कोरोना अलर्ट : प्राप्त 508 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 79 पॉझिटिव्ह
• 58 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 587 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 508 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 79 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 425 तर रॅपिड टेस्टमधील 83 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 508 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 18, चिखली तालुका : अंचरवाडी 2, शेलूद 1, पिंपळगांव 1, जांभोरा 1, किन्होळा 1, भालगाव 1, दे. राजा शहर : 9, दे. राजा तालुका : गिरोली बु 1, लिंबा 1, गारखेडा 1, गारगुंडी 1, आळंद 1, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मलकापूर पांग्रा 1, मोहाडी 1, राजेगांव 1, मेहकर तालुका : हिवरा खु 1, लोणार शहर : 1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, रूईखेड 1, सागवन 1, वरवंड 2, बुलडाणा शहर : 17, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : वाडी 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : घाटपुरी 1, दोंदवडा 1, मलकापूर शहर : 3, नांदुरा शहर : 1, मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 79 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे राजेगांव ता. सिं.राजा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 58 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 14, चिखली : 1, दे. राजा : 12, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 8, अपंग विद्यालय 3, लोणार : 7, शेगांव : 2, चिखली : 9, मेहकर : 2.
तसेच आजपर्यंत 114524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14012 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14012 आहे.
तसेच 812 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 114524 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14614 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14012 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 427 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 175 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
‘हॅण्डसेट रिपेअर इंजिनीअर’ कौशल्य विकास बॅचचा शुभारंभ
बुलडाणा,(जिमाका) दि. 11 : युवकांना कौशल्य विकासातुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान कौशल्य विकास योजना 3.0 या कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमातंर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणामधील टेलिकॉम या सेक्टरअंतर्गत हॅण्डसेट रिपेअर इंजिनियर या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ आज 12 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांच्याहस्ते करण्यात आला.
केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या या योजनेची अंमलबजावणी आता राज्य सरकारव्दारे जिल्हास्तरावरुन होणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, बुलडाणा येथे आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी व्ही.बी.बचाटे, श्री.लोकरे, कौशल्य विकास अधिकारी पी.एम.खोडे, प्रशिक्षक शितल चव्हाण, नागेंद्र सुरडकर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र प्रमुख योगेश चवरे यांनी केले. तसेच कौशल्य विकास विभागाचे सहाययक आयुक्त सुधाकर झळके यांनी यावेळी पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३.० या योजनेची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्हयातील 441 उमेदवारांना विविध कोर्सेसमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामधील 30 उमेदवारांना टेलिकॉम सेक्टर मधील हॅण्डसेट रिपेअर इंजिनिअर या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे व इतर प्रशिक्षण लगेच सुरु करण्यात येणार आहे.
अध्यक्ष जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी या योजनेतील प्रशिक्षणार्थीसोबत संवाद साधला. सदर प्रशिक्षण हे विनामुल्य असून याचा लाभ प्रशिक्षणार्थांनी घ्यावा. प्रशिक्षणांतून युवकांना कौशल्य प्राप्त होऊन व आपल्यामध्ये कौशल्य निर्माण करुन रोजगार / स्वयंरोजगार उपलब्ध करुन घ्यावा. जिल्हयातील गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हयामधील गरजू उमेदवारांना या योजनेमध्ये प्रामुख्याने प्राधान्य दयावे असे निर्देशही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा व प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे व्यवस्थापक योगेश चवरे व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बस स्टॅण्ड जवळ,बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा या कार्यालयाच्या 07262 – 242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment