Tuesday, 9 February 2021
DIO BULDANA NEWS 9.2.2021
राज्य परिवहनतर्फे दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा
बुलडाणा, (जिमाका) दि.9 : राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्याकरीता लोकभिमुख पर्यटन सेवा दि. 7 फेब्रुवारी 2021 रोजी पासून सुरु करण्यात आली आहे. पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरु राहणार असून ही बस बुलडाणा ते वेरुळ लेणी मार्ग जाळीचा देव, अजिंठा लेणी अशी राहणार आहे.
सदर बस दर रविवारी बुलडाणा बसस्थानकावरुन सकाळी 7 वाजता निघणार आहे. ही बस 7.30 वाजता जाळीचा देव या ठिकाणी पोहचेल, 7.30 ते 8.30 वाजता देव दर्शनाकरीता वेळ राहील, सकाळी 9.15 वाजता अजिंठा येथे पोहचेल, 9.15 ते 1 वाजता अजिंठा लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, दु. 3.10 वाजता वेरुळ येथे पाहचेल, 3.10 ते 6.15 वाजता वेरुळ लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, 6.15 वाजता वेरुळ येथून 9.15 वाजता बुलडाणा येथे पाहचेल. बुलडाणा ते वेरुळ लेणी येथून परत बुलडाणा असे 314.2 कि. मी. असे एकुण प्रवास भाडे तिकिट प्रौढाकरीता 420 रुपये, लहान मुलांसाठी 210 रुपये भाडे असणार आहे. या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे. तसेच पर्यटन बस सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रण व विभागीय वाहतुक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
******
जिल्हा कोषागारात लेखा व कोषागारे दिन उत्साहात साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि.9 : जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिनाचा कार्यक्रम 1 फेब्रुवारी 2021 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून से. नि. मुख्य वित्त व लेखाधिकारी ताठे, जिल्हा परिषद वित्त विभागाचे लेखाधिकारी श्री. चव्हाण, जि.पच्या शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी श्री. दिवनाले, लेखापरीक्षा अधिकारी श्री. चिंचोळकर, कृषि विभागाचे लेखाधिकारी श्री. आराख, ग्राहक न्याय मंचचे लेखाधिकारी श्री. पाटील, वेतन पथकचे लेखाधिकारी श्री. साबळे, सर्व शिक्षा अभियानचे सहा. लेखाधिकारी रितेश पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा. लेखाधिकारी श्री. राजपूत,समाज कल्याण विभागाचे सहा. लेखाधिकारी श्री. गोटीवाले, वेतन पथकचे सहा लेखाधिकारी श्री. तायडे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मांडोगडे, श्री. अंभोरे, श्रीमती तिमसे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कोरोना महामारीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. सुरुवातील कृषी विभाग वाशिमचे लेखाअधिकारी स्व.शाम गाभने यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम परितोषिक कु. मयुरी लेकुरवाळे, द्वितीय पारितोषिक दुर्गा चव्हाण व तृतीय पोरितोषिक श्रीमती साधना माटे यांना देण्यात आले. तर कोरोना विषयावरील निबंध स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्रीमती मिना गोटीवाले, द्वितीय पारितोषिक दुर्गा चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी आपले विचार व्यक्त करीत लेखा व कोषागारे विभागाचे महत्व विषद केले. संचलन श्री. भोलाने यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. हेलोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
**********
कोरोना अलर्ट : प्राप्त 438 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 34 पॉझिटिव्ह
• 34 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 472 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 438 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 34 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 27 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 273 तर रॅपिड टेस्टमधील 165 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 472 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 1, खामगांव शहर : 6, बुलडाणा शहर : 6, लोणार शहर : 1, लोणार तालुका : हत्ता 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सवडत 1, दे. राजा शहर : 3, मेहकर शहर : 1, शेगांव शहर : 6, शेगांव तालुका : गायगांव 1, सांगवा 1, मोताळा तालुका : सारोळा पीर 1, मूळ पत्ता डोंगरगांव ता. बाळापूर जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 37 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 8, खामगांव : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, चिखली : 1, शेगांव : 4,
तसेच आजपर्यंत 113086 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13891 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13891 आहे.
तसेच 176 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 113086 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14411 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13891 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 347 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 173 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
पलढग धरणातील बोटींना पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद
बुलडाणा, (जिमाका) दि.9 : जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटींगची सुविधा असून पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. येथे सध्या दोन बोटींगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा व गोंधनखेड गेट जवळ जिप्सी बुकींग सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जंगल सफाररी बरोबरच पर्यटकांना बोटींचा आनंद घेता येणार आहे. दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या असून सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षीत चालक बोटी चालवित आहेत. तसेच लाईफ सेव्हींग जॅकेटची सुविधाही येथे उपलब्ध आहे. तरी पर्यटकांनी या बोटींचा, जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक व्ही. जी साबळे यांनी केले आहे.
*********
--
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment