बुलडाण्यातील ३९ पानटपरीधारकांवर
तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई
बुलडाणा, दि. 22 : बुलडाणा शहरातील 39 पानटपरीधारकावर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आज, दि. 22 डिसेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात त्यांच्याकडून 7 हजार 800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, इकबाल चौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक आदी परिसरात ३९ पानटपरीधारकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 2003 नुसार ही कार्यवाही करण्यात आली.
सदर कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रामविजय राजपूत, शिपाई ओमप्रकाश साळवे, श्री. लेकुरवाडे, प्रवीण पडोळ, जगदेव टेकाळे, संजय तागवे, दिगांबर कपाटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक श्री. सरकटे सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांच्या चमूने ही कारवाई केली.
00000
स्वाधार योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास सुरवात
बुलडाणा, दि. 22 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी सन 2022-23 करीता पात्र विद्यार्थ्यांची अर्ज स्विकृती दि. 21 डिसेंबर 2022 पासून सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 या वेळेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या ठिकाणी, तसेच बुलडाणा नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी, बारावी, तसेच इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्याक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढिल शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे परीपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
000000
स्वाधार योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास सुरवात
बुलडाणा, दि. 22 : शेतकऱ्यांना हमी दराने मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना हमीदराचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांची कमी झालेली नोंदणी पाहता शेतकऱ्यांचे नोंदणीमध्ये वाढ होण्यासाठी नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. खरेदीसाठी शासनाने दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कालावधी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांचे हमी दराने मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी यापुर्वी दि. २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु एनईएमएल पोर्टलवरील मागील हंगामातील नोंदणीचा विचार करता तसेच महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा ऑनलाईन सातबारा मिळण्यास अडचण निर्माण झाल्याने आणि चालू हंगामातील शेतकऱ्यांची नोंदणी पुरेशी झाली नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येईल, त्यांनी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून खरेदीसाठी माल घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.
00000
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना लागू
बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे अवयव आणि डोळ्यांना कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास, विद्यार्थी आजारी पडून सर्पदशांने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास, विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास क्रिडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून आदीसाठी सानुग्रह अनुदान उपलब्ध होणार आहे.
या अनुदानासाठी आवश्यक कागपत्रांची यादी, माहिती शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनुचित घटना घडल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी किशोर पगारे यांनी केले आहे.
0000000
सिंदखेड राजा आयटीआयमध्ये निर्लेखित साहित्यासाठी निविदा आमंत्रित
बुलडाणा, दि. 22 : सिंदखेड राजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्
00000
No comments:
Post a Comment