Sunday, 22 November 2020

DIO BULDANA NEWS 22.11.2020

 मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्र उपलब्ध करून द्यावे

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार सादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, मात्र छायाचित्र उपलब्ध नाही, अशा  मतदारांनी आपले छायाचित्र आपल्या मतदार यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे उपलब्ध करून द्यावे.       

     विहीत मुदतीत छायाचित्र उपलब्ध करून न दिल्यास मतदान नोंदणी अधिनियम 1960 मधील प्रचलीत तरतुदींनुसार संबंधीत मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी मतदारांचे नाव मतदार यादीमधून कमी करण्याची कार्यवाही करणार आहेत. तरी मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या छायाचित्रे नसलेल्या मतदारांनी त्यांची छायाचित्रे  त्यांच्या मतदार यादी भागांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले आहे.

**********

मतदार यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करून घ्यावी

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत नाव नोंदवावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार सादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याबाबत मतदारांनी खात्री करून घ्यावी.     

     प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आली नाही तसेच दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, अशा मतदारांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत मतदार नोंदणी करून घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले आहे.

*************

       प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्यात 9 वी ते 12 वी पर्यंतच्या आजपासून शाळा सुरू

पालकांची लेखी संमती आवश्यक

शाळेत कोरोना संसर्ग सुरक्षा सुविधा असाव्यात

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राकरीता इयत्ता 9 ते 12 वी चे सर्व शासकीय, खाजगी शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून पालकांची लेखी संमती घ्यावी. संमती घेवूनच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन करायचे आहे.

    विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी सकारात्मक असेल, त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणीत केल्यानंतरच शाळेत उपस्थित रहावे. पुर्ण उपस्थिती बाबातची पारितोषिके शाळा व्यवस्थापन समितीने बंद करावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पुर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून आहे. परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व तत्सम कार्यक्रम तसेच शाळेत गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी राहील. शिक्षकांनी पालकांच्या बैठका ऑनलाईन घ्याव्यात.

 शाळेत हात धुण्याची व्यवस्था, थर्मो मीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक, साबण व पाण्याची सुविधा सुनिश्चित करावी. शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण केलेले असावे. ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर सुरू आहे, त्या शाळा किंवा वसतिगृह स्थानिक प्रशासनाने स्थलांतरीत करण्याची कारवाई करावी. संपूर्ण शाळा, वसतिगृह निर्जंतुकीकरण करावे. त्यानंतरच शाळा किंवा वसतिगृह सुरू करावे. मात्र सदर शाळा किंवा वसतिगृहातील को‍विड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर दुसरीकडे हलविणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परीसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी. वर्गखोली किंवा स्टाफ रूममधील बैठक व्यवस्थेत सोशल डिसटसिंगच्या नियमांचे पालन करावे. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेत दर्शनी भागावर कोविड संसर्ग जनजागृती करणारे, सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर आदींचे फलक लावावे.

    थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शारिरीक अंतराच्या खुणा, चिन्हे यांची शाळा परीसरात आखणी करावी. शारिरीक अंतर राखण्यसाठी येण्या व जाण्याचे स्वतंत्र मार्गांच्या बाणाच्या खुणा असाव्यात. उच्च धोक्याचे पातळीमध्ये असलेले वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत. त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात येवू नये.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलमांनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.


***********

                        जिल्ह्यातील 5900 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले

जिल्ह्यात 9 ते 12 शिकविणारे व कर्मचारी 6050

कमी वेळेत व्यवस्थित नियोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : जिल्ह्यातील 98 टक्के  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी सादर करण्यात आले आहे. इयत्ता 9 ते 12 वी च्या मुलांच्या  शाळा सुरु करण्याचे शासनाचे आदेश असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात 9 वी  ते 12 वी ला शिकविणारे शिक्षक व शाळेत काम करणारे  शिक्षकेतर कर्मचारी ह्यांची एकूण  संख्या 6050 आहे. 

 जिल्ह्यात अत्यंत  कमी वेळेत  व्यवस्थित नियोजन करुन  जिल्हाभरात तीन दिवसात  18   ते 20  नोव्हेंबर दरम्यान 5900 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने गोळा करुन प्रयोगशाळेला पाठवले गेले.   ह्याच वेळी नियमीत चाचणी मधील इतर लोकांचेही 1500 नमुने गोळा केले गेले व तेही प्रयोशाळेमध्ये पाठवले गेले. हे तीन चार दिवस तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ह्यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच जिल्हाभरातील शिक्षकांनीही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद  दिला. यासाठी जिल्हास्तरावरुन प्रत्येक तालुक्याला नियोजन करुन देण्यात आले.तालुक्यातील शाळा त्या त्या पीएचसीला, ग्रामीण रुग्णालयाला नेमुन देण्यात आली. त्यातही तारीख व वेळ निश्चित करुन दिल्याने  कुठेही गर्दी वा गोंधळ झाला नाही. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हे नमुने गोळा झाले.  बुलडाणा येथील स्वॅब नमुने  तपासणी  प्रयोशाळेची क्षमता ही दिवसाकाठी 1200 च्या आसपास असल्याने ह्या प्रयोशाळेवर सद्यस्थितीत एकदम लोड आलेला आहे. तरीही तेथील डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग हा अतिरिक्त वेळेतही नमुन्यांची तपासणीचे काम करत असुन नियमित क्षमतेपेक्षा जास्त अहवाल तयार  करत आहे. आतापर्यंत 3500 अहवाल तयार झाले आहेत.

  सकारात्मक आलेल्या शिक्षकांची संख्या खुपच कमी आहे ही समाधानाची बाब आहे. सकारातम्क शिक्षकांना शाळेत न जाता उपचार घ्यावे लागतील. नंतर पुढे विहित कालावधी गेल्यानंतर  वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्यांना शाळेत रुजु होता येईल. ज्या शिक्षकांचे अहवाल नकारात्मक येतील ते मात्र सोमवारी शाळेत हजर होतील. असे असले तरीही सोमवार पर्यंत 100% शाळांचे  अहवाल  मिळणे शक्य नसल्याने सर्व शाळा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी सुरु होणार नाहीत. जेथे अशा अडचणी आहेत तेथे शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबतही निर्देश मिळालेले आहेत. म्हणून ज्या शाळांच्या शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले त्या सोमवारी उघडतील. तसेच ज्या शाळांमधील शिक्षकांचे  अहवाल प्राप्त होणार नाहीत, त्यांना शासनाच्या निर्देशानुसार शाळेत जाण्यास परवानगी नसल्याने  त्या शाळा एक किंवा दोन दिवस उशीरा उघडतील.  शासनाने अत्यंत सुस्पष्ट अशा सविस्तर मार्गदर्शक सुचना 10 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकात नमुद केलेल्या असुन  सदर परिपत्रकातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी  यांनीही जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा सविस्तर आदेश काढलेला आहे. त्यामुळे एकंदरीत  ह्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश शाळा उघडतील व सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करतील व विद्यार्थ्यांचे भविष्य पुनश्च एकदा घडायला सुरुवात होईल ह्यात शंका नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.


**************

No comments:

Post a Comment