राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2020
प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा (जिमाका), दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील 436 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील 3 (अ) (ब) तसेच नियम 2- अ पोटनियम 4 अन्वये जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी 436 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिलांसाठी राखीव आरक्षण आज 29 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते. तसेच तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधीत तालुक्याचे तहसिलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.
तालुकानिहाय एकूण ग्रामपंचायती, प्रवर्ग निहाय एकूण ग्रामपंचायती व महिलांसाठी आरक्षीत ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा - एकूण ग्रामपंचायत 66, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 12 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 33 पैकी 17 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रापं 33. चिखली - एकूण ग्रामपंचायत 99, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 11 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 27 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 48 पैकी 24 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. मेहकर : एकूण ग्रामपंचायत 98, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 45 पैकी 23 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. लोणार : एकूण ग्रामपंचायत 60, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 2 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 16 पैकी 8 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 16 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 31. सिं. राजा : एकूण ग्रामपंचायत 80, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 18 पैकी 9 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 22 पैकी 11 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 39 पैकी 20 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 41. दे. राजा : एकूण ग्रामपंचायत 48, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी निरंक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 22. मलकापूर : एकूण ग्रामपंचायत 49, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 24 पैकी 12 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. मोताळा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 15 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 33. नांदुरा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 32 पैकी 16 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 32. खामगांव : एकूण ग्रामपंचायत 97, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 46 पैकी 23 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 48. शेगांव : एकूण ग्रामपंचायत 46, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 10 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 12 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 23. जळगांव जामोद : एकूण ग्रामपंचायत 47, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 7 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 19 पैकी 10 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. संग्रामपूर : एकूण ग्रामपंचायत 50, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25.
अशाप्रकारे एकूण जिल्ह्यात 870 ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 170 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षीत आहे. त्यापैकी 85 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 50 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण आहे. यापैकी 25 ग्रामपंचायती महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 235 ग्रा.पं सरपंच पद आरक्षण असून त्यापैकी 118 महिलांसाठी राखीव आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 415 ग्रामपंचायतींपैकी 208 ग्रा.पं सरपंच पदावर महिला आरूढ होणार आहे.
No comments:
Post a Comment