धार्मिक स्थळे नागरीकांसाठी आजपासून खुली
- कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे
- मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे धार्मिक कार्यकमांना बंदी
- चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक
बुलडाणा,(जिमाका) दि.15: राज्य शासनाच्या 14 नोव्हेंबर 2020 च्या आदेशानुसार विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून 16 नोव्हेंबर पासून जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थळे व पुजा करण्याची ठिकाणी नागरीकांसाठी खुली करण्यात येत आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनींग, हँड वाश किंवा सॅनीटाईजर उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधीत संस्थानचे विश्वस्त मंडळ यांची राहणार आहे.
नागरीकांना याठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती, दुर्धर आजार असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षाखालील बालके यांनी घरीच थांबावे. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकमेकांत 6 फुट अंतर ठेवावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवावा. नागरिकांना आजारपणाची काही लक्षणे असल्यास त्यांनी राज्य हेल्पलाईन क्रमांक 104, 020-26127394 किवा जिल्हा हेल्पलाईन 07262-242683 क्रमांकावर संपर्क करावा. थुंकण्यास बंदी राहणार असून थुंकताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.
संस्थानचे विश्वस्त मंडळ, बोर्ड किंवा प्राधिकारी यांनी प्रवेशाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी, हॅड सॅनीटायझर, थर्मल स्क्रीनींग ठेवावे. कोविडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या व्यक्तींनाचा प्रवेश द्यावा. याठिकाणी दैनंदिन कोविडची जनजागृती करण्यात यावी. गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. बुट, चप्पल व तत्सम वस्तू नागरिकांनी आपआपल्या वाहनातच ठेवाव्या. आवारातील दुकानांमध्ये सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. तसेच मार्कींग करून रांगा तयार कराव्या. प्रवेश व निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था करावी. बैठक, आसन व्यवस्थेत सोयाल डिस्टसिंग नियमांचे पालन करावे.
वातानूकुलीत हॉल असल्यास तापमान 24 ते 30 व आर्द्रता 40-70 दरम्यान असावी. पुतळे, मुर्ती व पवित्र वस्तू यांना स्पर्श करता येणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे धार्मिक कार्यक्रम, सभा यांना बंदी असणार आहे. अभिवादन करताना एकमेकांना शारिरीक स्पर्श टाळावा. प्रार्थनेसाठी नागरिकांनी स्वत:च्या चटईचा वापर करावा. सामुदायिक किचनख् अन्नदान मध्ये शारिरीक अंतर ठेवून वाटप करण्यास मुभा असेल. हात पाय धुण्याची ठिकाणी, मुतारी आदी ठिकाणी ठराविक वेळाने निर्जंतुकीकरण करावे. फेकून दिलेले फेस मास्क, ग्लोव्हज यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार, कर्मचारी यांनी कोविड सुरक्षितता नियमावलीनुसार आवश्यक ती कार्यवही करावी. गर्दी ठिकाणी काम करणाऱ्यांनी आठवड्यातून एकवेळ कोविड चाचणी करावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणची भाविक संख्या, जागा व अंतर आदींची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना हमीपत्रासह द्यावी. आजारी असलेला रूग्ण असल्यास विलगीकरण कक्षात ठेवावे. चेहऱ्यावर मास्क बंधनकारक करावा. आजारी व्यक्तीची तात्काळ नजीकच्या वैद्यकीय रूग्णालयास, स्थानिक प्रशासनास माहिती देण्यात यावी. बाधीत रूग्ण आढळल्यास तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंडसंहीता, आपत्ती व्यवस्थापन कायदा आदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
***************
जिल्हाधिकारी कार्यालयात पं. जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
बुलडाणा,(जिमाका) दि.15: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन
बुलडाणा,(जिमाका) दि.15: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.
*********
कोरोना अलर्ट : प्राप्त 1079 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 89 पॉझिटिव्ह* *96 रूग्णांना मिळाली सुट्टी* बुलडाणा,(जिमाका) दि.15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1168 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1079 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 88 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1050 तर रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1079 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेंबा 2, तांदुळवाडी 5, बुलडाणा शहर : 8, बुलडाणा तालुका : पिंपळगाव सराई 3, गुम्मी 2, देऊळघाट 1, साखळी 1, रायपुर 1, हतेडी 2, मोंढळा 2, धाड 2, भडगाव 1, म्हसला 1, मेहकर शहर :3, मेहकर तालुका : सावत्रा 1, नायगाव दत्तापुर 1, मोताळा तालुका : बोरखेडी 2, मोताळा शहर : 2, शेगाव शहर :2, शेगाव तालुका : हिंगणा वैजनाथ 1, गव्हाण 1, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : तुळजापूर 2, दगडवाडी 1, सातेफळ 1, गांगलगाव 6, नायगाव 1, चिखली तालुका : खैरव 1, आमखेड 2, मंगरूळ 2, किनोळा 5, शेलुद 1, अंत्री खेडेकर 1, चांधाई 1, तांदुळवाडी 1, अंबाशि 1, मेरा खुर्द 1, ब्रह्मपुरी 1, चिखली शहर :1, लोणार तालुका : किनगाव जट्टू 1, चिंचोली सांगळे 1, खामगाव शहर : 4, खामगाव तालुका : अटाळी 1, खोलखेड 1, दोंडवाडा 1, संग्रामपूर तालुका : एकलारा 2, मूळ पत्ता ईश्वर कॉलनी अमरावती येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 96 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रुग्णालय 3, अपंग विद्यालय 2, दे. राजा : 9, खामगाव : 19, चिखली :4, मोताळा : 14, लोणार :4, सिंदखेड राजा :9, मलकापूर :4, शेगाव :12, जळगाव जामोद :6, मेहकर : 6, संग्रामपूर :2, नांदुरा :2, तसेच आजपर्यंत 59310 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9857 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9857 आहे. आज रोजी 1623 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 59310 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10408 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9857 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 420 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 131 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे |
No comments:
Post a Comment