Wednesday, 18 November 2020

DIO BULDANA NEWS 18.11.2020

इयत्ता 10 व 12 वी परीक्षांचे आयोजन

  • इयत्ता 10 वीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
  • इयत्ता 12 वी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर कालावधीत

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12) परिक्षा दि. 20 नोव्हेंबर  ते 10 डिसेंबर 2020 पर्यत आणि शालांत प्रमाणपत्र  (इयत्ता 10) ची परिक्षा दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिक्षे दरम्यान भरारी पथके पेपरच्या दिवशी  अधिनस्त कार्यक्षेत्रात परिक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देणार आहे.  परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथके प्राधान्य देणार असून परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कारवाई करावी, असे  निर्देश अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती  तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

               परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास संबंधिताविरुध्द महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीस ॲक्ट युनिव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 8 आणि भा.द.वि. चे. कलम 34(217) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  येणार आहे. परिक्षा केंद्रापासून 100 मिटर परिसरात एकही अनधिकृत व्यक्ती आढळून येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. केंद्र परिसरात परिक्षा सुरु होण्यापुर्वी 1 तास आधी पासून परिक्षा संपेपर्यत कलम 144 लागू करण्यात आला आहे. परिक्षा केंद्राचे 100 मिटर परिसरातील कॉम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर, परिक्षा सुरु होण्यापुर्वी 1 तास आधी पासून परिक्षा संपेपर्यत बंद ठेवण्यात यावे. परिक्षा प्रक्रियेमध्ये कोविड-19 विषाणू प्रादुर्भावामुळे   आवश्यक आरोग्य विषयक सुचनांचे पालन होणे बंधनकारक असेल. प्रत्येक वर्गखोल्यामध्ये फक्त 12 किंवा 13 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एक आड एक बाकावर करण्यात यावी. विद्यार्थ्यासाठी सॅनिटायझर, पिण्याचे पाण्याची व्यवस्था परिक्षा कक्षात जाणेपुर्वी विद्यार्थ्याना हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी अन्य आरोग्य केंद्र यांनी परिक्षा दरम्यान कोविड-19 मुळे परिक्षा केंद्र संचालकांकडून मागितलेल्या सहकार्या बद्दल आवश्यकता सर्व मदत तात्काळ पुरविण्यात यावी.             

         तसेच प्रत्येक केंद्रावर नेमुन दिलेल्या पेपरचे दिवशी बैठे पथक स्थापित करुन दररोज परिक्षचा अहवाल घेण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यानी मोबाईल, ईलेक्ट्रिक साहित्य परिक्षा केंद्रावर आणू नये व परिक्षेला वेळेपुर्वी  परिक्षाकेंद्र स्थळी उपस्थित राहावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी 575 विद्यार्थी प्रविष्ठ असून परिक्षा केंद्र संख्या 6 आहे. तसेच  माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता 10 वी) साठी  प्रविष्ठा विद्यार्थी 410 आहे व  परिक्षा केंद्र संख्या 6 आहे.

भरारी पथकांची संख्या 6 आहे.   शिक्षणधिकारी (माध्यमिक), शिक्षणधिकारी (प्राथमिक),  शिक्षणाधिकारी (निरंतर),  उपशिक्षणधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथक,  विशेष भरारी पथक (प्राचार्य, जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ) आदींचा भरारी पथकात समावेश आहे.

      तसेच इयत्ता 12 वी परीक्षेसाठी  एडेड क. म. वि.बुलडाणा, जिजामाता क. म. वि. सिदखेड राजा, जी. एस. आर्ट, कॉमर्स  ॲण्ड सायन्स कॉलेज खामगांव, इनियतीया उर्दु ज्युनिअर कॉलेज नांदुरा, नुतन ज्युनिअर कॉलेज मलकापुर, एस. के. कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद आदी परीक्षा केंद्र आहेत. तसेच इयत्ता 10 वी परीक्षेसाठी  भारत विद्यालय बुलडाणा, सावित्रिबाई फुले कन्या शाळा सिंदखेड राजा, जे. व्ही. मेहता नवयुग हायस्कुल खामगांव, सी. एस. कोठारी हायस्कुल, नांदुरा, न्यु इरा हायस्कुल, जळगांव जामोद परीक्षा केंद्र आहेत.

000000

जिल्हा परीषदेच्या अनुकंपाधारक उमेदवारांची यादी प्रसिद्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : अनुकंपाधारक उमेदवारांकरीता शासन निर्णय दि. 21 सप्टेंबर 2017 मधील तरतुदी नुसार अनुकंपाधारक उमेदवारांचे प्राप्त झालेल्या अर्जाची सन 2020 ची सुधारित तात्पुरती जेष्टता यादी जिल्हा परिषद बुलडाणा संकेतस्थळ  www.zpbuldhana.maharashtra.gov.in  वर प्रसिध्द करण्यात आली आहे.अनुकंपाधारक उमेदवारांचे प्राप्त अर्जाचे तात्पुरत्या यादीवर दि. 2 डिसेंबर 2020 पर्यत लेखी आक्षेप मागविण्यात येत आहे. त्यानुसार अनुकंपाधारक उमेदवारांनी त्यांचे लेखी आक्षेप पुराव्याच्या कागदपत्रांसह dyceogzpbudana@gmail.com या ई- मेल आयडीवर किंवा कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून मुदतीत सादर करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

--

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 548 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 49 पॉझिटिव्ह*

*42 रूग्णांना मिळाली सुट्टी*

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 597 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 548 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 49 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 441 तर रॅपिड टेस्टमधील 107 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 548 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : भंडारी 2, हिंगणा 1, गणेशपूर 1, नांदुरा तालुका : माळेगांव 1, अंबोडा 9, खुमगांव 1,  बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : माळविहीर 1,  शेगांव तालुका : माटरगांव 1, तिंत्रव 1,  चिखली शहर : 7, चिखली तालुका : मेरा बु 1, दे. राजा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, सिं. राजा तालुका : जळ पिंपळगांव 2,   मोताळा तालुका : शेलापूर 1,  थड 1, अंत्री 1,  मेहकर तालुका : जानेफळ 2, खळेगांव 1, मेहकर शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 49 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा :  अपंग विद्यालय 9, दे. राजा : 1, सिंदखेड राजा : 1, मोताळा : 1, मेहकर : 9, चिखली : 14, खामगांव : 1, शेगांव : 5, मलकापूर : 1,  

   तसेच आजपर्यंत 61359 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10073 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10073 आहे. 

  आज रोजी 499 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 61359 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10608 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10073 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 403 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 132 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

 

No comments:

Post a Comment