जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे
आरक्षण सोडत जाहीर
- 7 डिसेंबर रोजी
तालुकास्तरावर, तर 10 डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या
अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर
करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम
1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक
निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल
स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.
तसेच
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता
व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे
अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद
सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन
जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त
1413 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 43 पॉझिटिव्ह
• 18 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या
व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1456 अहवाल प्राप्त
झाले आहेत. यापैकी 1413 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त
आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 36 व रॅपीड टेस्टमधील 7
अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1299 तर रॅपिड
टेस्टमधील 114 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1413 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 4, दे.राजा तालुका :
गांगलगांव 1, उमरखेड 1, मोताळा शहर : 2,
बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : माळविहीर 1, कोलवड 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, सावखेड तेजन
1, खामगांव तालुका : पाळा 1, राहुड 2, अंत्रज 1, खामगांव शहर : 5, चिखली शहर : 8,
जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, आसलगांव 1,
जळगांव जामोद शहर : 4, मलकापूर तालुका : बेलाड 1, मूळ पत्ता रामदास पेठ, अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय
प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी
देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा :
अपंग विद्यालय 8, दे. राजा : 3, नांदुरा : 1, लोणार : 5.
तसेच
आजपर्यंत 70773 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10511
कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या
10511 आहे.
तसेच 3923
स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 70773
आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10974 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10511
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 329 कोरोना बाधीत रूग्णांवर
उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
बुलडाणा, दि. 26
: भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना
संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन
साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण
करण्याच्या घटनेला यावर्षी 71 वर्ष पूर्ण झाले आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह
दुबे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, निवासी
उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित
अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
No comments:
Post a Comment