जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार शामला खोत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना
बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणरे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यासाठी जिल्हा मुख्यालयी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, सहाय्यक करमणूक कर अधिकारी के. व्ही. पाटील, महसूल सहाय्यक राजशिष्टाचार कक्षाचे महसूल सहाय्यक शिवशंकर अशोक रिंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडून कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
शासकीय कामकाजात अधिकाधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु आले आहे.
कक्षामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी मुख्यमंत्री यांना लिहिलेले अर्ज, निवेदने स्विकारतील. या अर्जावर जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी यांची बैठक घेऊन निकाली काढण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालयास पाठविण्यात येणार आहे. वैयक्तिक आणि धोरणात्मक अर्ज अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहे.
0000000
युवकांनी जिल्ह्याबाहेर काम करण्याची मानसिकता ठेवावी
-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड
बुलडाणा, दि. 27 : रोजगार मेळावा हा उपस्थित उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी युवकांनी नेहमीच प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता युवा पिढीने ठेवावी. युवकांनी नोकरी मिळविण्यासोबतच व्यापक दृष्टिकोन ठेवून भविष्यात आपणच नोकरी देणारे उद्योजक बनण्याची इच्छाशक्ती बाळगावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला.
जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील, शेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. पी. महाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर हे उपस्थित होते. यावेळी सुनिल पाटील, प्राचार्य एस. पी. महाले यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याला संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य एस. डी. सोमाणी, प्रशिक्षण अधिकारी आदेश सोळंके, महात्मा गांधी नॅशनल फेलो शिवानी तावडे, कौशल्य विकास अधिकारी प्रमोद खोडे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक नंदू मेहेत्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांच्यासह 14 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मेळाव्यासाठी जिल्ह्यातील 408 सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक युवक व युवती उपस्थित होते. सदर मेळाव्यात 600 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली होती.
श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून रोजगार मेळाव्याची भूमिका मांडली. सचिन भगत यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सोळंके यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष पडघान, गोपाल चव्हाण, सचिन पवार, राहूल सुरडकर, तसेच संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
00000
राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजनेंतर्गत निवडअंती सन 2022चे राज्य वाङमय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी दि. 1 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रवेशिका दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना पाठवावयाच्या आहेत. विहित कालावधीनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.
0000000
मोताळा आयटीआयमध्ये भंगार साहित्य विक्रीसाठी निविदा आमंत्रित
बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भंगार साहित्य विक्रीसाठी दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा आमंत्रित करण्यात आला आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत का
00000000
No comments:
Post a Comment