Friday, 22 January 2021

DIO BULDANA NEWS 22.1.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 461 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 32 पॉझिटिव्ह • 28 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 493 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 461 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 319 तर रॅपिड टेस्टमधील 142 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 461 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : चांडोळ 1, जनुना 1, चिखली तालुका : बेराळा 1, चिखली शहर : 1, लोणार तालुका : खुरमपूर 4, मोताळा तालुका : तळणी 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : वरवंड 1, खामगांव तालुका : पळशी 1, शेगांव शहर : 9, शेगांव तालुका : वरखेड 1, दे. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : ताडशिवणी 1, मलकापूर पांग्रा 1, येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 32 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 28 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : सिं. राजा : 2, खामगांव : 5, लोणार : 2, जळगांव जामोद : 2, मलकापूर : 8, चिखली : 1, मोताळा : 1, शेगांव : 7. तसेच आजपर्यंत 99181 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13016 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13016 आहे. तसेच 1713 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 99181 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13539 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13016 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 360 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 163 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********** छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देवून गोरविण्यात येते. हा पुरस्कार महसुल विभाग स्तर, राज्यस्तर अशा 2 स्तरांवर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था , सेवाभावी संस्था, ग्राम/विभाग/ जिल्हा या 5 संवर्गात देण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारसाठी प्रस्ताव दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यत मागविण्यत येत आहे. तसेच पुरस्काराचे स्वरुप, अटी व शर्ती विहीत प्रपत्रामधील अर्ज विभागीय वनधिकारी बुलडाणा संबंधित तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग येथे उपलब्ध असुन अधिकचे माहितीसाठी कृपया त्यांचेशी समक्ष संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. 000000 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा दौरा बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर या 23 जानेवारी 2021 रोजी बुलडाणा जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दिनांक 23 जानेवारीला सकाळी 5.08 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आगमन व राखीव, सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथून देऊळघाटकडे प्रयाण, सकाळी 8.15 वा देऊळघाट येथे मुश्ताक अहमद, माजी उपसभापती पं.स बुलडाणा यांचे निवासस्थानी भेट, सकाळी 8.30 वा देऊळघाट येथून बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 9 वा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी भेट व राखीव, सकाळी 9.30 वा बालगृह, चिखली रोड येथे भेट व पाहणी, सकाळी 10 वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, सकाळी 10.15 वा इंटक कार्याध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे यांच्या चिखली रोड, बुलडाणा येथील निवास्थानी भेट, सकाळी 10.30 वा बुलडाणा येथून वाहनाने चिखलीकडे प्रयाण, सकाळी 11.15 वा चिखली येथे शिवाजी महाविद्यालय परीसरातील स्व. पंढरीनाथ पाटील यांचे समाधी स्थळाला भेट, दु. 11.45 वा चिखली काँग्रेसच्यावतीने मौनी महाराज संस्थान येथे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभास उपस्थिती, दु. 2 वा चिखली येथून खामगांवकडे प्रयाण, दु. 3.30 वा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे निवास, खामगांव येथे आगमन व राखीव, दु 4 वा महाविकास आघाडी खामगांवतर्फे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभास उपस्थिती, सायं 6 वा खामगांव येथून शेगांवकडे प्रयाण, सायं 7 वा शेगांव येथे श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दर्शन, सायं 7.30 वा शेगांव येथून शासकीय वाहनाने अकोला – दर्यापूर मार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील. ******************
यंत्रणांनी जिल्हा नियोजनची तरतूद विहीत कालावधीत खर्च करावी - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा घेतला आढावा बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे निधी खर्च करण्यावर मर्यादा होत्या. आता मात्र जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार यंत्रणांनी सन 2020-21 मधील प्राप्त निधी विहीत कालावधीत खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, उपवनसंरक्षक श्री. गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसरंक्षक (वन्यजीव) श्री. रेड्डी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. या वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून खोल्या दुरूस्त करून घ्याव्यात. तसेच ज्या खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले आहे, त्यांचे तातडीने काम करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पैसा दिला जाईल. शाळांमध्ये स्वच्छतागृह असावीत. प्रत्येक शाळेत मुलींसाठी प्राधान्याने स्वच्छतागृह करावे. ज्या शाळेत स्वच्छतागृह नाहीत, अशा ठिकाणी प्राधान्याने काम पूर्ण करावे. तालुका क्रीडा संकूल, क्रीडांगण विकासाचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी शारिरीक चाचणीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी मोठ्या गावांमध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालकमंत्री पुढे म्हणाले, तांडा वस्ती सुधार योजनेमध्ये वाढीव निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावे. महिला व बालविकास विभागाचे अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करावी. त्याचे वजन व दर्जा नियमित तपासत रहावा. आरोग्य विभागाने कोरोना या संकटाला संधी बनवून जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाचा प्रस्ताव तयार करावा. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय व अन्य शासकीय रूग्णालयांमधील फायर ऑडीट करून घ्यावे. रूग्णालयांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बळकट करावी व नसल्यास ती तात्काळ उभारावी. यासाठी आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. सीएसआर मधून सिं. राजा येथे रक्तपेढी मंजूर करण्यात आली आहे. यापद्धतीने अन्य ठिकाणी रक्तपेढी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत फार जुनी आहे. या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. इमारत मंजूर झाल्यास तोपर्यंत रूग्णांसाठी पर्यायी जागा तयार ठेवावी. या इमारतीसाठी शासनाकडून निधी आणण्यात येईल. याप्रसंगी संबंधीत यंत्रणा प्रमुखांनी आपल्या विभागाची माहिती दिली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे सादरीकरण केले. अनुसूचित जाती उपयोजनेचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड यांनी केले. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. ********** राष्ट्रीय महामार्गांच्या कामामधील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहेत. त्यामधील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, तर काहींचे काम सुरू आहेत. मात्र काही रस्ता कामात भूसंपादन, वन जमिनीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तरी संबंधीत यंत्रणांनी या रस्ता कामांमधील भूसंपादनाचे व वन जमिनीचे प्रश्न मार्गी लावावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. रस्ता कामामधील भूसंपादन व वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, उपवनसंरक्षक श्री. गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसरंक्षक (वन्यजीव) श्री. रेड्डी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ शिंगणे सूचना देताना म्हणाले, चिखली ते दे. राजा महामार्गावरील टाकरखेड जवळील भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावून पुलावजवळील दोन्ही रस्ता पूर्ण करावा. चिखली ते खामगांव रस्त्यावरील पेठ गावाजवळील पैनगंगा नदीवरील पुलाचे कामही भूसंपादनामुळे थांबलेले आहे. याठिकाणी सुद्धा भूसंपादन करून जागा द्यावी. जेणेकरून पुलाचे काम मार्गी लागेल. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. --

No comments:

Post a Comment