Wednesday, 20 January 2021

DIO BULDANA NEWS 20.1.2021

सरपंच पदांचे महिला आरक्षणाची सोडत 29 जानेवारी रोजी काढणार बुलडाणा,(जिमाका) दि.20 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 27 जानेवारी 2021 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. ************ जिल्ह्यात जुनपासून आतापर्यंत 1024 मोतीबिंदू शस्त्रक्रीया बुलडाणा,(जिमाका) दि.20 : कोरोना-19 काळात राज्यात सगळीकडे मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद असतांना सुध्दा जिल्ह्यामध्ये जुन 2020 पासुन कोरोना नियमावलींचे सर्व पालन करुन मोतीबिंदु शस्त्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात येत आहे. जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये विशेष मोतीबिंदु शस्त्रक्रिया मोहिमेमध्ये एकुण 102 मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जवळपास 8 ते 9 महिन्यांपासुन राज्यभरातील नेत्र मोतीबिंदु शस्त्रक्रिया रखडल्या असतांना जिल्हा आघाडीवर असुन जुन 2020 ते आतापर्यत 1024 मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. तसेच नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जिवने, जिल्हा कार्यकम व्यवस्थापक (अनिका), डॉ. रवि शिंदे, डॉ. बगाडे, डॉ. सौ. शेंडे, नेत्र चिकित्स अधिकारी देवकर, नोडल अधिकारी (अंनिका) अविनाश चिंचोले, जिल्ह्यातील सर्व नेत्र चिकित्सक अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच समता फॉउंडेशन मुंबई यांचे सुध्दा सहकार्य लाभले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे, असे सामान्य रुग्णालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ************* कोरोना अलर्ट : प्राप्त 596 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह • 24 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 648 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 596 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 49 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 481 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 596 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : घाटपुरी 1, पळशी 2, बुलडाणा शहर : 18, दे. राजा शहर : 2, शेगांव शहर : 10, सिं. राजा शहर : 1, सि.राजा तालुका : जाडेगांव 1, सायळा 2, मलकापूर तालुका : बेलाड 4, दुधलगांव बु 1, हरणखेड 2, नांदुरा तालुका : खेडगांव 1, चिखली तालुका : वडती 1, येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 52 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान शेगांव येथील 83 वर्षीय पुरूष व मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 24 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 8, बुलडाणा : अपंग विद्यालय 11, सिं. राजा : 1, खामगांव : 4, तसेच आजपर्यंत 98166 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12919 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12919 आहे. तसेच 883 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 98166 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13477 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12919 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 396 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 162 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********** तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी - अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा,(जिमाका) दि.20 : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्त शाळा, तंबाखूमुक्त आरोग्य संस्था आदी उपक्रम राबविण्यात येतात. तंबाखूमुळे गंभीर आजार होतात. तंबाखू सेवन, विक्री आदीविंषयी तंबाखू नियंत्रण कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी केल्यास तंबाखु सेवनाला प्रतिबंध घालता येईल. तंबाखू विक्री व सेवनाबाबत कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई वाढविण्यात यावी, अशा सूचना प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी आज दिल्या. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. लता बाहेकर आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ लता बाहेकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये पिवळी रेषा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच तंबाखू बाबत संयुक्त पथकाच्या कारवाई वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment