Monday, 19 December 2022

DIO BULDANA NEWS 19.12.2022

 


चिखली शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई

*15 पानटपरीधारकाकडून 3 हजाराचा दंड वसूल

बुलडाणा, दि. 19 : चिखली येथील 15 पानटपरीवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई केली. यात पानटपरीधारकांकडून तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या निर्देशानुसार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशिल चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली शहरातील मुख्य परिसरातील शिवाजी ज्युनिअर कॉलेज, बस स्टँड परिसर, खामगाव चौफुली, आंबेडकर चौक आदी परिसरात 15 पानटपरीवर कारवाई करीत तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 2003 नुसार ही कार्यवाही करण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक श्री. व्यवहारे, पोलिस शिपाई श्री. मिसाळ, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले, समुपदेशक श्री. सरकटे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

00000

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या केंद्रात बदल

बुलडाणा, दि. 19 : राज्य परीक्षा परिषदेच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या केंद्रात बदल करण्यात आला आहे. बुधवार, दि. 21 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या अधिक झाल्याने भारत विद्यालय आणि एडेड हायस्कूल येथे ही परीक्षा होणार आहे.

सदर शिष्यवृत्ती परिक्षेसाठी बुलडाणा तालुक्यात भारत विद्यालय हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. मात्र विद्यार्थी संख्या अधिक असल्याने अतिरिक्त म्हणून एडेड हायस्कूल हे उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र क्रमांक 6206 भारत विद्यालयात परीक्षा क्रमांक एम 339236206001 पासून एम 339236206384 पर्यंत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तर उपकेंद्र क्रमांक 6206 एडेड हायस्कूल येथे परीक्षा क्रमांक एम 339236206385 पासून एम 339236206710 पर्यंत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याची संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, परिक्षार्थी आणि पालकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

000000

चिखली आयटीआयमध्ये निर्लेखित साहित्यासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 19 : चिखली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निर्लेखित करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 29 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली, जि. बुलडाणा येथील कार्यरत विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊन पुर्णपणे खराब झालेल्या तसेच कालबाह्य झालेल्या निरुपयोगी मशिनरी लिलाव किंवा निविदा पद्धतीने विकण्यात येत आहे. सदर मशिनरी, साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत संस्थेत पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी सदर साहित्याची निविदा दि. 29 डिसेंबर 2022 पर्यंत दुपारी 1 वाजता सर्वासमोर उघडण्यात येणार आहे. निविदेच्या शर्ती व अटी कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment