Thursday, 21 January 2021

DIO BULDANA NEWS 21.1.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 554 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 30 पॉझिटिव्ह • 69 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 584 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 408 तर रॅपिड टेस्टमधील 146 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 554 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे.राजा शहर : 6, दे. राजा तालुका : सिनगांव जहांगीर 3, चिखली शहर : 1, चिखली तालुका : उंद्री 1, शेगांव शहर : 2, शेगांव तालुका : आळसणा 1, टाकळी धारव 1, मोखा बाळापूर 1, बुलडाणा तालुका : बोरखेडी 1, येळगांव 1, गुम्मी 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : कुंड बु 1, दसरखेड 4, संग्रामपूर तालुका : अकोली 2, मोताळा शहर : 1, येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 30 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान लोणार येथील 68 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 69 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 17, बुलडाणा : अपंग 7, स्त्री रूग्णालय 13, चिखली : 5, शेगांव : 14, सिं. राजा : 4, मेहकर : 1, लोणार : 5, नांदुरा : 1. तसेच आजपर्यंत 98720 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12988 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12988 आहे. तसेच 837 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 98720 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13507 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12988 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 356 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 163 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********** खामगांवात अवैध गुटखा साठ्यावर धाड; 35 लक्ष किंमतीचा माल जप्त अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई बुलडाणा,(जिमाका) दि. 21 : अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खामगांव येथील डि.पी रस्त्यावरील राघव संकुलातील गाळ क्रमांक 3 व 4 मधील अवैधरित्या साठविलेल्या प्रतिबंधीत गुटखा साठ्यावर 20 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्री धाड टाकण्यात आली. यावेळी पंचासमक्ष तपासणी केली असता नजर प्रिमियम गुटखा 30 लक्ष 60 हजार रुपये, गोवा 1000 गुटखा 4 लक्ष 32 हजार रुपये, आर जे पानमसाला 71,500 रुपये व आर ओ सुगंधीत तंबाखु 550 रुपये, असा एकूण 35 लक्ष 67 हजार 50 रूपये किंमतीचा साठा जप्त करुन सिलबंद करण्यात आला आहे. राज्यात गुटका, मावा, पानमसाला व तत्सम तंबाखुजन्य पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री या वस्तुवर प्रतिबंध घातलेला आहे. राज्याचे अन्न औषधी प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाने सातत्याने प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत आले आहे. कारवाईवेळी हजर व्यक्ती अजय सिध्दार्थ खंडारे यांच्याविरुध्द प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा विक्रीसाठी साठा केल्यावरुन अन्न सुरक्षा कायदा 2006 अन्वये खामगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई अमरावती विभागाचे सहायक आयुक्त सु. ग. अन्नापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त स. द. केदारे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके गु. कि. वसावे, देशमुख या पथकाने ही कारवाई केली. कारवाई वेळेस पोलीस उपनिरिक्षक रणजितसिंग ठाकुर यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकास सुरक्षा व सहकार्य केले. तसेच अन्न औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रतिबंधीत अन्न पदार्थाची मोहिम कठोरपणे राबविण्यात येणार आहे. प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास जनतेने प्रशासनास कळवावे, असे आवाहन सहायक आयुक्त स. द केदारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ******** वाहनाच्या जाहीर लिलावाचे आयोजन बुलडाणा,(जिमाका) दि. 21 : राज्यकर उपआयुक्त (प्रशा.) वस्तू व सेवा कर कार्यालय, खामगांव कार्यालयातील जुने वाहन महिंद्रा कंपनीची डिझेल जीप एम. एच - 01 - बी. ए. 5504 क्रमांकाचे वाहन जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येत आहे. सदर वाहनाचा जाहीर लिलाव दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी राज्यकर उपआयुक्त (प्रशा.) वस्तू व सेवा कर भवन, जयस्तंभ चौक, नांदुरा रोड, खामगांव येथे दुपारी 12 वाजेपासून सुरु करण्यात येणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती लिलाव सुरू होण्यापूर्वी वाचून दाखविल्या जाणार आहेत. तसेच संबंधीत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पाहावयास उपलब्ध होतील. निविदा सिलबंद पाकीटात 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. विहीत नमुन्यातील निविदेसोबत निवीदाकाराने स्वत:चे आधार कार्ड, पॅन काउर् व एक पासपोर्ट फोटो सादर करावा. निवीदा 50 रुपये किमतीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मिळतील. निवीदेसोबत DEPUTY COMMI SALES TAX VAT ADM (स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खामगांव) या नावाचा 2000 रूपये इतक्या रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट सुरक्षा ठेव म्हणून सादर करावा. बोलीचा अनादर झाल्यास सुरक्षा ठेव जप्त करण्यात येईल. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम आल्यासच वाहन विक्रीचा व्यवहार पार पाडला जाईल. निर्लेखीत वाहन कार्यालयाच्या आवारात शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत पाहावयास उपलब्ध आहे, असे वस्तू व सेवाकर कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000000
सुनील प्रेम माळी या बालकाच्या आई – वडीलांनी संपर्क साधावा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि. 21 : जिल्हा बाल कल्याण समितीने दि. 14 जुलै 2020 रोजी जिल्हा बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेले बाळ सुनील प्रेम माळी अंदाजे वय 4 वर्ष राहणार सैलानी ता. जि. बुलडाणा याला दि.लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया) बुलडाणा संस्थेत दाखल करुन घेण्यात आले आहे. परंतु 2 महिन्यांपासून बाळाला भेटण्यासाठी अद्यापपर्यत कुणीही संपर्क साधलेला नाही. बाळाची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातुन पुनर्वसन करणे आवश्यक आहे. तसेच अशा वर्णनाचे मुलाचे आई वडीलांनी दि.लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया) बुलडाणा संस्थेमध्ये 10 दिवसांच्या आत तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा सदर बालकाचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा बाल कल्याण समिती बालकाला दत्तक विधानाकरीता मुक्त घोषित करेल, असे जिल्हा बाल कल्याण समिती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment