कोरोना अलर्ट : प्राप्त 1098 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 350 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1098 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 350 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 291 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 744 तर रॅपिड टेस्टमधील 354 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1098 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 21, खामगांव तालुका : माक्ता 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : वाडी 1, निमखेड 1, टाकरखेड 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : केसापूर 1, भादोला 1, तराडखेड 1, दहीद बु 1, माळवंडी 1, सागवन 5, सुंदरखेड 2, गिरडा 2, टाकळी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : थार 1, डोणगांव 2, जानेफळ 2, बऱ्हाई 2, कुंबेफळ 1, दे. राजा तालुका : अंढेरा 10, आळंद 2, सिनगांव जहागीर 18, भिवगण 8, दे. राजा शहर : 40, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : चिंचोली 1, पिंपळखुटा 2, दुसरबीड 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : टाकरखेड 1, अंचरवाडी 1, ईसोली 1, पिंपळवाडी 3, हातणी 3, वळती 1, अंत्री कोळी 4, जांभोरा 3, गुंज 1, मंगरूळ नवघरे 5, केळवद 2, धोत्रा भणगोजी 2, सवणा 3, पेठ 1, तेल्हारा 2, पिंपळगांव सोनाळा 2, मालखेड 1, गजरखेड 1, भोरसा भोरसी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 1, लासुरा 2, जांबुळ धाबा 1, कुंड बु 2, जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 5, मोताळा शहर : 7, मोताळा तालुका : तळणी 1, लोणार तालुका : पिंपळनेर 1, हिरडव 1, लोणार शहर : 10, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, डोलखेडा जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 350 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 96 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 4, बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 24, स्त्री रूग्णालय 3, दे. राजा : 9, चिखली : 15, लोणार : 4, शेगांव : 17, जळगांव जामोद : 3, मलकापूर : 5, मेहकर : 9, नांदुरा : 1. तसेच आजपर्यंत 121529 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14686कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14686आहे. आज रोजी 3330 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 121529 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16496 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14686 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1623 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *********** |
बुलडाणा जिल्ह्यातील पाच नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत
· जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद
· आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये
बुलडाणा,(जिमाका)दि.22 : जिल्ह्यातील बुलडाणा शहर, चिखली शहर, मलकापूर शहर, खामगांव शहर व दे. राजा शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात बुलडाणा, खामगांव, मलकापूर, चिखली व दे. राजा नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी आज 22 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजेपासून 1 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.
या आदेशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रात किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या प्रतिबंधीत क्षेत्रात रात्री 8.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठा, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवार टाळावा. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे.
सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधीत क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पुर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय असणार आहे. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
मात्र प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्या अखेर शुक्रवारी सायं 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. तसेच दुध विक्रेते, डेअरी यापुढे सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment