कोरोना अलर्ट : प्राप्त 1783 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह
• 53 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1801 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1783 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1651 तर रॅपिड टेस्टमधील 132 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1783 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, चिखली तालुका : मेरा खु 1, दहीगांव 1, सावखेड बु 1, धोत्रा भणगोजी 1, चिखली शहर : 2, खामगांव तालुका : घाणेगांव 1, खामगांव शहर : 2, सिं. राजा शहर : 1, दे. राजा शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 53 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1, अपंग विद्यालय 11, चिखली : 18, शेगांव : 2, मेहकर : 4, मोताळा : 1, लोणार : 1, खामगांव : 3, दे. राजा : 9, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 2,
तसेच आजपर्यंत 69360 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10493 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10493 आहे.
तसेच 4392 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 69360 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10931 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10493 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 304 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
******
युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाचे अर्थसहाय्य
- बार्टीतर्फे पूर्व तयारी व प्रशिक्षणासाठी 50 हजाराचे अर्थसहाय्य
- 8 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.25: या वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करीत आहेत, अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एक रकमी 50 हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संसथा अर्थात बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत. त्यांनी बार्टीच्या www.barti.in या संकेतस्थळावर भेट देवून पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व प्रशिक्षणाकरिता दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली व परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबर रोजी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी भा. ऊ खरे यांनी कळविले आहे.
*********
शासकीय मुलांचे बालगृहातील अमजद खान राजा खान
नामक बालकाच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा
- शासकीय मुलांचे बालगृह अधिक्षकांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.25: शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, बुलडाणा या संस्थेत अमजद खान राजा खान नामक बालक 12 डिसेंबर 2015 पासून बाल कल्याण समितीच्या आदेशाने दाखल आहे. बालकाचे काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बालकाच्या आई- वडीलांनी किंवा नातेवाईकांनी पुढील पाच दिवसाच्या आत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, हाजी मलंग दर्ग्याच्या पाठीमागे, चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच 9960338000 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. अन्यथा बाल कल्याण समिती, बुलडाणा काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पुर्नवसनासाठी योग्य ती कार्यवाही करणार आहे, असे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह / बालगृह अधिक्षक यांनी कळविले आहे.
गुजरात, गोवा, राजस्थान व दिल्ली येथून जिल्ह्यात येणाऱ्यांना कोविड निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य
बुलडाणा,(जिमाका) दि.25: राज्य शासनाच्या 23 नोव्हेंबर 2020 च्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात गुजरात, राजस्थान, गोवा व दिल्ली राज्यातून विमान, रेल्वे व रस्ता मार्गाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी आरटी पीसीआर कोविड चाचणी केल्याचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. रेल्वेद्वारे या राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या 96 तासांच्या आत आरटी पीसीआर करीता नमुने घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चा निगेटीव्ह कोविड रिपोर्ट नसेल, अशा प्रवाशांची स्क्रिनींग करून तापमान मोजण्यात यावे, याबाबतची जबाबदारी रेल्वे विभागाची असणार आहे. लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी घरी जाण्याची मुभा असणार आहे. लक्षणे असलेल्या प्रवाशांचे विलगीकरण करून त्यांचे अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास अशा प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहणार आहे. रेल्वे व रस्ता मार्गाने येणारे जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बाधीत आढळून आल्यास अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा खर्च प्रवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे.
तसेच रस्ता मार्गाने या राज्यांमधून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची जिल्हा हद्दीवर स्क्रिनींग करून तापमान मोजण्यात येणार आहे. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश दिल्या जाणार असून लक्षणे असलेल्या प्रवाशांसाठी माघारी जाण्याचा पर्याय असणार आहे. लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास अशा प्रवाशांना जिल्ह्यात प्रवास करण्याची मुभा असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 मधील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment