Wednesday, 3 February 2021

DIO BULDANA NEWS 3.2.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 612 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 57 पॉझिटिव्ह • 57 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 669 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 612 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 57 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 53 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 452 तर रॅपिड टेस्टमधील 160 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 612 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : अमडापूर 1, काठोडा 1, वैरागड 1, सावरगांव डुकरे 1, चिखली शहर : 6, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, धामणदरी 1, मौंढाळा 1, चांडोळ 1, कुंबेफळ 7, शेगांव तालुका : पळशी 1, शेगांव शहर : 4, मलकापूर तालुका : उमाळी 2, खामगांव शहर : 12, दे. राजा शहर : 4, खामगांव तालुका : पिं. राजा 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 57 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 57 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 31, चिखली : 5, दे. राजा : 1, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 10, अपंग विद्यालय 1, मलकापूर : 3, लोणार : 2, दे. राजा : 4, तसेच आजपर्यंत 110816 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13611 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13611 आहे. तसेच 753 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 110816 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14113 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13611 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 332 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 170 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलानालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवाधोरण 2012 अन्वये दि.12 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी देण्यात येत असतो. सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो. त्या अनुषंगाने सदर पुरस्काराकरीता या कार्यालयाच्या वतीने वृत्तपत्रीय प्रसिध्दीद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी खालीलप्रमाणे मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी या कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपुर्ण कागदपत्रासह तसेच युवक - युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव दि. 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावा. तसेच अधिक माहितीकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीचा शासन निर्णयाचे अवलोकन करावे व अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी कळविले आहे. युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष : अर्जदार युवक / युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. (तसा पूरावा जोडावा), जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असावे. (दाखला जोडावा), पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही, पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो, इत्यादी), अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील, अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. (तसे हमीपत्र जोडावे), एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे) केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे), अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील. संस्थांसाठी पात्रता निकष पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही, संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो, इत्यादी),अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.(तसे हमीपत्र जोडावे), एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे) अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील. पुरस्कारासाठी मुल्यांकन युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि.1 एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्यात साधन संपती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग, इ. बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतीक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभृन, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, इ. बाबत कार्य, साहस, इ. बाबतचे कार्य. ***** अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : जिल्हा परिषद मार्फत मागासवर्गीय विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक तिन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु झाली आहे. सदर योजनेच्या अर्जाचा नमुना पंचायत समिती या कार्यालयात उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्विकारण्यात येणार नाही, सदर योजनेअंतर्गत दि. 4 फेब्रुवारी 2021 पासून स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 3 मार्च 2021 असणार आहे. या दिनांकानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्जदार मागासवर्गीय समाजाचा व दरिद्र रेषेखालील असावा, अर्जदाराकडे दुधाळ जनावरे, शेळ्या, कोंबडया असणे आवश्यक आहेत. अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे, तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, अर्जासोबत नुकतेच काढलेले छायाचित्र जोडावे, योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग अर्जदारांचा समावेश असावा. लाभार्थ्यास या याजनेचा लाभ सन 2020-21 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यानी कोणत्याच दलाला मार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नसुन अशा प्रवृत्तींपासून सावध रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांनी कळविले आहे. ******* राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत प्रशिक्षण उत्साहात बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : जिल्हा कोषागार कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षण 5, 7, 22 व 27 जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात योजनेसंबधी मार्गदर्शन करण्यात आले, तर संबंधीतांच्या अडी – अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणात प्रामुख्याने सभासद नोंदणीस विलंब, प्राण क्रमांक, निरंक प्राण, नामनिर्देशन नसलेले प्राण, मोबाईल क्रमांक नसलेले प्राण, बँक तपशील नसलेले प्राण, आहरण व सवितरण अधिकारी यांचा लॉगीन तपशील अंशत: रक्कम काढणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून बाहेर पडणे, नियम वयोमर्यादा सेवानिवृत्ती वेतन प्रकरणात दावा क्रमांक प्राप्त मात्र प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत प्रशिक्षण तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांचे एनएसडीएल चे लॉगीनमध्ये माहिती अद्यावत करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांच्या कार्यालयातंर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्राण क्रमांक अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत, अशा कर्मचाऱ्याचे सिएसआरएफ फॉर्म जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे तात्काळ सादर करावेत. आहरण व संवितरण अधिकारी यांनी एनपीएस एनएसडीएल लॉगीन डॅश बोर्ड चे पासवर्ड जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा मार्फत प्राप्त करून घ्यावेत. ज्या कर्मचाऱ्यांना प्राण प्राप्त झालेले आहेत, अशा कर्मचाऱ्याचे वैयक्तिक माहिती अद्ययावत नसल्यास ती माहिती आहरण व संवितरण अधिकारी यांच्या एनपीएस एनएसडीएल लॉगीन डॅश बोर्डमध्ये अद्ययावत करून सदर अद्ययावत माहिती जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करण्यात यावी. सदर प्रशिक्षण जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर, अप्पर कोषागार अधिकारी पंडीतराव मांडोगडे, उपकोषागार अधिकारी घनश्याम बोरले, वैभव गिते, जीवन काळे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदींनी दिले. **************
खोर येथील निलेश मगर घरून निघून गेले बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : जिल्ह्यातील रायपुर हद्दीतील चिखली तालुक्यातील खोर गावातून निलेश सर्जेराव मगर, वय 28 वर्ष हा इसम दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी घरामध्ये कोणाला काही न सागता निघून गेला आहे. सदर व्यक्तीचा रंग गोरा असून उंची 5 फुट आहे. अंगामध्ये निळे टिशर्ट, फुलपॅट काळसर रंगाचा, पायात पांढरा बुट व त्यांच्या पाठीला कुबड निघालेले आहे. या वर्णनाचा इसम कुणाला आढळून आल्यास रायपूर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क करावा. संपर्कासाठी पोलीस हेड काँस्टेबल शांताराम जाधव ब. नं. 1711 मो. नं. 8605015475 व पोलीस स्टेशन रायपुर 07262 – 270030 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे ठाणेदार, रायपूर पोलीस स्टेशन यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे यांनी कळविले आहे. ******** कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : संघ लोकसेवा आयोग यांनी 7 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस परीक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 5, 6 फेब्रुवारी रोजी जाण्यासाठी व 7, 8 फेब्रुवारी रोजी परत येण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173. ***********

No comments:

Post a Comment