Monday, 23 November 2020

DIO BULDANA NEWS 23.11.2020

 खडकपूर्णा प्रकल्पातून पहिल्या पाळीसाठी आज पाणी सोडणार

•       लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज सादर करावे

  बुलडाणा,(जिमाका) दि.23 : यावर्षी खडकपूर्णा प्रकल्प ता. दे. राजा मध्ये 100 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे. खडकपूर्णा धरणाचे बुडीत क्षेत्रालगतचे लाभक्षेत्र, खडकपूर्णा नदीपात्रातील डाव्या व उजव्या तिरावरील लाभक्षेत्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून व नदी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना, डाव्या व उजव्या मुख्य कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मालकी हक्काची शेती थेट विमोचकाखाली व कालव्यावरून उपसाद्वारे पिकविता येणार आहे. विधान परिषद निवडणूकीची आचार संहीता असल्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होवू शकली नाही. तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या सूचनेनुसार  पाण्याची एक पाळी 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देण्यासाठी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार खडकपूर्णा प्रकल्पातील पहिल्या पाळीसाठी 25 नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे.

  तरी लाभधारक शेतकरी, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष तथा संबंधीतांनी त्यांचे पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये सात बारासह संबंधीत पाणी वापर संस्था यांच्याकडे करावे. पाणी वापर संस्थेचे अध्यक्षांनी सदरची पाणी मागणी अर्ज संबंधीत उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प यांचेकडे द्यावेत. पाणीपट्टी शासकीय नियमानुसार व जलसंपदा विभागाचे प्रचलीत दराने आकारण्यात येणार आहे. ज्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था हस्तांतरीत झालेल्या नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधीत उपविभागात अर्ज करावे.

   उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 जोड कालवा, लघुकालवा क्रमांक 1 ते 7 चे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 वरील जोड कालवा तसेच थेट लघुकालवा क्रमांक 1 व 2 वाकी वितरीका व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 ते 5 चे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 3 वरील जोड कालवा व  शाखा कालवा कि.मी 1 ते 11 व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 ते 6 व अंत्यवितरीका आणि त्यावरील लघु कालवे यांचे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 वरील कोनड, येवता व गांगलगाव  वितरीकेचे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 वरील मुय कालवा व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 व 4, रोहडा लघु कालवा क्रमांक 1 ते 5, भरोसा व मुरादपूर लघु कालव्याचे लाभक्षेत्र या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा कालवे उपविभाग क्र. 2 चिखली येथे अर्ज करावे. 

   तसेच दगडवाडी उपसा सिंचन योजना मुख्य कालवा व डाव्या मुख कालव्यावरील अमोना अंत्य लघु कालवावरील लाभक्षेत्र या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, पेनटाकळी प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र 4 चिखली येथे अर्ज करावेत. डाव्या मुख्य कालव्यावरील नारायणखेड उपसा सिंचन योजना वरील लाभक्षेत्र, उजव्या मुख्य कालव्यावरील निमगांव वायाळ उपसा सिंचन योजनेवरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प पुनर्वसन उपविभाग क्र. 4 दे. मही येथे अर्ज सादर करावेत. खडकपूर्णा जलाशयाच्या डाव्या व उजव्या तिरावरील लाभक्षेत्र उपसा सिंचन योजना टप्पा क्र 4 वरील  कोलारा वितरीकेवरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग दे. मही येथे अर्ज सादर करावेत असे कार्यकारी अभियंता प्र. पु संत यांनी कळविले आहे.

******

 

 


गुलाबी बोंडअळीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवावे

-    जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • बोंड अळी उपाय योजना नियंत्रण बैठक

  बुलडाणा,(जिमाका) दि.23: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बोंड अळी प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे.  कृ‍षि विभाग विविध उपाय योजनांच्या माध्यमातून बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी सदर उपाय योजनांचा प्रभावी वापर करीत बोंड अळीवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बोंड अळी नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये आदी उपस्थित होते.

     यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी सादरीकरण केले.  ते म्हणाले, बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी फवारणी करावी. दिवसा फवाणी ही प्रभावी ठरत नाही. तसेच पेस्टीसाईड हे गॅस श्रेणीतील वापरावे. बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध व प्रकाश सापळे लावण्यात यावेत. जिनींग परीसरातही किमान 20 ते 25 कामगंध सापळे लावावेत. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होवून मरण पावतील.  बोंड  अळी नियंत्रण जनजागृती करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

   यामध्ये शेती शाळा घेण्यात येणार असून ग्राम स्तरावरील कृषि यंत्रणेमार्फत जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना सायंकाळी फवारणीचे प्रात्याक्षिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 174 गावांमध्ये बोंड अळीमुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. तसेच आर्थिक नुकसानीची पातळी सर्वात जास्त नोव्हेंबर महिन्यात 133 गावांनी ओलांडली.  तसेच जिल्ह्यात 31 जिनींग मील मध्ये एकूण 145 कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. तसेच 633219 शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे बोंडअळी उपाय योजनांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी कृषि विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिनींग मील मालक, शेतकरी आदी उपस्थित होते.

********

                      कोरोना अलर्ट : प्राप्त 1474 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 33 पॉझिटिव्ह

•       125 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.23: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1507 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1474 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1438 तर रॅपिड टेस्टमधील 36 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1474 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 4,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : नांदुरा तालुका: बेलोरा 1, तांदुळवाडी 4,  मोताळा शहर: 1, सिंदखेड राजा तालुका: दुसरबीड 1,  दे. राजा तालुका: असोला जहागीर 5,  मलकापूर शहर : 3,  बुलडाणा तालुका : सागवण 1, पिं सराई 1, मेहकर तालुका: जानेफळ 1, डोणगाव 4, चिखली तालुका: इसोली 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 125 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 24, शेगांव : 5,  बुलडाणा : 3, अपंग विद्यालय 7,  खामगांव : 1, नांदुरा :6,  सिं. राजा : 11, मोताळा  : 5, मलकापूर :3, संग्रामपुर : 2, दे. राजा : 1, मेहकर :7, लोणार : 8, जळगांव जामोद : 34.

     तसेच आजपर्यंत 66802 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10388 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10388 आहे. 

  तसेच 5197 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 66802 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10868 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10388 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 346 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******

No comments:

Post a Comment