कोरोना अलर्ट : प्राप्त 3273 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 391 पॉझिटिव्ह
- 179 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3273 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 391 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 322 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1945 तर रॅपिड टेस्टमधील 1328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3273 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 27, मलकापूर तालुका : दाताळा 2, बेलाड 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : शिरपूर 3, कोलारा 1, शेलूद 1, मेरा खु 1, भानखेडा 1, वरखेड 1, हातणी 2, सवणा 1, अमडापूर 2, मालगणी 1, नायगांव 1, पळसखेड दौलत 1, खामगांव शहर : 28, खामगांव तालुका : घारोड 1, किन्ही महादेव 1, सुटाळा 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 2, उमरा अटाळी 1, नांदुरा शहर : 40, नांदुरा तालुका : पोटळी 1, निमखेड 1, नायगांव 1, शेलगांव मुकूंद 2, टाकरखेड 1,काटी 1, वडनेर 1, शेगांव शहर : 14, शेगांव तालुका : भोनगांव 7, माटरगांव 1, आडसूळ 1, जळगांव जामोद शहर : 8, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 4, खेर्डा 2, झाडेगांव 29, कुरणगड 1, मेहकर शहर : 11, मेहकर तालुका : हिवरा साबळे 1, दे. माळी 3, हिवरा आश्रम 3, कळमेश्वर 1, बऱ्हाई 4, दे. साकर्षा 1, शेंदला 5, लोणार शहर: 8, लोणार तालुका : शिवनगांव 1, आरडव 4, गोत्रा 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : वरवंड 1, मढ 1, पाडळी 1, मासरूळ 1, करडी 1, दुधा 1, रूईखेड 1, धामणदरी 1, येळगांव 1, गिरडा 1, सुंदरखेड 2, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : तळणी 1, बोराखेडी 3, तरोडा 3, दे. राजा शहर : 31, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 5, अंढेरा 1, आळंद 1, दे. मही 2, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1, पळशी झाशी 1, एकलारा 1, सिं. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : लिंगा 1, पांगरी उगले 1, दुसरबीड 2, पिंपळखुटा 1, चिंचोली 1, मूळ पत्ता वरूड जि. जालना 1, वळसा वडाळा ता. भोकरदन जि. जालना 1, अकोला 4, राजणी ता. जामनेर जि. जळगांव 1, आंबेजोगाई जि. बीड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 391 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 179 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 30, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 6, दे. राजा : 18, चिखली : 42, मलकापूर : 14, शेगांव : 11, लोणार : 6, मेहकर : 8, सिं. राजा : 9, मोताळा : 3, नांदुरा : 13,
तसेच आजपर्यंत 130645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15258 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15258 आहे.
आज रोजी 7957 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 130645 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17979 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15258 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2529 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
जिल्ह्यात शनिवार व रविवारला संचारबंदी
बुलडाणा,(जिमाका) दि.26: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र शनिवार व रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. सदर आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 पासून व प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सायं 5 पासून ते 1 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment