Tuesday, 17 November 2020

DIO BULDANA NEWS 17.11.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 604 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 66 पॉझिटिव्ह

•       76 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.17: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 670 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 604 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 66 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 53 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 529 तर रॅपिड टेस्टमधील 75 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 604 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : रायपूर 1,  लोणार शहर : 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : परतापूर 1, भोसा 1,  दे. माळी 4,  खामगांव शहर : 3, चिखली तालुका : चांधई 1, तांदुळवाडी 6, शेलगांव आटोळ 1, करवंड 1, चिखली शहर : 6, नांदुरा तालुका : तांदुळवाडी 1, मोताळा शहर : 6, मोताळा तालुका : शेलापूर 3, लिहा 1,माकोडी 1, शेलगांव 1, पिंपळगांव 1, सावरगांव 1, जळगांव जामोद तालुका : खांडवी 1, वडशिंगी 1, खेर्डा 3, वाडी खु 2, जळगांव जामोद शहर : 1,  संग्रामपूर तालुका : बावनबीर 2,   सिं .राजा शहर : 1, शेगांव शहर : 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : धरणगांव 1, दे. राजा शहर : 3,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 66 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 12, दे. राजा : 5, लोणार : 7, सिं. राजा : 11, चिखली : 8, जळगांव जामोद : 4, शेगांव : 5, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, संग्रामपूर : 5, नांदुरा : 3,  मेहकर : 8, मलकापूर : 4, मोताळा : 3.  

     तसेच आजपर्यंत 60811 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10031 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10031 आहे. 

  आज रोजी 490 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 60811 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10559 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10031 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 396 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 132 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment