लोकसेवा हक्क अधिनियमातंर्गत 486 शासकीय सेवा
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे. या अधिनियमावर 28 एप्रिल 2015 पासून अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे. या कायद्यातंर्गत विविध 40 शासकीय कार्यालयांमधील 486 प्रकारच्या सेवांचा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर 2015 ते डिसेंबर 2020 या कालावधीत महसूल विभागाच्या 18 अधिसुचीत सेवांचे एकूण 24 लक्ष 9 हजार 650 एवढे अर्ज ऑनलाईन स्वरूपात प्राप्त झाले आहे. त्यापैकी 24 लक्ष 274 एवढे ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्या आलेले आहे.
सर्व सेवा ह्या विहीत कालावधीत पुरविण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकरीता ग्रामपंचायत, तालुका स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र देण्यात आलेले आहेत. नागरिक या केंद्राचा उपयोग करून हव्या असलेल्या सेवा करीता ऑनलाईन अर्ज पोर्टलवर करू शकतात. तसेच aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील नागरिक स्वत: अर्ज करू शकतात. सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी सदर प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करता यावा याकरिता मोबाईल अप्लीकेशन आपले सरकार तयार केलेले असून ते गुगल प्ले स्टोअर वर विनामूल्य उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून हव्या, त्यावेळी आवश्यक असलेल्या सेवांकरिता नागरीक अर्ज सादर करू शकतात . तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सेवा हमी कायद्याचा उपयोग करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्याहस्ते महाज्योती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्ताने महाज्योतीकडुन ऑन लाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संपुर्ण जिल्हास्तरावर राबविण्यात आली. जिल्हयातील संपुर्ण महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ऑन लाईन निबंधाच्या माध्यमातुन यात सहभाग घेतला.
या निबंध स्पधेचे विषय स्त्री-पुरूष समानता, सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांचे विचार हे होते. स्पर्धेचे सनियंत्रण महाज्योतीचे समन्वयक अविनाश खिल्लारे, उमेश खराडे यांनी केले तर मुल्यांकन प्रा.सौ प्रियंका देशमुख, सतिश बाहेकर यांनी केले. तसेच विजेत्या स्पर्धकाला क्रमांकाची निवड सहाय्यक आयुक्त् डॉ अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या स्पर्धचे प्रथम पारीतोषिक कु.पल्लवी गजानन अंभोरे, मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा व्दितीय प्रद्युम्न किसन लोखंडे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद तर तृतीय क्रमांक कु वैष्णवी महेश ठाकरे, जी. एस. कॉलेज खामगाव यांना मिळाला.
सदर विजेत्यांना पारीतोषिक वितरण जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्याहस्ते 28 जानेवारी रोजी त्यांच्या दालनात करण्यात आले. प्रथम पारीतोषिक दहा हजार रु, व्दितीय पाच हजार व तृतीय दोन हजार पाचशे रुपये होत. त्यानुसार सदर रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड, समाज कल्याण निरीक्षक राजेश खरुले, क.ली प्रणिता बावणकर, तालुका समन्वयक सतिश बाहेकर उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले .
*********
कोरोना अलर्ट : प्राप्त 935 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 60 पॉझिटिव्ह
• 24 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 995 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 935 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 60 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 54 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 827 तर रॅपिड टेस्टमधील 108 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 935 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 13, जळगांव जामोद शहर : 2, दे. राजा शहर : 2, चिखली शहर : 8, चिखली तालुका : केळवद 1, खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : घाटपुरी 1, टेंभुर्णा 1, वझर 1, निपाणा 1, पळशी 1, शेगांव तालुका : जानोरी 1, शेगांव शहर : 8, मोताळा तालुका : खरबडी 1, संग्रामपूर शहर : 2, मूळ पत्ता अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 60 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 24 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 2, स्त्री रूग्णालय 4, दे. राजा : 2, संग्रामपूर : 2, शेगांव : 5, मोताळा : 3.
तसेच आजपर्यंत 116912 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13387 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13387आहे.
तसेच 2030 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116912 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13852 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13387 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 298 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यासाठी सन 2021 साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अक्षय तृतीया शुक्रवार 14 मे 2021, ज्येष्ठागौरी पुजन सोमवार 13 सप्टेंबर आणि सर्वपित्री दर्श अमावस्या बुधवार 6 ऑक्टोंबर 2021 या तीन सुट्टयांचा समावेश आहे. सदर सुट्टीचा आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे
- समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
तरी सन 2020-21 या वर्षाकरीता प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
सिंदखेडराजा मतदारसंघातील
रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागणार
- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सार्व. बांधकाम मंत्र्यासमवेत बैठक
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : सिंदखेड राजा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्तावाबाबत मुंबई येथे बैठक 28 जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत सिंदखेड राजा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. ही बैठक पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या समवेत घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड यांच्यासह अमरावती विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
याप्रसंगी सार्व. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले, आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच या मतदारसंघातील प्रस्तावित 28 कोटी रक्कमेची रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावे.
हे प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेऊ तसेच येत्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीलाही श्री. चव्हाण यांनी सहमती दर्शविली. सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पुल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँक अंतर्गत 5 कोटी 43 लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 28 कोटी 70 लाख किमतीची सुमारे 14 कामे तसेच नाबार्ड अंतर्गत 13 कोटी 38 लाख रक्कमेच्या 10 कामांचा समावेश आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाचे 12 कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे श्री. शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाणा-दुसरबीड-राहेर- वर्दळी ते जालना जिल्हा सिमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वे
*********
फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन
कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल करून तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
पिंपळगांव देवी येथील यात्रा रद्द
- मंदीरातील कार्यक्रमांना 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : मोताळा तालुक्यातील पिंपळगांव देवी येथील जगदंबा देवी संस्थान येथे होणारा यात्रा उत्सव कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पिंपळगांव देवी येथील यात्रा उत्सवास परवानगी देण्यात आली नाही. मात्र मंदीराच्या आतील कार्यक्रमांसाठी 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे.
सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
******
शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे ऑनलॉईन पद्धतीने आयोजन
- प्रशिक्षणासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 5 ते 10 फेब्रुवारी 2021 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. 5 फेब्रुवारी 2021 पर्यत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा, जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.
तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 7 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात शेळी पालनाचे तंत्र, शेळीचे प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, उद्योग संधी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी योगेश डफाडे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
****
वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : वयोवृद्ध व्यक्तींसाठी त्यांचे आयुष्य आनंदी करता यावे यासाठी प्रशिक्षण समाज कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण सावली, सिएएफआर, हेल्पपेज इंडिया, फेसकॉम व एएससिओपी या संस्थांमार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, भेडसावणाऱ्या समस्या, योजनांची ओळख या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मर्यादीत 30 व्यक्तींना देण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी 9860964323 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश किंवा भ्रमणध्वनी करून करावयाची आहे. तरी या प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment