Tuesday, 5 January 2021

DIO BULDANA NEWS 5.1.2021

 ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट; 9664 उमेदवार रिंगणात

  • 27 ग्रामपंचायतीमध्ये 95 सदस्यांची अविरोध निवड

  बुलडाणा,(जिमाका) दि. 5:  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काल 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची  तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काल 4 जानेवारी रोजी 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून ग्राममपंचायतीसाठी 9664 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणूकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये अविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये 95 सदस्य अविरोध निवडून आले आहेत.

  जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 527 ग्रामपंचायतींसाठी 13 हजार 320 उमेदवारांकडून 13 हजार 609 अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 179 उमेदवारांचे 210 अर्ज नांमजूर करण्यात आले. छाननीअंती बाद झालेल्या अर्जानंतर 13 हजार 141 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज शिल्लक आहेत. सध्या माघारीनंतर 9 हजार 664 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.  सर्वात जास्त 1387 उमेदवार खामगांव तालुक्यात असून अर्ज 1405 आहेत. बुलडाणा तालुक्यात 1171 उमेदवार, चिखलीमध्ये 1110, दे. राजा तालुक्यात 262, सिं. राजामध्ये 610, मेहकरमध्ये 795, लोणार तालुक्यात 301, शेगांव तालुक्यात 635, जळगांव जामोदमध्ये 456, संग्रामपूर तालुक्यात 574, मलकापूरमध्ये 581, नांदुरा तालुक्यात 776 व मोताळा तालुक्यात 1006 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 ***********

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक इ- आर विवरण पत्र सादर करावे

· 31 जानेवारी 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 5:   सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

    माहे डिसेंबर 2020 चे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. दि 1 जानेवारी 2021 पासुन सुरू झाले असून सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 31 जानेवारी 2021 आहे. तरी सर्व आस्थापना/उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .०७२६२-२४२३४२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                *****

श्वान प्रजनन व विपनन केंद्राची प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करावी

  • पशुसंवर्धन उप आयुक्त यांचे आवाहन

बुलडाणा ,(जिमाका) दि. 5:   पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 या नियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्याची दुकाने व श्वान प्रजनन, विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरू करू नये. अशा सुचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यायत येत आहे. सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर मालक यांनी लवकरात लवकर आपल्या पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटरची नोंदणी करण्याकरीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी जी बोरकर यांनी केले आहे.

                                                *****

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाज वेळा बदलल्या

  • आकस्मिक प्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध असणार

बुलडाणा , (जिमाका) दि. 5:   पशुसंवर्धन विभागामार्फत पशुच्या वैद्यकीय सेवेकरीता जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये व फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समावेश आहे. आता या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांची सोमवार ते शुक्रवार कामकाजाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4.30 पर्यंत, जेवनाची सुट्टी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच शनिवार रोजी सकाळी 8 ते दु 1 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असणार आहे. पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन  आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी जी बोरकर यांनी केले आहे.  

                                                                                                ********

आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांनी बचतीचा तपशिल सादर करावा

  • जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका)  दि. 5:  राज्य शासनाच्या निवृत्ति वेतनधारक व कुटुंब निवृत्ति वेतनधारकांनी सन 2020-2021 या आर्थिक वर्षामध्ये आयकरास पात्र असल्यास त्यांनी आपल्या गुंतवणूकीचा तपशील सादर करावा.   मिळालेल्या उत्पन्नातून आयकर सूट मिळण्यासाठी केलेल्या बचतीचा तपशील 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.

    तपशिलात बँकेचे नाव शाखा , पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक असून पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी. तसेच गणनापत्रक चलान आदी तपशील सादर करावा.  तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आयकरास पात्र असल्यास आपल्या बचतीचा तपशील कोषागार कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

                                                                        ******

कोरोना अलर्ट : प्राप्त 267 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह

•       9  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 321 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 267 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 170 तर रॅपिड टेस्टमधील 97 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 267 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव तालुका : जळका तेली 1, पि. राजा 1, सुटाळा 2,  बोरी अडगांव 1, नांदुरा तालुका : निमगांव 1,  खामगांव शहर : 7, दे. राजा शहर : 4, चिखली तालुका : वाघोरा 1, नायगांव 1, वाघापूर 1,   चिखली शहर : 13, सिं. राजा तालुका : पळसखेड चक्का 1,  लोणार शहर : 2, लोणार तालुका : भुमराळा 1, मोताळा शहर : 1,  मोताळा तालुका : खरबडी 2, पिं देवी 1,  बुलडाणा शहर : 6, मेहकर शहर : 2,  मेहकर तालुका : जानेफळ 1, जळगांव जामोद शहर : 3,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हेडगेवार हॉस्पीटलजवळ चिखली येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 9  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 3, बुलडाणा : अपंग विद्यालय 5, सिं. राजा : 1.

  तसेच आजपर्यंत 92055 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12260 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12260 आहे. 

  तसेच 672 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 92055 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12779 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12260  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 366 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 153 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

 

 

No comments:

Post a Comment