कोरोना अलर्ट : प्राप्त 515 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 134 पॉझिटिव्ह
• 66 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 649 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 515 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 134 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 103 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 302 तर रॅपिड टेस्टमधील 213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 551 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 15, शेगांव शहर : 5, बुलडाणा शहर : 30, बुलडाणा तालुका : सागवण 2, नांद्राकोळी 1, सुंदरखेड 2, नांदुरा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : अकोला खुर्द 1, झाडेगांव 1, वाडी खु 1, आसलगांव 1, चिखली शहर : 30, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 1, अमडापूर 2, गजरखेड 1, पिंपळवाडी 1, खैरव 2, अंत्री कोळी 3, धोत्रा भणगोजी 2, तेल्हारा 2, दे. घुबे 1, सावरखेड 1, मोताळा शहर : 2, खामगांव शहर : 12, खामगांव तालुका : सुटाळा बु 1, घाणेगांव 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : भिवगण 1, सिनगांव जहागीर 1, अंढेरा 1, डोढ्रा 2, जांभोरा 1, सिं. राजा शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2, मूळ पत्ता माहोरा ता. जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 134 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अजिसपूर ता. बुलडाणा येथील 62 वर्षीय व उमाळी ता. मलकापूर येथील 84 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 66 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 27, स्त्री रूग्णालय 1, अपंग विद्यालय 4, नांदुरा : 4, खामगांव : 7, लोणार : 2, चिखली : 4, दे. राजा : 10, शेगांव : 2, मलकापूर : 3, सिं. राजा : 2.
तसेच आजपर्यंत 116907 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14329 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14329 आहे.
तसेच 1455 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116907 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15359 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14329 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 849 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 181 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
अप्पर जिल्हाधिकारी यांनी घेतली कोविड लस
बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : कोविड लसीकरण जिल्ह्यात सुरू असून सध्या 13 ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 1300 लसीकरणाचे दररोजचे उद्दिष्ट आहे. कोविड लसीकरणामध्ये दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्करमधील व्यक्तींचे लसीकरण सध्या सुरू आहे. त्यानुसार आज अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे आदींनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरण कक्षात लस टोचून घेतली. लसीकरणानंतर 30 मिनीटे निरीक्षण रूममध्ये ते होते. या लसीमुळे कुठलाही प्रकारचा त्रास त्यांना झाला नाही. लस ही 100 टक्के सुरक्षीत असल्याचा अनुभव त्यांनी घेतला. यासोबतच महसूल यंत्रणेतील तहसीलदार, नायब तहसिलदार यांनीही आज जिल्हा सामान्य रूग्णालयात लस टोचून घेतली. तरी लसीकरणामधील लाभार्थी व्यक्तींनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता लस घेण्याचे आवाहन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले.
No comments:
Post a Comment