरिक्त इतर वाण
किंवा इतर सोयाबीनच्या जाती यांचे विलगीकरण करावे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे काढून
टाकून सोयाबीनवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. सोयाबीनची कापणी व मळणी करताना 500
आरपीएमच्या आत असलेल्या मळणी यंत्राने करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले. राष्ट्रीय तेलताड व तेलबिया अभियान सन 2021 -22
अंतर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयातील
सभागृहात करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर
उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.
चंद्रकांत जायभाये, डॉ. दिनेश कानवडे, किटकशास्त्रज्ञ श्री. देशपांडे आदी उपस्थित
होते.
यावेळी नरेंद्र नाईक पुढे म्हणाले, पुढील वर्षाकरीता
उत्तम, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण घरचे सोयाबीन बियाणे तयार करावे. रब्बी
हंगामामध्ये करडी, जवस, सुर्यफूल, तीळ व भुईमूग याय पिकांची लागवड करून विकेल ते
पिकेल या धोरणातंर्गत लाभ घ्यावा. प्रास्ताविकात उपविभागीय कृषि अधिकारी श्री.
डाबरे यांनी राष्ट्रीय तेलताड व तेलबिया अभियानाचा उद्देश सांगून दैनंदिन आहारातील
महत्व समजाविले. तसेच तेलबियांचे अधिक उत्पादन करून केंद्र शासनाचा खाद्य तेलाच्या
आयातीवरील खर्च कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ जायभाये यांनी
सोयाबीन वरील रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, करडी, जवस,
सुर्यफूल, तीळ व भुईमुग आदी पिकांचे रब्बी हंगामातील लागवड तंत्र सुधारीत वाण, पेरणी
पद्धत एकात्मिक खत व्यवस्थापन आदी बाबींवर मार्गदर्शन केले.
डॉ. दिनेश
कानवडे यांनी मका लागवड तंत्रज्ञान व त्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन,
नाचणी, भगर, रब्बी ज्वारी आदी एकदलवर्गीय पिकाचे मानवी जीवनातील महत्व व त्याची पोषणमुल्ये
यावर मार्गदर्शन केले. श्री. देशपांडे यांनी सोयाबीनवरील चक्रीभुंगा, स्पोडोप्टोरा,
मारूका, कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडी व गुलाबी बोंडअळी, हुमणी अळी आदींचे
एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. संचलन चिखली तालुका कृषि अधिकारी
अमोल शिंदे यांनी तर आभार बुलडाणा तालुका कृषि अधिकारी दिनकर मेरत यांनी मानले. प्रशिक्षणातील
उपविभागातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक उपस्थित होते.
******
प्रकल्पांमधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी
21 सप्टेंबरपर्यंत मागणी सादर करावी
बुलडाणा पाटबंधारे विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : बुलडाणा
जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा मा. पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा पाणी आरक्षण
समिती, तसेच समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधीकारी यांचे प्रमुख उपस्थितीत 5
ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात
येत आहे. सर्व नगर परिषदा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील, पंचायत समिती /
संबंधित ग्रामपंचायत यांनी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा
यांचेकडे 21 सप्टेंबर 2021 पुर्वी न चुकता पाणी मागणी सादर करावी.
जेणेकरून जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या
सभेमध्ये सदर मागणी उपस्थीत करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध
पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजूरी देण्यात येणार आहे. याची
सर्व संबंधीत बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा न करता
पाणी मागणी तात्काळ सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे
विभाग यांनी केले आहे.
******
दिव्यांग बांधवासाठी जयपूर फुट शिबिराचे आयोजन
• 17, 18 व 19 सप्टेंबर 2021 रोजी नागपूर येथे आयोजन
• शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्याचे
आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : समाधा
आश्रम, नागपूर यांचे मार्फत पुज्य समाधा आश्रम, बँक कॉलनी, जरीपटका, नागपूर येथे 17,
18 व 19 सप्टेंबर 2021 रोजी जयपुर फुट, कृत्रिम अंग वितरण नि:शुल्क शिबिराचे
आयेाजन करण्यात आले आहे. शिबिरात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव
व साधने पुरविणेबाबत मोजमाप करण्यात येणार आहे. या शिबिरात 17 व 18 सप्टेंबर रोजी
सकाळी 9 ते सायं 4 वाजेपर्यंत जयपूर येथील तज्ज्ञांमार्फत रूग्णांची तपासणी
करण्यात येणार आहे. तसेच रविवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत
कृत्रिम अंगाचे ट्रायल घेणे, समाधान करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम अंग वितरण
कार्यक्रम सायं 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे
अपंगत्वा नुसार आवश्यक लागणाऱ्या साहित्याचे मोजमाप करण्यात येणार आहे. तरी
जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा,
असे आवाहन आयोजक व प्रशासनाचवतीने करण्यात आले आहे.
*******
जिल्ह्यात संततधार कायम…!
- सरासरी 26.4 मि.मी
पावसाची नोंद
- मोताळा
तालुक्यात सर्वात जास्त 61.5 मि.मी पाऊस
बुलडाणा, (जिमाका) दि.8 : जिल्ह्यात
कालही कमी अधिक प्रमाणात पावसाने आपली हजेरी लावली. काही तालुक्यांमध्ये त्याची
जोरदार बॅटींग अनुभवयाला आली, तर काही ठिकाणी विश्रांती घेत पाऊस बरसत होता. पावसाने
आपली संततधार कायम ठेवत सरासरी 26.4 मि.मी नोंद केली.
जिल्ह्यात मोताळा तालुक्यात सर्वात जास्त 61.5
मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील
नोंदीनुसार सरासरी 26.4 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला
पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची. बुलडाणा : 50.7 मि.मी (653.2), चिखली : 12.8 (606.3),
दे.राजा : 28 (584), सिं. राजा : 21.2 (766.5), लोणार : 20 (758.3), मेहकर : 16.8
(928.3),
खामगांव : 22 (587.3), शेगांव : 15.3 (391.8),
मलकापूर : 28.9 (461.1), नांदुरा : 29.5 (474.8), मोताळा : 61.5 (523.2),
संग्रामपूर : 22.5 (519.9), जळगांव जामोद : 14.1 (365.2)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7619.9 मि.मी पावसाची
नोंद झाली असून त्याची सरासरी 586.1 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 365.2 मि.मी
पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 51.65 आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील
तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात
टक्केवारी – नळगंगा : 38.67 दलघमी (55.78), पेनटाकळी : 25.77 दलघमी (42.96),
खडकपूर्णा : 81.20 दलघमी (86.94), पलढग : 3.39 दलघमी (45.14), ज्ञानगंगा : 27.28
दलघमी (81.29), मन : 35.24 दलघमी (95.70), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.17
दलघमी (54.36), तोरणा : 4.78 दलघमी (60.65) व उतावळी : 19.79 दलघमी (100).
100 टक्के
भरलेले लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प
जिल्ह्यात 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प : देऊळगांव कुंडपाळ ता. लोणार, गुंधा ता. लोणार, तांबोळा ता. लोणार, कंडारी
ता. नांदुरा, घनवटपूर ता. मेहकर, मिसाळवाडी ता. दे.राजा, अंचरवाडी -1 ता. दे.
राजा, अंचरवाडी -2 ता. दे. राजा, टाकळी ता. खामगांव, निमखेड ता. खामगांव, पांगरखेड
ता. मेहकर, कळमेश्वर ता. मेहकर, चायगांव ता. मेहकर, टिटवी ता. लोणार, शिवणी जाट
ता. लोणार, गांधारी ता. लोणार, पिंपळनेर ता. लोणार, गारखेड ता. सिं.राजा, विद्रुपा
ता. सिं.राजा. मध्यम प्रकल्प : मध्यम पाटबंधारे प्रकल्प दुर्गबोरी ता. मेहकर.
********
No comments:
Post a Comment