कोरोना अलर्ट : प्राप्त 574 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 62 पॉझिटिव्ह
• 37 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 636 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 60 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 497 तर रॅपिड टेस्टमधील 77 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 574 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 7, बुलडाणा शहर : 14, बुलडाणा तालुका : बिंरसिंगपूर 1, नांदुरा तालुका : शेंबा 1, शेलगांव मुकूंद 4, तारखेड 1, रसूलपुर 1, खामगांव शहर : 13, खामगांव तालुका : आवार 1, पारखेड 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : धोडप 1, दे. राजा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 2, जळगांव जामोद शहर : 3, मेहकर शहर : 1, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, सावखेड तेजन 2, मलकापूर शहर : 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 62 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मासरूळ ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 37 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 7, सिं. राजा : 1, चिखली :3, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, स्त्री रूग्णालय 4, शेगांव : 12, मलकापूर : 4, नांदुरा : 1, लोणार : 1, दे. राजा : 3,
तसेच आजपर्यंत 89803 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12177 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12177 आहे.
तसेच 1809 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 89803 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12580 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12177 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 521 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
- 10 जानेवारी 2021 पर्यंत मुदत
- शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.1 : कृषि विभागाने आता महा-डिबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक
संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने कृषि विभागाचे महाडीबीटी पोर्टल योजना ही अर्ज एक व योजना अनेक असलेली आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/
शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
ज्या शेतकरी बांधवांनी महा डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल. त्यांनी दिनांक 10 जानेवारी 2021 अखेर आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील.
जिल्हाधिकारी कार्यालयात
माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरीत शपथ
बुलडाणा,(जिमाका) दि.1 : निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माझी वसुंधरा अभियानातंर्गत प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अधिकारी-कर्मचारी यांना शपथ दिली.
प्रत्येक नागरिकाला सहभागी करून माझी वसुंधरा अभियानाला गती देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग म्हणून 1 ते 15 जानेवारी दरम्यान माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नविन वर्षाच्या सुरवातीला हरित शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी ही शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, तहसिलदार श्रीमती डाबेराव आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अधिकारी-कर्मचारी यांनी शासकीय कामकाजात कागदाचा काटकसरीने उपयोग, ऊर्जा बचत करणाऱ्या साधनांची खरेदी, एकदाच उपयोगात येणाऱ्या वस्तूंची खरेदी टाळणे, खानपाणाच्या ठिकाणी अन्नाचा दुरूपयोग टाळणे, हरित भेट वस्तूंचा अंगीकार करण्याबाबत शपथ घेतली.
No comments:
Post a Comment