Monday, 2 November 2020

DIO BULDANA NEWS 2.11.2020

 ई लोकशाही दिनात 7 तक्रारी प्राप्त

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते.   या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतातमात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने आज 2 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. या लोकशाही दिनामध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमाकाच्या माध्यमातून 7 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 6 तक्रारी शासन परिपत्रकानुसार लोकशाही दिन कक्षेत येत नसल्यामुळे सर्व सामान्य तक्रार म्हणून स्वीकृत करण्यात आल्या. तर एक तक्रार लोकशाही दिनामध्ये स्वीकृत झाली. या लोकशाही दिनात जिल्हा भूमी अधिक्षक कार्यालयाशी संबंधीत एक तक्रार निकाली काढण्यात आली आहे.

******

कोरोना अलर्ट : प्राप्त 413 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 36 पॉझिटिव्ह

  • 61 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.2: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 449 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 413 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 35 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 325 तर रॅपिड टेस्टमधील 88 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 413 अहवाल निगेटीव्ह आहेत. आजपर्यंत प्राप्त झालेले सदर निगेटीव्ह अहवालांमध्ये आज प्राप्त निगेटीव्ह अहवाल सर्वात जास्त आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : गवंढळा 2, मोताळा तालुका : बोराखेडी 1, धा. बढे 2,  मोताळा शहर : 1,  सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 1, रूम्हणा 1,  चिखली तालुका : कोलारा 1, चिखली शहर 2, मलकापूर शहर : 2, शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : डोंगरगण 1, अळसणा 5, गोळेगांव 1, लोहारा 1, लोणार शहर : 2, दे. राजा शहर : 2, दे.राजा तालुका : जवळखेड 1, वाघजई 1, पांग्री 1, मेहुणा राजा 1, उंबरखेड 1, जळगांव जामोद तालुका : सताळी 1 व मूळ पत्ता तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 61 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 21, दे. राजा : 2, लोणार : 15, जळगांव जामोद : 5, मलकापूर : 2, बुलडाणा : अपंग विद्यालय 10, आयुर्वेद महाविद्यालय 3,मोताळा : 3.          

   तसेच आजपर्यंत 47056 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8911 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8911 आहे. 

  आज रोजी 2656 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 47056 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9513 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8911 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 476 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 126 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्रातील संमती पत्र तलाठ्यांकडे सादर करावे

  • क्यार व महा चक्रीवादळ नुकसान भरपाई
  • 15 नोव्हेंबर पर्यंत संमती पत्र सादर करण्याची मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.2: माहे ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे बुलडाणा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यामधील काही सामायिक क्षेत्राचे खाते क्रमांक अप्राप्त आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्रातील संमती पत्र द्यायचे बाकी असेल, त्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत संमती पत्र सादर करावे. अन्यथा अनुदानाची रक्कम शासनास परत करण्यात येणार आहे, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे बुलडाणा तहसिलदार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                                                                *********

 


No comments:

Post a Comment