Thursday, 1 December 2022

DIO BULDANA NEWS 01.12.2022

 

आधारभूत किंमतीने खरेदी योजनेत नोंदणीसाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी खरेदी करण्यात येत आहे. यासाठी दि. 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांकडून हमी दराने मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु यासाठी आता दि. ७ डिसेंबर २०२२ मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमीदराचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांची कमी झालेल्या नोंदणीमुळे शेतकऱ्यांची नोंदणीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोणातून मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच शेतमाल खरेदीसाठी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कालावधी दिला आहे.

केंद्र शासनाने बुलडाणा जिल्ह्याकरीता मका ५० हजार क्विंटल आणि ज्वारी २७ हजार ७५९ क्विंटल खरेदीचे उदिष्ट दिले आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यानंतर त्यांनी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून खरेदीसाठी माल घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

00000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांची पदभरती

बुलडाणा, दि. 1 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वुरुपात मानधनावर कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एक्स सर्विसमन कार्पोरेशन लिमिटेड (मेस्को) कार्यक्षेत्र अमरावती मार्फत ही नियुक्ती करावयाची आहे. यात कल्याण संघटक 1 पद, लिपिक टंकलेखक 1 पद, कल्याण संघटनासाठी शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण, एमएससीआयटी प्रमाणपत्र, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15 वर्षे, सैन्य दलातील हुद्दा – सुबेदार, नायब सुबेदार, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी Good, मेडिकल – AYE/SHAPE-I, लिपिक टंकलेखक पदासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण, एमएससीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 40 शब्द, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15वर्षे, सैन्य दलातील हुद्दा – हवालदार लिपिक, नायब सुबेदार लिपिक, सुबेदार लिपीक, चारित्र्य कमीत कमी – Good, मेडिकल - AYE/SHAPE-I असणे गरजेचे आहे.

सदर पदाकरीता सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या आणि पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी दि. 9 डिसेंबर 2022 पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्प्लॉयमेंट कार्ड व वैयक्त‍िक अर्जासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भास्कर पडघान यांनी केले आहे.

00000




सामाजिक न्याय समता पर्व निमित्य पत्रकारांची कार्यशाळा

बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. यात पत्रकारांना सामाजिक न्यायाच्या योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकारांची कार्यशाळा पार पडली.

सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांची कार्यशाळेच्या सुरवातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यशाळेसाठी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते.

कार्यशाळेत  सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकांनी शासकीय योजनांची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी योजनांबाबत चर्चा करून योजनाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेतली.

कार्यशाळेला सामाजिक न्याय भवनाच्या वास्तुमध्ये कार्यरत महामंडळाचे व्यवस्थापक, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील योजनांचे कामकाज सांभाळणारे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पी. एम. धर्माधिकारी यांनी आभार मानले.

00000

No comments:

Post a Comment