Tuesday, 19 January 2021

DIO BULDANA NEWS 19.1.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 262 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह • 38 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 306 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 262 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 114 तर रॅपिड टेस्टमधील 148 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 262 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : पळशी 2, सुटाळा 2, बुलडाणा शहर : 17, बुलडाणा तालुका : पाडळी 1, शेगांव शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, वाकड 1, चिखली तालुका : सावरखेड 1, भेराड 1, चिखली शहर : 2, नांदुरा तालुका : धाडी 4, मेहकर शहर : 2, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : वडगांव 1, मलकापूर शहर : 1 येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वृंदावन नगर, मलकापूर येथील 75 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 38 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 8, शेगांव : 9, मलकापूर : 3, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, स्त्री रूग्णालय 1, दे. राजा : 1, मोताळा : 3. तसेच आजपर्यंत 97570 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12895 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12895 आहे. तसेच 818 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 97570 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13425 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12895 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 370 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 160 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *******
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली कोविडची लस जिल्ह्यात 6 ठिकाणी लसीकरण बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : कोविड या साथरोगाला हद्दपार करण्यासाठी व कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड लसीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार 16 जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या दिवशी 575 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी होता. आजही जिल्ह्यात बुलडाणा, खामगांव, शेगांव, मलकापूर, चिखली व दे. राजा अशा 6 केंद्रांवर लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी आज कोविडची लस घेतली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व संबंधीत व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी कोविडची लस घेण्याचे आवाहन केले आहे. -- रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन वाहनांना लावले रिफ्लेक्टीव्ह टेप बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : जिल्ह्यात 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन आज 19 जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे करण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्यासह परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते. अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याहस्ते रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक असणारे रिफ्लेक्टीव्ह टेप वाहनांना लावण्यात आले. तसेच वाहनधारकांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले. उद्घाटनावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. **********

No comments:

Post a Comment